पाच राज्यातील विधानसभा निकालानंतर इंधनाचे नवे दर जाहीर, जाणून घ्या आजचे पेट्रोल, डिझेलचे भाव

| Updated on: Mar 11, 2022 | 9:34 AM

गुरुवारी उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी देशाती पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे (Petrol-Diesel Rates) दर जाहीर करण्यात आले.

पाच राज्यातील विधानसभा निकालानंतर इंधनाचे नवे दर जाहीर, जाणून घ्या आजचे पेट्रोल, डिझेलचे भाव
पेट्रोल, डिझेलचे आजचे दर
Image Credit source: TV9
Follow us on

Petrol-Diesel Price Today : गुरुवारी उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी देशाती पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे (Petrol-Diesel Rates) दर जाहीर करण्यात आले. आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये. पेट्रोल कंपन्यांनी जाहीर केलेल्या नव्या दरानुसार देशात आज देखील इंधनाचे (fuel) दर स्थिर आहेत. त्यामध्ये कोणाताही बदल करण्यात आलेला नाहीये. विधानसभा निवडणूक (Assembly elections) होताच पेट्रोल, डिझेलच्या दरामध्ये वाढ होईल असा अंदाज बांधण्यात येत होता. मात्र आज देखील इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. चार नोव्हेंबर 2021 रोजी पेट्रोल, डिझेलवरील टॅक्स कमी करण्यात आल्याने पेट्रोल प्रति लिटर पाच रुपये तर डिझेल दहा रुपयांनी स्वस्त झाले होते, त्यानंतर इंधनाच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

प्रमुख शहरातील इंधनाचे दर

ओसीएलकडून प्राप्त माहितीनुसार आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रती लिटर 95.41 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 86.67 रुपये एवढा आहे. मुंबत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 109.98 व 94.14 रुपये एवढा आहे. कोलकातामध्ये एक लिटर पेट्रलसाठी 104.67 रुपये आणि डिझेलसाठी 89.79 रुपये आकारले जात आहेत. तर चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर 101.40 रुपये तर डिझेलचा दर 91.43 रुपये एवढा आहे.

कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या

रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचे दर सातत्याने वाढत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये कच्च्या तेलाचे दर 120 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे पोहोचले आहेत. कच्च्या तेलाचे दर वाढत असल्याने पेट्रल, डिझेलची दरवाढ अटळी मानली जात आहे. पाच राज्यातील निवडणुका होताच दर वाढविले जातील असा अंदाज होता. मात्र आजही दर स्थिर ठेवण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या

स्टॉक स्प्लिटने गुंतवणुकदार मालामाल; अ‍ॅमेझॉनचे खास गिफ्ट

सोन्याची आणि चांदीची चमक फिक्की; आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे भाव उतरले

…तर खतांचे दर गगनाला भिडणार; भारतालाही बसणार मोठा फटका?