Little JhunJhunwala : भारताला नवीन वॉरेन बफे सापडला! या लिटिल चॅम्पची कमाल, 24 व्या वर्षीच झाला 100 कोटींचा मालक

| Updated on: May 02, 2023 | 5:04 PM

Little JhunJhunwala : अवघ्या 24 व्या वर्षीच या भारतीय तरुणाने इतिहास रचला, शेअर बाजारातून 100 कोटी रुपये कमावले.

Little JhunJhunwala : भारताला नवीन वॉरेन बफे सापडला! या लिटिल चॅम्पची कमाल, 24 व्या वर्षीच झाला 100 कोटींचा मालक
Follow us on

नवी दिल्ली : भारतात मोठ्या आणि यशस्वी गुंतवणूकदारांची चर्चा होते, त्यावेळी राकेश झुनझनुवाला, डॉली खन्ना आणि राधाकृष्ण दमानी तर वॉरेन बफे यांचे नाव सर्वात अगोदर येते. पैशांतून पैसा कमविण्याचे त्यांचे कसब सर्वांनाच प्रेरणादायी आहे. पैशाला पैसा ओढतो, ही म्हण त्यांनी यशस्वी केली आहे. बाजारात काही दशकानंतर मोठा उलटफेर होतोच. आता जुन्या पिढीला हेवा वाटावा असा एक स्टार आता शेअर बाजारात (Stock Market) उगावला आहे. या तरुणाने अवघ्या 24 व्या वर्षीच शेअर बाजारातून 100 कोटी रुपये कमावले. या तरुणाला आतापासूनच लिटिल झुनझुनवालाच (Little JhunJhunwala) नाही तर भारताचा नवीन वॉरेन बफे (Warren Buffet) म्हणून ओळखले जात आहे.

अशी केली कमाल
तर या लिटिल झुनझुनवालाचे नाव आहे संकर्ष चंदा (Sankarsh Chanda). शेअर बाजारात भल्याभल्यांना घाम फुटतो. गुंतवणूक करताना अनेक जण दहावेळा विचार करतात. बाजाराची स्ट्रॅटर्जी, बाजारावर विविध घटकांचा परिणाम यामुळे अनेक जण आजही बाजारात बिचकतात. पण या 24 वर्षीय तरुणाने या कठीण कामात कौशल्य मिळवले. त्याने शेअर बाजारातून 100 कोटी रुपये कमावले. त्याचे नाव जगातील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांच्या यादीत समाविष्ट झाले. तो केवळ गुंतवणूकदारच नाही तर एक उद्योजक पण आहे. त्याने सवर्त वा स्वबोध नावाची फिनटेक कंपनी सुरु केली आहे.

कोण आहे संकर्ष चंदा
हैदराबाद येथील संकर्ष चंदाने पहिल्यांदा अवघ्या 17 व्या वर्षी गुंतवणूक केली होती. त्यावेळी तो ग्रेटर नोएडातील एका विद्यापीठात कंम्प्युटर सायन्स या विषयात बीटेकचं शिक्षण घेणार होता. दोन वर्षांत शेअर बाजारात जवळपास 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती आणि दोन वर्षांत त्याच्या शेअर्सचे मूल्य 13 लाख रुपये झाल्याचे संकर्षने एका मुलाखतीत सांगितले होते. अमेरिकेतील अर्थतज्ज्ञ बेंडामिल ग्राहम याने एक निबंध लिहिल्यानंतर संकर्ष स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूकीस तयार झाला होता. त्याने बाजाराचा अभ्यास सुरु केला.

हे सुद्धा वाचा

अधिक परताव्यासाठी हवा संयम
शेअर बाजारात अधिक परतावा हवा असेल तर संयम आणि धैर्य असणे अत्यंत गरजेचे आहे. एके काळी, जेके ग्रुप, मोहनलाल ग्रुप, थापर ग्रुप हे बाजारातील बादशाह होते. त्यानंतर सार्वजनिक क्षेत्राती कंपन्यांची मक्तेदारी आली. पण बाजारात चढउतार होत राहिला. कधी नरम तर कधी जोरदार उसळी, हा बाजाराचा स्वभाव आहे. त्यामुळे तुमच्या गुंतवणुकीला मोठा फटका बसतो तर कधी लॉटरी लागते. पण तुम्ही धैर्य ठेवले तर दीर्घकाळात तुम्हाला नक्कीच चांगला परतावा मिळतो. काहींना 40 वर्षांत परतावा मिळाला. त्यांचे 100 रुपये आज 44 हजार रुपये झाले आहेत. पण त्यासाठी धैर्य ठेवणे आवश्यक आहे.

बाजारात ओहोटी आली तर पळू नका
शेअर बाजारात दररोज भरती-ओहोटी येते. बाजाराचा तो मूळ स्वभाव आहे. कधी कधी पंधरा दिवस बाजारातून फायदा होत नाही. चांगला परतावा मिळत नाही. बाजार पडलेले असते, तेव्हा बाजारातून पळ काढू नका. बाजारातून लगेचच पैसा काढण्याची घाई करु नका. गुंतवणूक करतानाच ती विविध ठिकाणी आणि वेगवेगळ्या फॉर्ममध्ये केल्यास तुम्हाला एकदम फटका बसत नाही. त्यामुळे ज्या दिवशी बाजार कोसळतो, त्यादिवशी बाजारातून पळ काढू नका. त्यातून शिका, काय चूक झाली आणि काय करता आले, अशा पडत्या काळात कोणत्या गुंतवणूकदारांना फायदा झाला. त्यांनी काय स्ट्रॅटर्जी उपयोगात आणली याचा अभ्यास करा. नक्कीच फायदा होईल.