AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवसाला 28 रुपये खर्च करून मिळवा 2 लाखांचा विमा, जाणून घ्या काय आहे LIC ची खास योजना

या पॉलिसीचे सगळ्यात महत्त्वाचे फायदे म्हणजे सुरक्षा आणि बचत. जाणून घेऊयात काय आहेत पॉलिसीचे फायदे आणि वैशिष्ट्ये.

दिवसाला 28 रुपये खर्च करून मिळवा 2 लाखांचा विमा, जाणून घ्या काय आहे LIC ची खास योजना
| Edited By: | Updated on: Nov 06, 2020 | 6:01 PM
Share

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी ‘लाइफ इन्श्युरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ (LIC) ने ग्राहकांसाठी आणखी एक खास योजना आणली आहे. LIC ने कमी उत्पन्न (low income ) असणार्‍या ग्राहकांसाठी मायक्रो बचत विमा पॉलिसी (Micro Bachat Insurance Policy) सुरू केली आहे. या पॉलिसीचे सगळ्यात महत्त्वाचे फायदे म्हणजे सुरक्षा आणि बचत. जाणून घेऊयात काय आहेत पॉलिसीचे फायदे आणि वैशिष्ट्ये. (lic scheme for low income group micor bachat Insurance Policy know its benefits)

या योजनेमुळे अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक मदत मिळणार आहे. तसंच खातेधारकारा पॉलिसीच्या मॅच्युरिटीनंतर एकरकमी रक्कमही मिळणार आहे. या योजनेत 50 हजार ते 2 लाख रुपयांचा विमा उपलब्ध आहे. ही एक नॉन-लिंक्ड विमा योजना आहे. या योजनेंतर्गत पॉलिसीमध्ये लॉयल्टीचादेखील फायदा होणार आहे. जर एखाद्या खाते धारकाने 3 वर्षांसाठी प्रीमियम दिला असेल तर त्याला मायक्रो सेव्हिंग्ज प्लॅनमध्ये कर्जाची सुविधा देखील उपलब्ध आहे.

विमा घेण्यासाठी वयोमर्यादा या योजनेचा लाभ घेण्यासाठी कंपनीने वयोमर्यादा निश्चित केली आहे. यानुसार, फक्त 18 ते 55 वयोगटातील लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये कोणत्याही वैद्यकीय तपासणीची आवश्यकता नाही असंही कंपनीनं स्पष्ट केलं आहे. या पॉलिसीमध्ये जर एखाद्याने 3 वर्षांसाठी नियमित प्रीमियम भरला तर त्यानंतर त्यांना प्रीमियम भरता येणार नाही. यामध्ये खाते धारकाला 6 महिने विम्याची सुविधा सुरू असेल.

दररोज 28 रुपये खर्च करून मिळला 2 लाखांचा विमा या योजनेमध्ये जर 18 वर्षाच्या व्यक्तीने 15 वर्षांसाठी योजना घेतली तर त्याला प्रति हजार 51.5 रुपये प्रीमियम द्यावा लागेल. त्याचबरोबर, 25 वयोगटातील व्यक्तीला त्याच कालावधीसाठी 51.60 रुपये आणि 35 वर्षाच्या व्यक्तिला प्रति हजार रुपये 52.20 रुपये प्रीमियम भरावा लागेल.

10 वर्षांच्या योजनेत 85 हजार 45 ते 91.9 रुपये प्रति हजार प्रीमियम असणार आहे. यात प्रीमियममध्ये 2 टक्के सूटदेखील देण्यात आली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर हा विमा तुम्हाला आवडला नसेल तर तुम्ही 15 दिवसांच्या आत सरेंडर देखील करू शकता.

या पॉलिसीसाठी मॅच्युरिटीचं कमाल वय 70 वर्ष असेल. ही एक लाइफ इन्श्युरन्स पॉलिसी आहे, म्हणून तुम्हाला प्रीमियम पेमेंटवर कलम 80 C अंतर्गत आयकरात सूटदेखील मिळेल.

इतर बातम्या – 

घर बसल्या खातं उघडा अन् मिळावा 3 सेकंदात 25 लाखांचं कर्ज! या बँकेची धमाकेदार ऑफर

एका वर्षात 1 लाखाचे झाले 9 लाख रुपये, या गुंतवणुकीत मिळाला बंपर रिटर्न

(lic scheme for low income group micor bachat Insurance Policy know its benefits)

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...