केंद्र सरकारकडून वीजपुरवठ्यासाठी नवे नियम; जाणून घ्या सामान्य नागरिकांना काय मिळणार

| Updated on: Jan 03, 2021 | 12:27 PM

वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने आपल्या धोरणात काही महत्त्वाचे बदल केले आहेत. हे नवे बदल वीज ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून करण्यात आले आहेत. (government electricity use rule)

केंद्र सरकारकडून वीजपुरवठ्यासाठी नवे नियम; जाणून घ्या सामान्य नागरिकांना काय मिळणार
वीज वाहिनी
Follow us on

नवी दिल्ली : वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने आपल्या धोरणात काही महत्त्वाचे बदल केले आहेत. हे नवे बदल वीज ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून करण्यात आले आहेत. नव्या बदलानुसार वीज ग्राहकांना नवे अधिकार देण्यात आले असून वीज पुरवठा कंपन्यांना काही नवे नियम लागू केले आहेत. तसेच, आता ग्राहकांना वीज देयक, वीज पुरवठा या बाबतीत नवे अधिकार मिळाले आहेत. (New rule of central government on electricity use and rights of consumer)

प्रत्येक घरात वीज

सरकारी नियमांनुसार वीज ग्राहकांना किमान निर्धारित सेवा मिळणे अपेक्षित आहे. याविषयी बोलताना केंद्रीय उर्जामंत्री आर. के. सिंह यांनी देशात सर्व घरात वीज पोहोचवण्याचे लक्ष निश्चित केल्याचं सांगितलं. त्यानुसार प्रत्येक घरात वीजपुरवठा केला जाणार आहे, असं सिंह म्हणाले.

घरी बसून वीज जोडणीसाठी अर्ज

सरककारने प्रत्येक घरात वीजपुरवठा व्हावा म्हणून वीज जोडणीच्या प्रक्रियेत बदल केले आहेत. या बदलांनुसार नवी वीजजोडणी आणखी सोपी झाली आहे. त्यासाठी आता कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही. नवी वीजजोडणी करायची असेल तर ऑनलाईन फॉर्म भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर शहरी भागात 7 दिवसांच्या आत वीजजोडणी देणे बंधनकारक आहे. तसेच, नगरपालिका असणाऱ्या भागामध्ये ही मुदत 15 दिवसांची आहे. तर ग्रामीण भागात नवी वीज जोडणी हवी असेल तर कंपन्यांना त्यांच्या ग्राहकांना 30 दिवसांच्या आत वीजपुरवठा करावा लागेल. या नव्या नियमांमुळे ग्राहकांना वीजपुरवठ्याच्या बाबतीत हमी मिळाली आहे.

मीटर नाही मग वीज जोडणी नाही

नव्या नियमांनुसार वीजपुरवठ्याचे नियम कडक झाले आहेत. यानंतर कोणतीही नवी वीजजोडणी मीटर असल्याशिवाय दिली जाणार नाही. तसेच, वीज ग्राहकांना यानंतर प्रिपेड किंवा पोस्टपोड मीटर देण्यात येणार आहे. या नव्या मीटरद्वारे ग्राहकांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन वीजबिल भरता येईल

दरम्यान, केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या नियमांमुळे ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. तर वीजपुरवठा करणाऱ्या कंपन्यांना ग्राहकांना 24 तास वीज पुरवठा करावा लागेल. तसेच, सर्व प्रक्रिया ऑनलाईन झाल्यामुळे वीजजोडणीची कामेसुद्धा लवकर होणार असल्याचे सांगितले जातेय.

संबंधित बातम्या :

बिहारमध्ये पुन्हा नितीश-लालूंच्या कचाट्यात भाजप? भाजपचे ‘सुमो’ सक्रिय

सौरव गांगुलीचा हार्ट अटॅक बंगालमध्ये कुणाला राजकीय झटका देणार?

(New rule of central government on electricity use and rights of consumer)