AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अॅमेझॉन प्रमुखाचा फोन हॅक, खासगी फोटो लिक

मुंबई : अॅमेझॉनचे प्रमुख (AMAZON CEO) जेफ बेजोस (Jeff Bezos) यांचा फोन हॅक करुन त्यांचे खासगी फोटो लिक केल्याचा प्रकार घडला आहे. त्यानंतर तपास करणाऱ्या पथकाने बेजोस यांच्या फोन हॅकिंगमागे सौदी अरबचे अधिकारी असल्याचे म्हटले आहे. त्यांनीच बेजोस यांची खासगी माहिती मिळवण्यासाठी हे कृत्य केल्याचे तपास अधिकारी गाविन डी. बेकर यांनी सांगितले. बेकर यांनी या […]

अॅमेझॉन प्रमुखाचा फोन हॅक, खासगी फोटो लिक
Amazon CEO Jeff Bezos
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM
Share

मुंबई : अॅमेझॉनचे प्रमुख (AMAZON CEO) जेफ बेजोस (Jeff Bezos) यांचा फोन हॅक करुन त्यांचे खासगी फोटो लिक केल्याचा प्रकार घडला आहे. त्यानंतर तपास करणाऱ्या पथकाने बेजोस यांच्या फोन हॅकिंगमागे सौदी अरबचे अधिकारी असल्याचे म्हटले आहे. त्यांनीच बेजोस यांची खासगी माहिती मिळवण्यासाठी हे कृत्य केल्याचे तपास अधिकारी गाविन डी. बेकर यांनी सांगितले.

बेकर यांनी या हॅकिंगचा संबंध सौदी अरबचे पत्रकार जमाल खशोगी यांच्या हत्येशी असल्याचे म्हटले आहे. ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ या वर्तमानपत्राचे मालकी अधिकार अॅमेझॉनचे प्रमुख बेजोस यांच्याकडेच आहेत. याच वर्तमानपत्राने पत्रकार खशोगी यांच्या हत्येचा पाठपुरावा केला होता. खशोगी यांची हत्या तुर्कीच्या इस्तांबुलमधील सौदी अरबच्या दूतावासात घडली होती. यावर द वॉशिंग्टन पोस्टने सौदी सरकारच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले होते.

बेकर यांनी ‘द डेली बीस्ट’ या वेबसाईटवर लिहिले, ‘‘आमच्या तपास अधिकाऱ्यांनी आणि अनेक तज्ज्ञांनी तपासाअंती निष्कर्ष काढला आहे. यानुसार सौदी अरबनेच बेजोस यांचा फोन हॅक करुन त्यांची खासगी माहिती मिळवली.’’

पाहा व्हिडीओ :

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली