पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम : फक्त 100 रुपयात खातं उघडा आणि मिळवा 7000 रुपये

| Updated on: Feb 17, 2021 | 5:02 PM

पोस्ट ऑफिसची नॅशनल सैव्हिंग रेकरिंग डिपॉजिट अकाउंट ही स्कीम सध्या चांगल्या चर्चेत आहे. या स्कीमअंतर्गत गुंतवणूकदारांना सध्या 5.8 टक्के व्याज मिळत आहे (Post Office recurring deposit RD scheme invest RS 100 and get RS 7000 in 5 year).

पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम : फक्त 100 रुपयात खातं उघडा आणि मिळवा 7000 रुपये
Follow us on

मुंबई : सर्वसामान्य नागरीक, महिला विशेषत: गृहिणी अनेकदा पोस्ट ऑफिसमध्ये पैशांची गुंतवणूक करतात. पोस्ट ऑफिसवर त्यांचा विश्वास असतो. याशिवाय व्याजादरही योग्य मिळतो. त्यामुळे ते पोस्ट ऑफिस हा पर्याय निवडतात. पोस्ट ऑफिस वेगवेगळ्याप्रकारे सेव्हिंग स्कीम चालवते. या स्कीमच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक, महिला चांगल्या व्याजासकट आपल्या पैशांची बचत करु शकतात. पोस्ट ऑफिसची नॅशनल सैव्हिंग रेकरिंग डिपॉजिट अकाउंट ही स्कीम सध्या चांगल्या चर्चेत आहे. या स्कीमअंतर्गत गुंतवणूकदारांना सध्या 5.8 टक्के व्याज मिळत आहे. गेल्या वर्षाच्या 1 एप्रिलपासून हा व्याजदर सुरु आहे (Post Office recurring deposit RD scheme invest RS 100 and get RS 7000 in 5 year).

या स्कीम अंतर्गत गुंतवणूकदार दर महिन्याला कमीत कमी शंभर रुपयांपासून गुंतवणूक करु शकतात. तुम्हाला या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर सर्वात आधी आपल्याला पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडावं लागेल. या योजनेअंतर्गत तुम्ही दर महिन्याला शंभर रुपये जमा करु शकतात. यापेक्षा जास्त किंमत जमा करायची असल्यास तीही करु शकता. मात्र, ती रक्कम दाहाच्या पटीतली असायला हवी.

आरडी अकाउंट तुम्ही पाच वर्षांसाठी सुरु करु शकतात. तुम्ही या योजनेचे पैसे कॅश किंवा चेकद्वारेही भरु शकता. मात्र, चेक जमा करत असाल तर चेक क्लीअरन्सची तारीख डिपॉझिटची तारीख म्हणून मानली जाईल (Post Office recurring deposit RD scheme invest RS 100 and get RS 7000 in 5 year).

100 रुपये जमा करा आणि मिळवा 7 हजार

तुम्ही दर महिन्याला 100 रुपये जमा केले तर या योजनेनुसार तुम्हाला शेवटी 7000 रुपये मिळतील. तुम्ही जर 17 फेब्रुवारी 2021 पासून या योजनेअंतर्गत गुंतवणूक करत असाल तर 17 फेब्रुवारी 2026 पर्यंत त्याचा मॅच्यूरिटी पिरिअड असेल. पाच वर्षात तुम्ही दर महिन्याला शंभर रुपये भरले तर एकूण जवळपास 6000 रुपये रक्कम जमा होईल. या रकमेच्या एकूण 5.8 टक्के व्याज मिळेल.

खातं नेमकं कोण उघडू शकतं?

या योजनेसाठी तुम्ही सिंगल किंवा जॉइंट अकाउंट उघडू शकता. जॉइंट अकाउंट अंतर्गत तीन लोक जोडू शकतात. अकाउंट होल्डर अल्पवयीन असेल तर त्या खात्यासाठी पालक असणं जरुरी आहे. 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलगा किंवा मुलीच्या नावाने खातं उघडता येऊ शकतं.

विशेष म्हणजे या आरडी अकाउंटवर लोनची देखील सुविधा आहे. लगातार 12 हफ्ते भरल्यानंतर किंवा 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अकाउंट सुरु ठेवलं तर तुम्हाला लोन मिळू शकतं. तुमच्या अकाउंटमध्ये जितकी रक्कम आहे त्याच्या 50 टक्के रक्कमेची तुम्ही लोन घेऊ शकता. या लोनची रक्कम तुम्ही एकदाच किंवा हप्त्यानेदेखील परत करु शकता. तुम्ही व्याज घेतल्यानंतर किती दिवसांनी परतफेड करताय त्याच्या हिशोबाने व्याजदर लागेल.

अर्ध्यातही खातं बंद करता येईल

या योजनेअंतर्गत तुम्ही अर्ध्यातही तुमचं खातं बंद करु शकता. तुमच्याकडे पैसे नसतील किंवा इतर काही कारणाने तुम्ही दर महिन्याला सगल पाच वर्ष पैसे भरु शकणार नाहीत तर तुम्ही तीन वर्षातही आपले पैसे काढून खातं बंद करु शकता. खातं बंद करण्यासाठी तुम्हाला तुमच्याजवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयात जावं लागेल. तिथे गेल्यावर तुम्हा एक फॉर्म भरावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे पैसे व्याजासकट परत मिळतील.

हेही वाचा : राज्यात कोरोनाचा चढता आलेख, दुसरीकडे आरोग्य कर्मचाऱ्यांवर आंदोलनाची वेळ!