आता UPI वर मिळणार हातउसणे पैसे, कसा होणार फायदा, काय असेल प्रक्रिया, एका क्लिकवर जाणून घ्या

Pay Later Features on UPI: आता अडीअडचणी काळात युपीआयच्या मदतीने तुम्ही हातउसणी रक्कम घेऊ शकता. याविषयीचे फीचर लाँच झाले आहे. त्यामुळे युझर्सला उधारी करता येईल. काय आहे त्यासाठीची प्रक्रिया, कसा मिळेल तुम्हाला पैसा, कशी करावी लागेल परतफेड, एका क्लिकवर जाणून घ्या...

आता UPI वर मिळणार हातउसणे पैसे, कसा होणार फायदा, काय असेल प्रक्रिया, एका क्लिकवर जाणून घ्या
युपीआयवर मिळवा हातउसणे पैसे
| Updated on: Dec 28, 2025 | 4:30 PM

BharatPe-Yes Bank: अनेकदा पैशांची चणचण भासते आणि त्वरीत पैसा हवा असतो. त्यासाठी आपण नातेवाईक, मित्रमंडळी यांची मदत घेतो. पण अनेकदा काहींचे हात आखडतात. अशावेळी आता UPI Payment मदतीला धावणार आहे. मित्रांना, नातेवाईकांना त्रास न देता, छोट्या रक्कमेसाठी तुम्हाला युपीआय मदत करणार आहे. त्यामाध्यमातून तुम्ही काही दिवसांसाठी कर्ज घेऊ शकता. हातउसणे पैसे घेऊ शकता. या नवीन फीचर्सच्या आधारे युझर्सला उधारी करता येईल. काय आहे त्यासाठीची प्रक्रिया, कसा मिळेल तुम्हाला पैसा, कशी करावी लागेल परतफेड, याची माहिती जाणून घ्या.

BharatPe आणि Yes Bank चे फीचर्स

भारताची प्रसिद्ध फिनटेक कंपनी BharatPe ने Yes Bank सोबत मिळून एक नवीन सुविधा आणली आहे. तिचे नाव ‘Pay Later with BharatPe’ असं आहे. ही एक डिजिटल उधारी आहे. त्याआधारे तुम्ही UPI आधारे पेमेंट करू शकता. तुमच्या खात्यात पैसे नसले तरी तुम्हाला सहज कर्ज उपलब्ध होईल. ही सेवा पूर्णपणे NPCI (नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) वर आधारीत आहे. त्यामुळे सुरक्षा आणि विश्वासावर प्रश्न उपस्थित होणार नाही.

कोणत्याही कागदपत्रांशिवाय कर्ज

या नवीन फीचर्समध्ये कोणतेही नवीन कर्ज अथवा क्रेडिट कार्ड घेण्याची गरज नाही. BharatPe आणि Yes Bank च्या डिजिटल ऑनबोर्डिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने तुमचे क्रेडिट प्रोफाईल त्वरीत तपासून उधार पैसे देण्यात येतात. ही प्रक्रिया अवघ्या काही मिनिटात होते. ही रक्कम तुमच्या खात्यात लागलीच जमा होईल आणि तुम्ही हॉटेलचं अथवा वस्तू खरेदीचं बिल लागलीच चुकतं करू शकाल.

केव्हा परत करावे लागतील पैसे

या सेवेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ही रक्कम 45 दिवस बिनव्याजी वापरता येणार आहे. Pay Later with BharatPe द्वारे पेमेंट कराल तर युझर्सला ही रक्कम परत करण्यासाठी 45 दिवस मिळतील. सव्वा महिन्यानंतर युझर्सला ही रक्कम परत करता येईल. त्यासाठी एक रुपयाही शिल्लक द्यावा लागणार नाही. त्यावर व्याज द्यावे लागणार नाही. म्हणजे कोणत्याही अतिरिक्त खर्चाव्यतिरिक्त ही रक्कम वापरता येईल. व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी तर ही एक सुवर्णसंधी आहे.

EMI च्या माध्यमातून चुकते करा पैसे

जर एखादा युझर्स 45 दिवसात उसणवारीचा पैसा परत करणार नाही, तर त्याला अजून एक सुविधा देण्यात आली आहे. त्याला EMI च्या माध्यमातून पैसे परत करता येतील. त्याच्यासाठी ईएमआयचा पर्याय आहे. BharatPe ग्राहकाला 3 महिन्यांपासून ते 12 महिन्यांपर्यंत अगदी सोपे हप्ते पाडून ही रक्कम भरण्याची सुविधा देते. यामुळे तुमचे बजेट बिघणार नाही आणि कर्जाचा बोजा पडणार नाही.