सोनं खरेदीसाठी जाताय तर लक्षात असूद्या ‘या’ 3 गोष्टी, नाहीतर होईल नुकसान

| Updated on: Nov 06, 2020 | 7:27 PM

जर तुम्हाला एखाद्या ठिकाणाचे भाव शोधायचे आहेत तर त्यासाठी तुम्हाला या वेबसाइटची मदत होईल.

सोनं खरेदीसाठी जाताय तर लक्षात असूद्या या 3 गोष्टी, नाहीतर होईल नुकसान
Follow us on

नवी दिल्ली : दिवाळीच्या तोंडावर सोनं खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी असते. अशात अनेक वेळा फसवणूक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. कधी खालच्या दर्जाच्या सोन्याची विक्री केली जाते तर कधी फक्त सोन्याचं पाणी लावलेलं असतं. त्यामुळे अनेकांना मोठा आर्थिक फटकाही बसला आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्याआधी काही गोष्टी माहिती असणं महत्त्वाचं आहे. आज आम्ही तुम्हाला सोनं खरेदी करताना काय काळजी घेतली पाहिजे याच्या काही महत्त्वाच्या टीप्स सांगणार आहोत. (pure gold how to check purity of gold know here)

सोन्याचा भाव माहित असूद्या…
जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदीसाठी मार्केटमध्ये जात असाल तर सगळ्यात आधी चालू दिवसाचे सोन्या-चांदीचे भाव माहिती असूद्या. यासाठी तुम्ही इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन वेबसाइट  https://ibjarates.com/ वर भेट देऊ शकता. जर तुम्हाला एखाद्या ठिकाणाचे भाव शोधायचे आहेत तर त्यासाठी तुम्हाला या वेबसाइटची मदत होईल.

आयबीजेएने दिलेले दर सर्वत्र स्वीकारला जातात. या वेबसाइटवर दिलेल्या दरामध्ये 3% जीएसटी (जीएसटी)चा समावेश नसतो ही बाब लक्षात असूद्या. सोन्याची विक्री करताना आपण आयबीजेएच्या दराचा संदर्भ घेऊ शकता. तुम्हाला आधीच किंमत माहित असेल तर ज्वेलरकडून चांगले दर मिळवण्यासाठी मदत होईल.

खरं सोनं हे 24 कॅरेटचंच असतं. पण याचा अद्याप कोणताही पुरावा नाहीये. कारण ते खूप मऊ असतं. दागिन्यांसाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो ज्यामध्ये 91.66 टक्के सोनं असतं.

दागिने खरेदी करताना हॉलमार्कची खात्री करा
तुम्ही दागिने विकत घेण्यासाठी गेला असाल तर हॉलमार्कसह दागिने घेतले आहेत ना याची खात्री करा. कारण, सोनं विकताना, हॉलमार्क असलेल्या दागिन्यांची किंमत सध्याच्या बाजारभावावर निश्चित केली जाते. म्हणून हॉलमार्कसह दागिने खरेदी करा.

दागिने विकत घेताना बिल घ्यायला विसरू नका
जर तुम्ही सोनं किंवा चांदीचं दागिने विकत घेत असाल तर ज्वेलरकडून बिल नक्का घ्या. यामध्ये सोन्याची शुद्धता आणि दर याची माहिती असते. तुमच्याकडे बिल असेल तर तुम्ही सोन्या-चांदीची विक्री करताना बोलणीसुद्धा करू शकता. जर बिल नसेल तर दागिने मनमानी किंमतीनं विकावे लागतील. यामुळे तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या –

दिवसाला 28 रुपये खर्च करून मिळवा 2 लाखांचा विमा, जाणून घ्या काय आहे LIC ची खास योजना

एका वर्षात 1 लाखाचे झाले 9 लाख रुपये, या गुंतवणुकीत मिळाला बंपर रिटर्न

(pure gold how to check purity of gold know here)