AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol diesel price today : अखेर तेच घडलं… तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव काय? पटापट करा चेक

अमेरिका-इराणमधील तणाव कायम आहे, तिकडे कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 95 डॉलर्सवर पोहोचली आहे. आज भारतातील प्रमुख शहरांत पेट्रोल- डिजेलचे रेट बदलले आहेत का, 1 लिटर पेट्रोलची किंमत किती, जाणून घेऊया सविस्तर..

Petrol diesel price today : अखेर तेच घडलं… तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव काय? पटापट करा चेक
तुमच्या शहरात पेट्रोल- डिझेलचे दर किती ?
| Updated on: Jun 11, 2026 | 8:55 AM
Share

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढताना दिसतोो आणि या घडामोडीचा आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींवर मोठा परिणाम होत आहे. कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 95 डॉलरच्या पुढे गेल्या आहेत. या तीव्र वाढीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. देशातील सामान्य जनतेसाठी एक मोठी दिलासादायक बातमी म्हणदे, सध्या तरी इंधनांच्या दरांमध्ये देशांतर्गत कोणताही बदल झालेला नाही. जागतिक बाजारपेठेतील अस्थिरतेनंतरही, भारतातील पेट्रोलचे दर जागतिक सरासरी आणि आपल्या शेजारील देशांमधील दरांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी आहेत.

जगाच्या तुलनेत भारतात पेट्रोल स्वस्त

जागतिक आकडेवारीवर बारकाईने नजर टाकली तर, ग्राहकांच्या दृष्टीने भारताची स्थिती सध्या खूप चांगली असल्याचं दिसून येतं. जागतिक पेट्रोल दरांबाबतच्या ताज्या आकडेवारीनुसार, सध्या जगभरात पेट्रोलची सरासरी किंमत प्रति लिटर सुमारे 144.36 रुपये इतकी आहे. याउलट, भारतात पेट्रोलची सरासरी किंमत साधारणपणे 108.71 रुपयांवर स्थिर आहे. याचाच अर्थ असा की, सामान्य भारतीय नागरिकाला जागतिक सरासरी दरापेक्षा साधारण 36 रुपये कमी दराने पेट्रोल मिळत आहे. शिवाय, आपल्या शेजारील सातही देशांमधील—पाकिस्तान (129.47७), श्रीलंका (139.72) नेपाळ ( 135.74), बांगलादेश (112.94), चीन (126.34), म्यानमार (133.28८) आणि भूतान (109.73)— असे दर आहेत, म्हणजेच या देशात इंधनाचे दर भारताच्या तुलनेत बऱ्यापैकी जास्त आहेत.

देशातील प्रमुख शहरात आज इंधनाचे दर किती ?

भारतीय तेल कंपनी ‘आयओसी’ (IOC) ने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, आज देशभरातील प्रमुख शहरांमधील ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणत्याही नवीन वाढीचा सामना करावा लागणार नाही. राजधानी दिल्लीमध्ये सध्या सामान्य पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.12 रुपये आहे, तर डिझेलचा दर प्रति लिटर 95.20 रुपये आहे. तर आर्थिक राजधानीत एक लीटर पेट्रोल हे 111.21 रुपये आणि डिझेल 97.83 रुपये इतके आहे. त्याचप्रमाणे, चेन्नईमधील लोकांना 1 लिटर पेट्रोलसाठी 107.77 रुपये तर डिझेलसाठी 99.55 रुपये मोजावे लागत आहेत. कोलकातामधील पेट्रोलचा दर 113.51 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 99.82 रुपये प्रति लिटर इतका आहे.

शहर पेट्रोलचे दर (रुपये/लीटर) डिझेलचे दर (रुपये/लीटर)
दिल्ली 102.12 95.20
कोलकाता 113.51 99.82
मुंबई 111.21 97.83
चेन्नई 107.77 99.55
नोएडा 102.12 97.56
चंदीगड 101.51 89.47
लखनऊ 101.89 95.36
पाटणा 113.37 99.36
रांची 105.26 100.49
भोपाळ 114.57 99.64

SMS वरून जाणून घ्या लेटेस्ट दर

जर तुम्ही इंडियन ऑईलचे (IOC) ग्राहक असाल तर तुमच्या मोबाईलवरून RSP टाइप करून तो मेसेज 9224992249 वर पाठवा. तर भारत पेट्रोलियम (BPCL) चे ग्राहक 9223112222 या नंबरवर, हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) चे ग्राहक 9222201122 या नंबरवर HPPRICE असं लिहून आपला मेसेज पाठवून इंधनाचे दर जाणून घेऊ शकतात. या मेसेजमध्ये तुम्हाला तुमच्या शहराचा कोडही नमूद करावा लागेल. वेबसाईट्सवर हा कोड सहज उपलब्ध होतो.

Follow Us
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान