Pancard नाही तर या सेवा विसरून जा, जाणून घ्या आयकरचे नियम

Pan Card Income Tax Rules: 1 एप्रिल 2026 रोजीपासून नवीन आयकर नियम लागू झाला आहे. त्यामुळे अनेक बदल झाले आहेत. तर पॅनकार्ड नसेल तर काही सेवा मिळणार नाही तर काही वस्तू खरेदी करता येणार नाही. काय आहे हा नवीन बदल?

Pancard नाही तर या सेवा विसरून जा, जाणून घ्या आयकरचे नियम
पॅनकार्ड
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Apr 28, 2026 | 3:47 PM

Income Tax Act, 2025 आणि Income Tax Rules, 2026 लागू झाल्यानंतर अनेक मोठ्या व्यवहारात PAN अनिवार्य करण्यात आले आहे. पूर्वी अनेकांकडे पॅनकार्ड नसायचे. ते Form 60 भरुन अशा बड्या व्यवहारांची पूर्तता करत होते. आता त्याऐवजी Form 97 आला आहे. पण आता असे अनेक महत्त्वाचे व्यवहार आहेत की, त्यात Form 97 सुद्धा मंजूर नाही. अशा व्यवहारांसाठी थेट पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. या नवीन नियमांमुळे ज्यांनी पॅनकार्ड काढले नाही त्यांना पॅन कार्ड काढल्याशिवाय आता गत्यंतर नाही.

प्रक्रिया सोपी, वादविवादही नाही

नवीन Form 97 आणि Form 98 हे आता अत्यंत सोप्या भाषेत आणि प्री-फिल्ड फॉर्मेटमध्ये तयार करण्यात आले आहे. तांत्रिक गोष्टींचा वापर वाढवल्या गेल्याने चुका आणि वाद कमी करण्याचा प्रयत्न केला. कर विभागाच्या मते या नवीन बदलांमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. तर अर्जदारांची संख्या 80-85% टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे.

2 लाखांपेक्षा अधिकच्या खरेदीसाठी PAN गरजेचे

नवीन नियमानुसार 2 लाख रुपये अथवा त्यापेक्षा अधिकचे सामान, साहित्य खरेदी वा सेवांसाठी आता PAN देणे अनिवार्य आहे. यामध्ये सोने, चांदीचे दागिने, ठोकळे खरेदी करणे याचाही समावेश आहे. म्हणजे जर तुम्ही 2 लाख रुपयांपेक्षा जास्तीचे दागिने खरेदी करत असाल तर विना PAN card हे व्यवहार पूर्ण होऊ शकत नाही.

या व्यवहारांसाठी पॅनकार्ड अनिवार्य

सरकारने काही व्यवहारात करदात्यांना Form 97 ची सुविधा पण मिळणार नाही. यामध्ये 5 लाख रुपयांपेक्षा अधिकची कार खरेदी, क्रेडिट कार्डसाठीचा अर्ज, डिमॅट खाते उघडणे, 50,000 रुपयांपेक्षा जास्त असलेले म्युच्युअल फंड वा बाँडमधील गुंतवणूक याचा समावेश आहे. याशिवाय 10 लाख रुपयांपेक्षा अधिकची रक्कम जमा करणे अथवा काढणे. 1 लाख रुपयांपेक्षा अधिकचे व्यवहार आणि सूचीबद्ध नसलेल्या शेअरची खरेदी विक्रीसाठी पॅनकार्ड आवश्यक आहे.

पॅनकार्ड काढण्यासाठी चार नवीन फॉर्म

आता 1 एप्रिल 2026 नंतर पॅनकार्ड तयार करायचे असेल तर मोठे बदल झाले आहेत. केंद्र सरकारने जुने अर्ज पद्धती बाद केली आहे. नवीन पॅन कार्ड काढण्यासाठी आता चार नवीन फॉर्म, अर्ज आले आहेत. अर्थात प्रत्येक श्रेणीसाठी वेगळा अर्ज आहे. 93, 94, 95 आणि 96 असे चार अर्ज लागू करण्यात आले आहेत.

Follow Us