Virat Kohli : नशीब, विराट कोहलीच्या शतकामुळे टळलं लाखोंच नुकसान, हैराण करणारा खुलासा
Virat Kohli : टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे सीरीजमधील शेवटचा सामना विशाखापट्टनम विरुद्ध खेळणार आहे. या मॅचच्यावेळी स्टेडिअम हाऊसफुल असेल. विराट कोहली दोन मॅचमध्ये दोन शतकी इनिंग खेळला आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरु असलेली तीन सामन्यांची वनडे सीरीज रोमांचक वळणावर आहे. 1-1 बरोबरीत असलेल्या या सीरीमधील शेवटचा सामना 6 डिसेंबर 2025 रोजी विशाखापट्टणमच्या डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडिअममध्ये खेळला जाणार आहे. या सामन्याच्यावेळी संपूर्ण स्टेडिअम खच्चाखच भरलेलं असेल. याचं कारण आहे विराट कोहली.कोहलीचा जलवाच असा आहे की, संपूर्ण स्टेडिअम भरतं. यावेळी त्याने आंध्र क्रिकेट असोशिएशनला मोठ्या नुकसानीपासून वाचवलं आहे.
विराट कोहलीसाठी आतापर्यंत ही सीरीज शानदार राहिली आहे. त्याने पहिल्या दोन सामन्यात शतकी खेळी केली. याचा परिणाम विशाखापट्टणममधील तिकीट विक्रीवर सुद्धा झाला. एका रिपोर्ट्नुसार, रांचीमध्ये विराट कोहलीने झळकवलेल्या शतकानंतर विशाखापट्टणमच्या तिकीट विक्रीत मोठी वाढ झाली आहे. कोहलीची जादू अजूनही ओसरली नसल्याचा हा पुरावा आहे. त्याच्या सलग दोन शतकांमुळे तिकीटांची किंमत गगनाला भिडली आहे.
135 धावांची इनिंग खेळला
या मॅचची पहिल्या फेजची तिकीटं 28 नोव्हेंबरला विक्रीसाठी उपलब्ध झाली होती. पण तिकीटांची जास्त विक्री झाली नाही. त्यानंतर विराट कोहली 30 नोव्हेंबरला रांची येथे झालेल्या सामन्यात 135 धावांची इनिंग खेळला. त्यामुळे 1 आणि 3 डिसेंबरला तिकीटं ऑनलाइन झाल्यानंतर काही मिनिटात विकली गेली. या मॅचसाठी तिकीटांच्या किंमती 1200 रुपयापासून 18000 रुपयापर्यंत ठेवण्यात आलेल्या. पण एकही तिकीट शिल्लक राहिली नाही.
आणखी एका शतकाची अपेक्षा
विराटच्या एका शतकाने सर्वकाही बदललं. फॅन्समध्ये या मॅचबद्दल उत्साह वाढला आहे. स्थानिक क्रिकेट असोशिएशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, कोहलीच्या फॅन्सनी रांचीची इनिंग पाहून तिकीट खरेदी सुरु केली. फॅन्सना आता कोहलीकडून आणखी एका शतकाची अपेक्षा आहे.
विराटसाठी हे मैदान खास
विराट कोहलीसाठी हे ग्राऊंड खूप खास आहे. तो आतापर्यंत इथे 7 वनडे सामने खेळला आहे. या दरम्यान त्याने बॅटमधून 97.83 च्या सरासरीने 587 धावा केल्या आहेत. यात तीन शतकं आणि दोन अर्धशतकं आहेत. त्याशिवाय विशाखापट्टणममध्ये त्याने दोन टेस्ट मॅचमध्ये एक शतक आणि एका अर्धशतकाच्या मदतीने 299 धावांची खेळी केली.
