Rainbow IPO : गुंतवणुकदारांना संधी, रेनबोचं आर्थिक विश्वात पाऊल; दीड हजार कोटींचा आयपीओ

| Updated on: Apr 26, 2022 | 11:29 PM

गुंतवणुकदारांना खरेदीसाठी सार्वजनिक करण्यात आला आहे. कंपनीचे आयपीओच्या माध्यमातून1,595 कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट आहे.आयपीओ लिलाव प्रक्रिया 29 एप्रिल पर्यंत खुली असणार आहे.

Rainbow IPO : गुंतवणुकदारांना संधी, रेनबोचं आर्थिक विश्वात पाऊल; दीड हजार कोटींचा आयपीओ
आयपीओ
Image Credit source: TV9
Follow us on

नवी दिल्ली : देशातील बालकांच्या उपचारासाठीचे अग्रगण्य रेनबो चिल्ड्रन मेडिकेअरनं (RAINBOW CHILDREN MEDICARE) गुंतवणूक विश्वात पाऊल टाकलं आहे. रेनबोचा आयपीओ आज (मंगळवारी) बाजारात सूचीबद्ध (लिस्टेड) झाला आहे. गुंतवणुकदारांना खरेदीसाठी सार्वजनिक करण्यात आला आहे. कंपनीचे आयपीओच्या माध्यमातून1,595 कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट आहे.आयपीओ लिलाव प्रक्रिया 29 एप्रिल पर्यंत खुली असणार आहे.शेअरची किंमत 516-542 प्रति इक्विटी शेअर (EQUITY SHARE) ठेवण्यात आली आहे. माध्यमातील वृत्तानुसार शेअर ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) 50 रुपये असणार आहे. रेनबो चिल्ड्रन मेडिकेअर लिमिटेडने इनिशियल पब्लिक ऑफरिंग द्वारे पैसे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. प्राथमिक कागदपत्रे सेबीकडे सादर करण्यात आली होती. इंग्लंडमधील वित्तीय संस्था सीडीसी ग्रूप पीएलसीचे सहाय्य रेनबोला मिळाले आहे.

आयपीओ प्लॅन :

रेनबोच्या लहान मुलांसाठीच्या पहिल्या रुग्णालयाची हैदराबादमध्ये सुरुवात 1999 मध्ये झाली. जागतिक दर्जाची आरोग्य सुविधा प्रदान करण्यात कंपनीची ख्याती आहे. मल्टि स्पेशालिटी पीडियाट्रिक सर्व्हिसेस मध्ये जगभरात नावाजलेलं नाव आहे. नवजात बालकांच्या जटिल विकारांवर उपचार करण्यासाठी रुग्णालय ख्यातकीर्त आहे.

सार्वजनिक इश्यूच्या स्वरुपात 280 कोटी रुपयांपर्यंतच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू आणि शेअरधारकांद्वारे 2.4 कोटी इक्विटी शेअर पर्यंत ऑफर सेल समाविष्ट आहे. प्रमोटर्स रमेश कंचारला, दिनेश कंचारला आणि आदर्श कंचारला तसेच गुंतवणूकदार सीडीसी ग्रूप, सीडीसी इंडिया ऑफर फॉर सेल द्वारे शेअर्सला ऑफलोड करतील.

रेनबो चिल्ड्रन मेडिकेअर फ्रेश इश्यू द्वारे मिळालेल्या रकमेचा वापर नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्सला तत्काळ रीडिम करण्याद्वारे नवीन रुग्णालयांची निर्मिती आणि नवीन रुग्णालयांसाठी वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीसाठी केला जाईल. तसेच कॉर्पोरेट विस्तारासाठी निधी वापरण्यात येईल.

रेनबोची भारतातील सहा शहरात 14 रुग्णालये आणि तीन क्लिनिक आहेत. एकूण बेडची क्षमता 1500 आहे. नवजात बालकांपासून विविध वयोगटाच्या बालकांवर उपचारासाठी रेनबोची ख्याती आहे.

आयपीओ म्हणजे काय?

इनिशियल पब्लिक ऑफर म्‍हणजे आयपीओ. यासाठी कंपन्‍या शेअर बाजारमध्‍ये स्‍वत:ला लिस्‍टेड करून शेअरमध्‍ये गुंतवणूकदारांना विकण्‍यासाठी प्रस्‍ताव आणतात. शेअर बाजारात लिस्‍टेड झाल्‍यामुळे कंपनीच्‍या बाबतीत विस्‍तृत माहिती सार्वजनिक होते.

इतर बातम्या :

Akshaya Tritiya: ‘डिजिटल गोल्ड’ खरेदीची संधी, एक रुपयांपासून गुंतवणूक; ‘या’ कंपनीची आकर्षक सेवा

Holcim Cement : अदानी समूह होल्सिम लिमिटेड खरेदी करणार?, चर्चेला उधान, शेअर्सच्या किंमतीतही वाढ