Personal Loan: वैयक्तिक कर्ज झाले मंजूर, पण आता बदलला मूड? कर्ज रद्द करता येईल का?

Personal Loan Rules Update: वैयक्तिक कर्ज हे अडचणीत मदतीला येते. त्यामुळे अनेक जण वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करतात. पण एखाद्यावेळी दुसरीकडून आर्थिक मदत मिळते. मग अशावेळी मंजूर वैयक्तिक कर्ज नाकारता येते का? काय सांगतो नियम?

Personal Loan: वैयक्तिक कर्ज झाले मंजूर, पण आता बदलला मूड? कर्ज रद्द करता येईल का?
वैयक्तिक कर्ज रद्द करता येते का?
| Updated on: Nov 20, 2025 | 2:04 PM

How to cancelled personal loan: अचानक पैशांची गरज पडली तरी आपण पर्सनल लोन (Personal Loan) हा एक चांगला पर्याय आहे. विना हमी तुम्हाला वैयक्तिक कर्ज घेता येते. ही प्रक्रिया पण अत्यंत सोपी असते. कमी कागदपत्रांआधारे बँका वैयक्तिक कर्ज मंजूर करतात. पण अनेकदा असे होते की वैयक्तिक कर्ज मंजूर होते. पण दुसरीकडून पैशांची व्यवस्था झाल्यावर तुम्हाला वैयक्तिक कर्ज नको असते, अशावेळी पर्सनल लोन नाकारता येते का? काय आहे याविषयीचा नियम, जाणून घ्या.

1.पैसे खात्यात न आल्यास- कर्ज मंजुर झाले. पण पैसे खात्यात आले नाही, तर ही वैयक्तिक कर्ज रद्द करण्याची योग्य वेळ मानल्या जाते. जर बँकेने तुमचे कर्ज मंजूर केले आहे आणि पैसे तुमच्या खात्यात हस्तांतरीत झाले नाही तर विना तक्रार बँका हे कर्ज रद्द करतात.

यासाठी तुम्हाला बँक अथवा संबंधित वित्त संस्थेला ई-मेल अथवा फोन करावा लागेल. अथवा संबंधित शाखेत जाऊन एक अर्ज करावा लागेल. काही बँकांकडे कर्ज रद्द करण्याविषयीचा अर्ज असतो. तो भरून द्यावा लागतो. या प्रक्रियेत बँका अथवा वित्त संस्था कोणतेही शुल्क आकारत नाही. कारण अर्ज प्रक्रियेदरम्यानच तुम्ही प्रक्रिया शुल्क अदा केलेले असते. जे परत देण्यात येत नाही.

2. पैसे खात्यात आल्यावर – तुमच्या खात्यात कर्जाची रक्कम आली आणि दुसरीकडूनही तुमच्या पैशांची तजवीज झाली, अशावेळी कर्ज रद्द करण्याविषयीची विनंती करता येते. याला कूलिंग ऑफ पीरियड असे म्हणतात. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, अनेक बँका ग्राहकांना फ्री लूक पीरियड देते.

म्हणजे कर्जाची रक्कम तुमच्या खात्यात जमा केल्यावरही साधारणपणे 3 ते 7 दिवसांपर्यंत तुम्ही प्री-पेमेंट पेनल्टी शिवाय कर्ज रद्द करू शकता. यामध्ये तुम्हाला त्वरीत बँकेकडे संपर्क करून कर्जाची रक्कम परत घेण्याची विनंती करावी लागते. कर्जाची रक्कम पूर्णपणे बँकेला परत करावी लागते. अर्थात या कालावधीतील व्याज मात्र द्यावे लागते. इतर कोणतेही शुल्क बँकेला आकारता येत नाही.

3. कूलिंग-ऑफ पीरियड संपल्यानंतर- जर कूलिंग ऑफ पीरियड संपला तर तुम्हाला वैयक्तिक कर्ज रद्द करता येत नाही. त्यात एकच मार्ग उरतो, तो म्हणजे शक्य तितक्या लवकर कर्ज परत करणे. त्याला प्री-पेमेंट (Pre-payment) अथवा फोरक्लोजर (Foreclosure) असं म्हटल्या जाते. यामध्ये कर्जाची मुळ रक्कम आणि त्यावरील व्याज हे एकरक्कमी भरल्या जाते. अनेक बँका या प्री-पेमेंटवर शुल्क आकारतात. त्याला प्री-पेमेंट पेनेल्टी अथवा फोरक्लोजर शुल्क म्हटल्या जाते. हे मुळ रक्कमेच्या 1% चे 5% पर्यंत असते. तर काही बँका या एक “लॉक-इन पीरियड” 6 ते 12 महिन्यांचा ईएमआय चुकवण्यापर्यंत ठेवते. त्यापूर्वी तुम्हाला कर्ज अगोदरच फेडता येत नाही.