Multibagger Stock : हे नवरत्न तुमच्याकडे आहे का? 1 लाखांचे आज आहेत 45 कोटी

| Updated on: Jan 03, 2023 | 10:49 PM

Multibagger Stock : मल्टिबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केले मालामाल

Multibagger Stock : हे नवरत्न तुमच्याकडे आहे का? 1 लाखांचे आज आहेत 45 कोटी
मल्टिबॅगर स्टॉकमुळे मालामाल
Follow us on

नवी दिल्ली : शेअर बाजारात (stock market) रणनीती आणि धैर्य अत्यंत आवश्यक आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांच्या झोळीत शेअर बाजार भरभरुन देतो असे म्हणतात. त्यांना मोठा फायदा होतो. नवरत्न कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेडच्या (Bharat Electronics Ltd) शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना दीर्घकालानंतर मोठा फायदा झाला. त्यांचे नशीब पालटले. 23 वर्षात या नवरत्न कंपनीच्या मल्टिबॅगर स्टॉकने (Multibagger Stock) 45,627 टक्क्यांचा परतावा दिला. या शेअरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक करणारे आज कोट्यधीश आहेत.

कंपनीचा शेअर मंगळवारी NSE वर 0.35 टक्क्यांची वाढ झाली. 3 जानेवारी रोजी हा स्टॉक 100.70 रुपयांवर व्यापार करत होता. या सरकारी कंपनीने आतापर्यंत 3 वेळा बोनस शेअर दिला. गेल्या 6 महिन्यांत BEL स्टॉक जवळपास 39 टक्के वधारला. तर एका वर्षात हा शेअर जवळपास 43 टक्के वाढला.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने 1999 मध्ये या कंपनीत एक लाख रुपये गुंतवले असते. तर 4,54,545 शेअर खरेदी केले असते. या 23 वर्षात या कंपनीने 3 वेळा बोनस शेअर दिला आहे. त्याचा गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे.

हे सुद्धा वाचा

पहिल्यांदा या कंपनीने 14 सप्टेंबर 2015 रोजी बोनस शेअर दिला. 2:1 या प्रमाणात हा बोनस शेअर देण्यात आला. त्यानंतर 28 सप्टेंबर 2017 रोजी 1:10 प्रमाणात बोनस शेअर दिला. तिसऱ्यांदा 2:1 अशा प्रमाणात बोनस शेअर देण्यात आला.

आज भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेडच्या प्रति शेअरची किंमत 100.70 रुपये आहे. गुंतवणूकदाराने एक लाख रुपये गुंतवले असते तर यामध्ये त्याला 45 कोटी रुपयांचा परतावा मिळाला असता.  दीर्घकालीन गुंतवणूकदारांना या कंपनीने मालामाल केले आहे.

Live Mint च्या अहवालानुसार, भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड ही सार्वजनिक क्षेत्रातील नवरत्न कंपनी आहे. याची बाजारातील भागीदारी 50% अधिक आहे. देशातील संरक्षण क्षेत्रातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाची पुर्तता ही कंपनी करते.

ही कंपनी, लष्कर, वायु सेना आणि नौसेना यांना इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांचा पुरवठा करणे आहे. सध्या केंद्र सरकारचे संरक्षण क्षेत्रात आयात कमी करण्याचे धोरण आहे. त्याचा फायदा भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड कंपनीला होईल.