AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : कोणत्या मुघल बादशहाला मटण-चिकन होता तिटकारा ? शाकाहाराला होती पहिली पसंती…

मुघलकाळातील आहारात केवल कबाब आणि मटणाचा दबदबा नव्हता. मुघलकाळात काही बादशाहा असेही होते जे साधा आहार घ्यायचे.

GK : कोणत्या मुघल बादशहाला मटण-चिकन होता तिटकारा ? शाकाहाराला होती पहिली पसंती...
Vegetarian Mughal Emperor
| Updated on: Dec 28, 2025 | 4:59 PM
Share

मुघलकाळाचा विचार करता शाही दावती, कबाब, कोरमा आणि मटणाने भरलेली पक्वाने आठवत असतील. सर्वसाधारण धारणा अशी आहे की मुघल बादशाह मटणाशिवाय जेवणाची कल्पनाही करत नव्हते. परंतू इतिहासाची पाने उलटताच जे सत्य बाहेर येते ते वेगळे आहे. काही मुघल शासक असे होते ज्यांच्या थाळीत मांस नसायचे. ते शाकाहारी भोजनाला प्राधान्य देत होते. चला तर त्यांच्याबद्दल जाणून घेऊया…

मुघलांची रसाई आणि प्रचलित समज

इतिहासात मुघल साम्राज्यात नेहमीच मासांहारी पदार्थांची रेलचेल होती. शाही रसाईत बिर्याणी, कोरमा आणि कबाब जरुर तयार होत होते. परंतू प्रत्येक मुघल बादशाहा मठण प्रेमी होता असे मानणे योग्य होणार नाही.अनेक ऐतिहासिक ग्रंथात आणि समकालिन लेखणातून कळते की अकबर, जहागिर आणि औरंगजेब सारख्या शासकाचा कल काळाबरोबर भाज्या आणि साध्या भोजनाकडे होते.

अकबर शिकारी, परंतू मर्यादित मांसाहारी

मुघल बादशाह अकबरला शिकारीचा शौक होता. परंतू मटणाशी त्यांना खास लगाव नव्हता. त्यांचे नवरत्न अबुल फजल याने ‘आईन-ए-अकबरी’ मध्ये विस्ताराने लिहीलेय की अकबराने हळूहळू मांस खाणे टाळायला सुरुवात केली होती. सुरुवातीला ते शुक्रवारी मांस खात नव्हते. नंतर त्यांनी रविवारीही मटण खाणे सोडले. यानंतर दर महिन्याच्या पहिल्या तारीख, मार्चचा संपूर्ण महिना आणि त्याच्या जन्माचा ऑक्टोबर महिना त्यांनी शाकाहारी राहण्याचा नियम बनवला होता.

अकबराच्या थाळीत काय असायचं

अबुल फजल यांच्या मते अकबर त्यांच्या भोजनाची सुरुवात दही आणि भाताने करायचे. त्यांचे स्वयंपाक घर तीन भागात वाटलेले होते. ज्यात पहिला हिस्सा पूर्ण शाकाहारी होता. अकबर यांना पुलाव, डाळ आणि मोसमी भाज्या अधिक पसंत होत्या. ते असे मानायचे की संयमित भोजनाने न केवळ शरीरच नव्हे कर मन देखील संतुलित रहायचे.

जहांगीर आणि शाहजहां यांचा आहार

अकबर यांचे पूत्र जहांगिरला देखील मांस इतके आवडत नसायचे. ऐतिहासिक उल्लेखानुसार जर त्यांना जर मटण मिळाले नाही तर ते अस्वस्थ व्हायचे नाहीत. शाहजहा यांच्या जेवणात धार्मिक आणि नैतिक झुकाव अधिक पाहायला मिळायचा. असे म्हटले जाते की ते दर गुरुवार आणि रविवार मांस खायचे नाहीत. आणि याच दोन दिवसात त्यांना पशु हत्येवर बंदी घातली होती.

शाकाहार आणि शासनाचा विचार

इतिहासकारांच्या मते अकबर आणि शाहजहा सारख्या शासकांचे खानपान त्यांच्या प्रशासकीय आणि धार्मिक दृष्टीकोणाशी जोडलेले होते. शाहजहाच्या काळात स्वयंपाके शाकाहारी जेवणातही तसाच स्वाद आणण्याचा प्रयत्न करायचे जसा मांसाहारी पदार्थात असतो. फळ उत्पादनांसाठी शेतकऱ्यांना करात सूट देण्याचा निर्णयही याच विचाराचा भाग होता.

औरंगजेबाला शाकाहारी पसंद

इतिहासकार आणि भोजन तज्ज्ञ सलमा हुसैन यांच्या मते आयुष्याच्या सुरुवातीला औरंगजेब मांसाहारी होता. परंतू राज्याभिषेकानंतर हळूहळू त्याने शाही आहार आणि मांसापासून अंतर राखायला सुरुवात केली. नंतर तो जवळपास शाकाहारी झाला. त्याच्या ताटात साधे जेवण, डाळ, भाजी आणि इतर शाकाहारी जिन्नस असायचे.

औरंगजेबाचा आवडता पदार्थ

औरंगजेबाने गव्हापासून बनलेले कबाब, चण्याच्या डाळी पासून बनलेला पुलाव आणि आंबे पसंद होते. पनीर पासून बनलेले कोफ्ते आणि फळांपासून तयार पदार्थ त्याला आवडायचे. तरुणावस्थेत शिकारीला जाणारा औरंगजेब नंतर वृद्धाप काळात शिकारीला रिकामटेकड्या बेकार लोकांचे मनोरंजन असे म्हणू लागला.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.