EPFO मधून काढायचीये पेन्शन? जाणून घ्या हा नवीन नियम, नाहीतर खात्यात येणार नाही रक्कम
EPFO Pension Amount New Rules: अडचणीच्या काळात अनेक जण ईपीएफओ खात्यातून रक्कम काढतात. पण ही रक्कम काढण्यापूर्वी नवीन नियम समजून घ्या. म्हणजेच तुमची अडचण होणार नाही. नवीन नियम जाणून घ्या.

Pension New Rules: केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ही केवळ बचत योजना नाही. तर गरजेच्यावेळी मदतील येणार फंड सुद्धा आहे. कर्मचारी पेन्शन योजना (EPS) उतारवयात आधार देते. ही रक्कम खर्चासाठी उपयोगी पडते. अनेकजण लग्नकार्य, घर बांधकाम, आजारपण यासाठी सुद्धा रक्कम काढतात. पण अलिकडेच EPFO ने या योजनेत पाच मोठे बदल केले आहेत, ज्याचा थेट परिणाम लाखो पेन्शनधारकांवर होणार आहे. जाणून घ्या पेन्शन नियमांमध्ये काय बदल झाले?
पेन्शन नियमातील मोठे बदल
पेन्शनचे गणित बदलले
पूर्वी पेन्शन ही अंतिम वेतनावर आधारीत होती. आता निवृत्ती वेतन गेल्या 60 महिन्यांतील सरासरी वेतनावर आधारीत आहे. जर वेतनात हळूहळू वाढ झाली तर पेन्शन पूर्वीपेक्षा अधिक योग्य आणि मोठी असेल. म्हणजे जर एखाद्याचे अखेरचे वेतन हे 50 हजार असेल आणि सरासरी 40 हजारांपेक्षा कमी असेल तर आता सरासरीवर योग्य पेन्शन मिळेल. हा बदल 1 सप्टेंबर 2014 रोजीपासून लागू आहे.
पेन्शनच्या रक्कमेत वाढ
EPFO ने कमाल निवृत्ती वेतनाची रक्कम 7,500 रुपयांहून 15 हजार रुपये प्रति महिना केली आहे. याचा अर्थ आता पूर्वीसारखे ज्यांना अधिक पगार होता पण तरीही पेन्शन कमी मिळत होती. तसे होणार नाही. त्यांना आता 15 हजारांपर्यं पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर हा बदल झाला आहे.
ऑनलाईन दावा प्रक्रिया सोपी
पूर्वी पेन्शनसाठी किमान वय 58 वर्षे होते. ते आता 50 वर्षे करण्यात आले आहे. याचा अर्थ असा की जर तुम्ही 50 वर्षांचे झालात तर आता पेन्शन मिळण्यास पात्र होणार आहात. कमी वयात पेन्शनची रक्कम मिळत असल्याने ती कमी असेल. पण त्यामुळे थोडीफार आर्थिक मदत दरमहा मिळेल. आता ऑनलाईन दावा प्रक्रिया(Online Claiming Process) सोपी झाली आहे.
सुधारीत पेन्शन पोर्टेबिलिटी
जर तुम्ही वारंवार नोकऱ्या बदलत असाल तर आता ईपीएफओ खाते हस्तांतरीत करण्याची गरज नसेल. ही प्रक्रिया नवीन कंपनी एका अर्जाद्वारे झटपट पूर्ण करेल. कोणत्याही ब्रेकशिवाय, जुनी आणि नोकरीमधील सेवा एकत्र करून पेन्शनची गणना केली जाईल. हे सर्व बदल 15,000 रुपयांपर्यंत ज्यांचे वेतन आहे. त्यांच्यासाठी आहे. जर यापेक्षा तुमचे वेतन अधिक असेल तर नियमांची माहिती ईपीएफओच्या संकेतस्थळावरून जाणून घेता येईल.
