AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Paytm ची ग्राहकांना गुड न्यूज, दिवाळीआधी युजर्सना गिफ्ट

पेटीएम वॉलेटमधून पैसे ट्रान्सफर करण्यावर 5 टक्के शुल्क आता काढून टाकण्यात आला आहे.

Paytm ची ग्राहकांना गुड न्यूज, दिवाळीआधी युजर्सना गिफ्ट
| Edited By: | Updated on: Nov 02, 2020 | 6:46 PM
Share

नवी दिल्ली : डिजिटल वित्तीय सेवा देणारी कंपनी पेटीएम (Paytm) ने दिवाळीआधी ग्राहकांसाठी मोठी भेट दिली आहे. पेटीएम वॉलेटमधून पैसे ट्रान्सफर करण्यावर 5 टक्के शुल्क आता काढून टाकण्यात आला आहे. कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी स्वत: ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. (paytm diwali gift to remove charges to add money in your account from wallet)

आता मोफत आहे सेवा खरंतर, पेटीएम वॉलेटमधून आपल्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी 5 टक्के शुल्क द्यावा लागतो. पण आतापासून हा द्यावा लागणार नाही. याचवेळी, पेटीएमवर बँक खात्यातून पैसे जोडण्यासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. म्हणजेच आधी पेटीएमवरून तुमच्या खात्यात 5000 रुपये जोडण्यासाठी तुमचे 250 रुपये रापले जायचे पण आता ही रक्कम कापली जाणार नाही.

क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये कोणताही बदल नाही कंपनीने ही सुविधा फक्त पेटीएम वॉलेटमधून पैसे आपल्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यासाठी सुरू केली आहे. क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे इथे शुल्क आकारला जाईल. कंपनीने हा नियम 15 ऑक्टोबरपासून लागू केला होता. यामध्ये जर एखाद्या व्यक्तीने पेटीएम वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डने पैसे जोडले तर त्याला 2 टक्के अतिरिक्त शुल्क भरावा लागणार आहे. या दोन टक्के शुल्कात जीएसटीदेखील असणार आहे.

अशी करा 1 लाखांपर्यंत खरेदी पेटीएमच्या पोस्टपेड सेवेमधून तुम्ही 1 लाख रुपयांपर्यंत खरेदी करू शकता. याद्वारे तुम्ही किराणा, किरकोळ दुकानात आणि सगळ्यात खास म्हणजे कोणत्याही आवडत्या अ‍ॅप्सवर खरेदी करू शकता. पेटीएम पोस्टपेड ग्राहकांना डिजिटल क्रेडिट ऑफर देत आहे.

इतर बातम्या – 

कोणताही फोन खरेदी करा आणि मिळवा 100 टक्के कॅशबॅक, Flipkart ची जबरदस्त ऑफर

ICICI बँकेच्या नफ्यामध्ये मोठी वाढ, कोरोनाच्या संकटातही 6 पटीनं झाला फायदा

(paytm diwali gift to remove charges to add money in your account from wallet)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली