AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tata Share : आज कुछ तूफानी करते है! टाटा कंपनीचा हा शेअर करणार मालामाल

Tata Share : शेअर बाजारात उद्योगपती रतन टाटा यांच्या या कंपनीने तुफान कामगिरी बजावली आहे. रेखा झुनझुनवाला यांना मालामाल केले. तुमच्या पोर्टफोलिओत आहे का हा शेअर?

Tata Share : आज कुछ तूफानी करते है! टाटा कंपनीचा हा शेअर करणार मालामाल
| Updated on: May 31, 2023 | 11:34 AM
Share

नवी दिल्ली : शेअर बाजारात सातत्याने चढ-उतार सुरु आहे. काही शेअर्संनी गुंतवणूकदारांचे नशीब पाटलून टाकले आहे. यामध्ये रतन टाटा (Ratan Tata) यांच्या या शेअरने तर सध्या बाजारात धुमाकूळ घातला आहे. गेल्या दोन महिन्यात तर हा शेअर सुसाट धावला आहे. या शेअरने रेखा झुनझुनावाला (Rekha Jhunjhunwala) यांना तर मालामाल केले. त्यांची एकूण संपत्ती 2300 कोटींच्या घरात पोहचली आहे. तुमच्या पोर्टफोलिओत हा शेअर असेल तर तुम्हाला ही त्याचा फायदा दिसून आला असेल. बाजारात सध्या हा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या आहेत.

टायटनचे तुफान उद्योगपती रतन टाटा यांच्या समूहातील टायटन (Titan) कंपनीच्या शेअरने बाजारात धुमाकूळ घातला आहे. या शेअरवर गुंतवणूकदारांचा पूर्ण विश्वास होता. टायटनने दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळवून दिला. या कंपनीने मोठा परतावा मिळून दिला. बीएसईवर मंगळवारी हा शेअर त्याच्या सर्वकालीन उच्चांकावर होता. परतावा देण्यात पण या शेअरने विक्रम नोंदवला. हा शेअर 2841.90 रुपयांवर पोहचला. आज 11:24 वाजता हा शेअर 2,807 रुपयांवर आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर रिटर्न दिले आहेत.

233 कोटींचा फायदा जानेवारी ते मार्च 2023 तिमाहीत टायटन कंपनी शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, रेखा झुनझुनावाला यांच्याकडे टायटन कंपनीचे 4,69,45,970 शेअर आहे. टायटन कंपनीत त्यांचा 5.29 टक्के वाटा आहे. टायटन यांच्या कंपनीचा प्रति शेअर 49.70 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे रेखा झुनझुनवाला यांना 2,33,32,14,709 रुपये म्हणजे जवळपास 233 कोटी रुपयांचा फायदा झाला होता.

500 रुपयांची उसळी टायटनच्या शेअरने तुफान उसळी घेतली आहे. 13 मार्च 2023 रोजी टायटनचा शेअर बीएसईवर 2334 रुपयांवर होता. 30 मे 2023 रोजी हा शेअर 2840.60 रुपयांवर पोहचला. म्हणजे दोनच महिन्यात या शेअरने 500 रुपयांची उसळी घेतली.

शेवटच्या तिमाहीत वाढला हिस्सा Q4FY23 मध्ये टायटन कंपनीच्या शेअरहोल्डिंग डेटामध्ये रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टाटा समूहच्या टायटन कंपनीचे 4,69,45,970 शेअर होते. हा वाटा 5.29 टक्के आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 तिमाहीत रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 4,58,95,970 शेअर म्हणजे 5.17 टक्के हिस्सा होता. रेखा झुनझुनावाला यांनी जानेवारी ते मार्च 2023 मध्ये टायटन कंपनीत 0.12 टक्के हिस्सा वाढवला. त्यांनी Q4FY23 मध्ये टायटन कंपनीचे 10.50 लाख शेअरची खरेदी केली होती.

टाटा कंझ्युमर नफ्यात टाटा समूह मीठापासून ते विमान सेवेपर्यंत अनेक क्षेत्रात अग्रेसर आहे. अनेक जागतिक ब्रँड या समूहाने पंखाखाली घेतले आहे. या समूहाने मोठा विस्तार केला आहे. प्रत्येक प्रांतात, क्षेत्रात आपला ठसा उमटविण्याचा खास प्रयत्न टाटा समूह करतो. टाटा समूह चहा, कॉपी आणि मीठाच्या उत्पादनातून कोट्यवधींची कमाई करत आहे. टाटा कंझ्युमर प्रोडक्टसने कंपनीचे तिमाही निकाल जाहीर केले आहेत. यामध्ये कंपनीला 268 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. गेल्या वर्षात याच तिमाहीत कंपनीला 217 कोटींचे नुकसान झाले होते. त्यातुलनेत आता 23 अधिक नफा झाला.

हा कोणताही गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यापूर्वी बाजाराचा, कंपनीचा अभ्यास जरुर करावा. गुंतवणूक तज्ज्ञ, विश्लेषकाची मदत आवश्य घ्यावी. त्याशिवाय गुंतवणूक करणे जोखमीचे ठरेल.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.