Multibagger Share : महागाईवर सहज करता आली असती मात; 8 रुपयांच्या शेअरने आज केले असते मालामाल

| Updated on: Apr 18, 2024 | 3:53 PM

Share Market मध्ये या सोलर कंपनीने धुवांधार बॅटिंग केली. कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले. गुरुवारी हा शेअर 5 टक्क्यांनी वधारला. हा शेअर आज 1773.35 रुपयांवर व्यापार करत होता. कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या 4 वर्षांत 22,000 टक्क्यांची तेजी आली आहे.

Multibagger Share : महागाईवर सहज करता आली असती मात; 8 रुपयांच्या शेअरने आज केले असते मालामाल
शेअरने केले मालामाल
Follow us on

शेअर बाजारात अनेक कंपन्या गुंतवणूकदारांना लॉटरी लावतात. सोलर कंपनी केपीआय ग्रीन एनर्जीच्या शेअरने सु्द्धा अशीच कमाल केली. या शेअरने अवघ्या 4 वर्षांत गुंतवणूकदारांना बक्कळ कमाई करुन दिली. गुरुवारी या कंपनीच्या शेअरमध्ये 5 टक्क्यांची तेजी दिसून आली. हा शेअर 1773.35 रुपयांवर व्यापार करत होता. गेल्या चार वर्षांत हा शेअर 8 रुपयांहून 1700 रुपयांवर पोहचला. केपीआय ग्रीन एनर्जीच्या शेअरने या कालावधीत गुंतवणूकदारांना 22,000 टक्क्यांहून अधिकचा परतावा मिळवून दिला.

8 रुपयांहून 1700 रुपयांची भरारी

KPI Green Energy च्या शेअरने गेल्या 4 वर्षांत मोठा पल्ला गाठला. कंपनीचा शेअर 17 एप्रिल 2020 रोजी 8 रुपये होता. तर कंपनीचा शेअर गुरुवारी 18 एप्रिल 2024 रोजी 1773.35 रुपयांवर होता. कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यातील उच्चांक 1895.95 रुपये इतका आहे. तर या शेअरचा 52 आठवड्यातील निच्चांक 309 रुपये आहे.

हे सुद्धा वाचा

एका वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये 457 टक्के उसळी

स्मॉलकॅप कंपनी केपीआय ग्रीन एनर्जीचा शेअर गेल्या एका वर्षात 457 टक्क्यांनी उसळला. कंपनीचा शेअर 18 एप्रिल 2023 रोजी 318.77 रुपयांवर होता. तर या कंपनीचा शेअर आज 18 एप्रिल 2024 रोजी 1773.35 रुपयांवर आहे. गेल्या सहा महिन्यात सोलर कंपनीच्या शेअरमध्ये 207 टक्क्यांची जबरदस्त उसळी दिसून आली. एकाच वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये 86 टक्क्यांची तेजी दिसून आली.

1 लाखांचे झाले 8 लाख

TRIL चा शेअर गेल्या 12 व्यापारी सत्रात तेजीत आहे. एका वर्षापूर्वी म्हणजे 10 एप्रिल 2023 रोजी या शेअरची किंमत 59.45 रुपये होती. आता ती वाढून 517 रुपये इतकी झाली आहे. याचा अर्थ या मल्टिबॅगर शेअरने एका वर्षात गुंतवणूकदारांना जवळपास 770 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने एका वर्षापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज या गुंतवणुकीचे मूल्य 8,69,638 रुपये झाले असते.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.