Q1FY22 Infosys Result: इन्फोसिसला 5200 कोटींचा नफा; थेट 35 हजार जणांना नोकर्‍या देणार

| Updated on: Jul 15, 2021 | 9:28 PM

तसेच मागील तिमाहीत कंपनीला 5,080 कोटींचा नफा झाला होता. त्याचबरोबर कंपनीने एप्रिल-जून 2020 मध्ये 4,233 कोटी नफा कमावला. कंपनीने 2022 या आर्थिक वर्षासाठी 14 ते 16 टक्के महसूल जमावण्याचं लक्ष्य ठेवले आहे.

Q1FY22 Infosys Result: इन्फोसिसला 5200 कोटींचा नफा; थेट 35 हजार जणांना नोकर्‍या देणार
Follow us on

नवी दिल्लीः आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसने आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून 2021) 5,195 कोटी रुपयांचा नफा कमावलाय. तसेच मागील तिमाहीत कंपनीला 5,080 कोटींचा नफा झाला होता. त्याचबरोबर कंपनीने एप्रिल-जून 2020 मध्ये 4,233 कोटी नफा कमावला. कंपनीने 2022 या आर्थिक वर्षासाठी 14 ते 16 टक्के महसूल जमावण्याचं लक्ष्य ठेवले आहे.

जून तिमाहीत 26,310 कोटी रुपयांवरून 27,900 कोटी रुपये एवढी वाढ

इन्फोसिसने जाहीर केलेल्या निकालांनुसार, कंपनीच्या उत्पन्नाची (QoQ) जून तिमाहीत 26,310 कोटी रुपयांवरून 27,900 कोटी रुपये एवढी वाढ झालीय. पहिल्या तिमाहीत कंपनीला 260 कोटी डॉलर्सचे ऑर्डर प्राप्त झालेत. इन्फोसिसने FY22 चे कार्यकारी मार्जिन गायडन्स 22-24 टक्के ठेवलेय. पहिल्या तिमाहीत वित्तीय सेवांमधून कंपनीचे उत्पन्न 9,220 कोटी रुपये होते. त्याचबरोबर उत्पादन क्षेत्राकडून कंपनीला 2700 कोटी रुपये मिळाले.

महसुली विकासदर 14 ते 16 टक्क्यांपर्यंत वाढविला

इन्फोसिसचे सीईओ आणि एमडी सलील पारेख सांगतात की, कर्मचारी आणि ग्राहकांच्या आधारे जून 2021 च्या तिमाहीत आपली वाढ 10 वर्षांत सर्वाधिक होती. स्थिर चलनावर ही वाढ वार्षिक आधारावर 16.9 टक्के आणि तिमाही आधारावर 4.8 टक्के नोंदविण्यात आली. हे पाहता महसुली विकास दर 14 ते 16 टक्क्यांपर्यंत वाढविलाय.

35 हजार नव्या नोकऱ्या (Jobs in infosys)

त्रैमासिक निकाल जाहीर करताना इन्फोसिसने सांगितले की, ते आर्थिक वर्ष 22 दरम्यान 35,000 नवीन लोकांची भरती करणार आहेत. यात कंपनी फ्रेशर्सना संधी देईल. त्याचबरोबर, वेतनवाढ ही कंपनी जुलैपासून लागू करेल. इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण राव म्हणतात की, डिजिटल टॅलेंटची मागणी वाढलीय. जागतिक स्तरावर, कंपनी 2021-22 मध्ये सुमारे 35,000 कॉलेज पदवीधरांना नियुक्त करेल. कंपनीचा डिजिटल महसूल एकूण महसुलाच्या 53.9 टक्के होता. वर्षाच्या आधारावर स्थिर चलनाची वाढ 42.1% नोंदविली गेली.

संबंधित बातम्या

RBI ने 24 तासांत घेतले दोन मोठे निर्णय; थेट सामान्य माणसावर होणार परिणाम

पेन्शनधारकांचं टेन्शन दूर, आता व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार पेन्शनशी संबंधित माहिती

Q1FY22 Infosys Result: Infosys makes a profit of Rs 5,200 crore; It will provide jobs to 35,000 people