PM Kisan : सरकारने नियम बदलले! आता ‘या’ कागदपत्राशिवाय शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत

| Updated on: Nov 18, 2021 | 12:17 PM

PM Kisan Samman Nidhi : रेशनकार्ड क्रमांक आल्यानंतरच पती किंवा पत्नी किंवा त्या कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळू शकेल. या योजनेंतर्गत नवीन नोंदणीवर शिधापत्रिका क्रमांक देणे बंधनकारक असेल. याशिवाय कागदपत्राची सॉफ्ट कॉपी तयार करून पोर्टलवर अपलोड करावी लागेल.

PM Kisan : सरकारने नियम बदलले! आता या कागदपत्राशिवाय शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना
Follow us on

नवी दिल्ली : तुम्ही पीएम किसानचे (PM Kisan) लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी ही खूप उपयुक्त बातमी आहे. सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे (PM Kisan Samman Nidhi) नियम बदललेत. पीएम किसान योजनेत (PM Kisan scheme) होणाऱ्या फसवणुकीसाठी सरकारने रेशन कार्ड अनिवार्य केलेय. आता शेतकऱ्यांना इतर कागदपत्रांसह शिधापत्रिका द्यावी लागणार आहे. त्याशिवाय हप्ता मिळणार नाही.

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळू शकेल

रेशनकार्ड क्रमांक आल्यानंतरच पती किंवा पत्नी किंवा त्या कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळू शकेल. या योजनेंतर्गत नवीन नोंदणीवर शिधापत्रिका क्रमांक देणे बंधनकारक असेल. याशिवाय कागदपत्राची सॉफ्ट कॉपी तयार करून पोर्टलवर अपलोड करावी लागेल.

आता ही कागदपत्रे द्यावी लागणार

जर तुम्ही पंतप्रधान किसान योजनेंतर्गत पहिल्यांदा नोंदणी केली तर अर्जदाराला शिधापत्रिका क्रमांक अपलोड करावा लागेल. याशिवाय PDF देखील अपलोड करावी लागणार आहे. आता सातबारा, आधार कार्ड, बँक पासबुक आणि घोषणापत्राच्या हार्ड कॉपी जमा करणे बंधनकारक करण्यात आलेय. आता कागदपत्रांची PDF फाईल तयार करून पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहे. यामुळे पीएम किसान योजनेतील फसवणूक कमी होईल. तसेच नोंदणी करणे पूर्वीपेक्षा सोपे होईल.

या तारखेला हप्ता येणार

सरकारने पीएम किसान (PM Kisan Samman Nidhi Yojana) योजनेंतर्गत 10 वा हप्ता जारी करण्याची तारीख निश्चित केलीय. हप्ता हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी या योजनेत आगाऊ नोंदणी करावी जेणेकरून त्यांना 10 व्या हप्त्याचा लाभ घेता येईल. केंद्र सरकार 15 डिसेंबर 2021 पर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 10 वा हप्ता जारी करण्याचा विचार करत आहे. सरकारने गेल्या वर्षी 25 डिसेंबर 2020 रोजी शेतकऱ्यांना पैसे हस्तांतरित केले होते.

सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये देते

पंतप्रधान किसान योजनेंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये मिळतात. शासन ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाइन वर्ग करते. तुम्हीही शेतकरी असाल पण या योजनेचा लाभ घेऊ शकत नसाल तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही PM किसान सन्मान निधी मध्ये तुमचे नाव देखील नोंदवू शकता, जेणेकरून तुम्हाला सरकारच्या योजनेचा लाभ घेता येईल.

संबंधित बातम्या

CNG Rate Today : सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, 1 किलोसाठी मोजावे लागणार इतके पैसे

चांगली बातमी! नव्या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार, मोदी सरकार लवकरच घोषणा करणार