ठाकरे सरकार PMC बँकेबाबत मोठ्या निर्णयाच्या तयारीत

ठाकरे सरकार पीएमसी बँकेच्या (PMC Bank may merge) खातेदारांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे. सरकार पीएमसी बँक राज्य सहकारी बँकेत विलीन करण्याच्या विचारात आहे.

ठाकरे सरकार PMC बँकेबाबत मोठ्या निर्णयाच्या तयारीत

मुंबई : ठाकरे सरकार पीएमसी बँकेच्या (PMC Bank may merge) खातेदारांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे. सरकार पीएमसी बँक राज्य सहकारी बँकेत विलीन करण्याच्या विचारात आहे. तशी विचारणा राज्य सरकारकडून राज्य सहकारी बँकेला करण्यात आल्याची माहिती, ठाकरे सरकारमधील मंत्री जयंत पाटील यांनी दिली. गरज पडल्यास आरबीआयशी चर्चा करण्याचीही सरकारची तयारी आहे. खातेदारांचं नुकसान होऊ नये म्हणून पीएमसी बँक राज्य सहकारी बँकेत विलीन करुन, आर्थिक मदत करण्याच्या विचारात राज्य सरकार आहे. राज्य सरकारने ही मोठी भूमिका घेतल्याने, हजारो खातेधारकांसाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे. (PMC Bank may merge)

पीएमसी बँकेच्या खातेदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न आहे. राज्य सहकारी बँकेत पीएमसी बँक विलीन करण्याचा विचार आहे. राज्य सरकारकडून राज्य सहकारी बँकेला विचारणा केली आहे. गरज पडल्यास आरबीआयची चर्चा करणार आहोत. आर्थिक मदत राज्य सरकार करणार आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

हायकोर्टात याचिका

दरम्यान पीएमसी बँक घोटाळ्याबबत मुंबई हायकोर्टात दाखल याचिकांवर काल सुनावणी झाली. याबाबतचा निकाल आज कोर्ट देणार आहे. काल झालेल्या सुनावणीवेळी याचिकाकर्ते यांच्या वकिलांनी बँकेवर नेमण्यात आलेले प्रशासक योग्यप्रकारे काम करत नाहीत,यामुळे खातेदारांना पैसे मिळण्यास उशीर होत आहे, त्यामुळे या बँकेवर कोर्टाच्या देखरेखीखाली एक समिती बनवावी आणि त्यामार्फत थकबाकीदारांची मालमत्ता विकून खातेदारांना त्यांचे पैसे देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली.

Published On - 2:50 pm, Thu, 5 December 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI