Petrol Diesel Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या दरात घसरण, मुंबईत पेट्रोल डिझेलचे दर काय?

| Updated on: Sep 30, 2021 | 12:44 PM

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त होऊन देखील भारतीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. तज्ज्ञांच्या मतानुसार आतंरराष्ट्रीय बाजारात क्रुड ऑईलचे दर कमी होणे हा चांगला संकेत आहे. मात्र, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या दरात झालेल्या घसरणीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलांचा ग्राहकांना फायदा मिळत नाही.

Petrol Diesel Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या दरात घसरण, मुंबईत पेट्रोल डिझेलचे दर काय?
पेट्रोल
Follow us on

Petrol Price Today नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त होऊन देखील भारतीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. मुंबईत एक लीटर पेट्रोलचा दर 107.71 रुपये तर डिझेलचा दर 97.52 रुपयांपर्यंत गेला आहे. दिल्लीत एक लीटर पेट्रोलचा दर 101.64 रुपयापर्यंत पोहोचला आहे तर डिझेलचा दर 89.91 रुपयांवर गेला आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार आतंरराष्ट्रीय बाजारात क्रुड ऑईलचे दर कमी होणे हा चांगला संकेत आहे. मात्र, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या दरात झालेल्या घसरणीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलांचा ग्राहकांना फायदा मिळत नाही.

जाणून घ्या मुंबईतील पेट्रोल-डिझेलचे नवीन दर

मुंबईत पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 97.52 रुपये प्रति लीटर आहे. दिल्लीत पेट्रोल 101.64 रुपये आणि डिझेल 89.87 रुपये प्रति लीटर आहे. त्याचबरोबर चेन्नई पेट्रोल 99.36 रुपये आणि डिझेल 94.45 रुपये प्रति लीटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 102.17 रुपये आणि डिझेल 92.97 रुपये प्रति लीटर आहे.

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

असे तपासा पेट्रोल आणि डिझेलचे भाव

आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

भविष्यात कच्चे तेल स्वस्त होईल का?

रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या मते, ओपेक ही कच्ची तेल निर्यात करणारी कंपनी नोव्हेंबरमध्ये कच्च्या तेलाचा पुरवठा प्रतिदिन 4 लाख बॅरलने वाढवू शकते. यामुळे इंधनाच्या किंमती कमी होऊ शकतात.

दसऱ्यापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचे सर्व रेकॉर्डस मोडीत निघणार?

आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी होत असल्याने खनिज तेलाचे दर वाढत आहेत. गेल्या तीन आठवड्यांपासून कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढीचा कल आहे. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 80 च्या जवळ पोहोचली आहेयेत्या एक ते दोन आठवड्यांत देशांतर्गत बाजारात पेट्रोलच्या किंमतीत झपाट्याने वाढ होऊ शकते. अनेक शहरांमध्ये ते 110 रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

गेल्या काही दिवसांत जागतिक बाजारपेठेत खनिज तेलाचा दर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे भारतीय पेट्रोलियम कंपन्या आणखी किती काळ नुकसान सोसून इंधनाचे दर स्थिर ठेवणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, लवकरच सामान्य नागरिकांना याचा फटका बसू शकतो. दसऱ्यापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती नवे उच्चांक प्रस्थापित करतील, असा जाणकारांचा होरा आहे. प्रत्यक्षात असे घडल्यास सामान्य नागरिकांना त्याची प्रचंड झळ सोसावी लागेल.

इतर बातम्या:

खनिज तेलाचा दर घसरल्यानंतही भारतात पेट्रोल-डिझेल अजूनही महाग का?

…म्हणून मोदी सरकार इंधनावरील कर कमी करण्यासाठी अनुत्सुक?

पेट्रोल-डिझेल पाठोपाठ आता सीएनजीच्या किंमतीही भडकल्या, पाहा किलोमागे किती रुपयांची वाढ…

Petrol Diesel Rate Today update on 30 September 2021 Thursday Check rates in your city Mumbai Delhi