Bank Holiday: बँकेत जाण्याआधी ही बातमी वाचा, दिवाळीच्या तीन दिवसात बँका कधी चालू राहणार, कधी बंद राहणार? एकदा पाहून घ्या

Bank Holiday Alert on: जर तुम्ही सोमवार, 9 नोव्हेंबर रोजी बँकेची कोणती काम करायला बँकेत जाणार असाल तर आधीच ही माहिती जाणून घेऊन त्यानुसारच तुमचं प्लांनिंग करा.

Bank Holiday: बँकेत जाण्याआधी ही बातमी वाचा, दिवाळीच्या तीन दिवसात बँका कधी चालू राहणार, कधी बंद राहणार? एकदा पाहून घ्या
bank holiday on 9 nov 2026
| Updated on: Nov 08, 2026 | 11:32 AM

जर तुम्ही उद्या सोमवारी अर्थात 9 नोव्हेंबर रोजी बँकेत काही कामानिमित्ताने जाणार असाल तर त्या आधी ही बातमी वाचणं गरजेचं आहे. कारण उद्या 9 नोव्हेंबर रोजी देशात अनेक ठिकाणी बँकांना सुट्टी असणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) अधिकृत सुट्टीच्या कॅलेंडरनुसार, सोमवारी 9 नोव्हेंबर रोजी देशातील अनेक राज्यांमधील बँकांच्या शाखा बंद राहतील. दिवाळी, लक्ष्मीपूजन आणि गोवर्धन पूजा यांसारख्या शुभ सणांच्या पार्श्वभूमीवर, ‘निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट’ (Negotiable Instruments Act) अंतर्गत रिझर्व्ह बँकेने ९ नोव्हेंबर रोजी बँकांसाठी सुट्टी जाहीर केली आहे. नेमकी ही सुट्टी कोणत्या राज्यांना असणार आहे हे जाणून घ्या.

उद्या बँका बंद का?

भारतीय रिझर्व्ह बँकेने बँक सुट्ट्यांचे तीन प्रकारांत वर्गीकरण केले आहे. एक म्हणजे ‘निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट’ तर दुसरं म्हणजे ‘रिअल-टाइम ग्रॉस सेटलमेंट’ आणि तिसरं म्हणजे ‘खाती बंद करण्याचे’ (accounts closing) दिवस. या दिवशी अंतर्गत सुट्ट्या असतात. यानुसार ‘निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट’ अंतर्गत दिवाळी, गोवर्धन पूजा आणि विश्वकर्मा दिनानिमित्त ९ नोव्हेंबर रोजी बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ही सुट्टी संपूर्ण भारतात एकसारखी लागू होत नाही. ही सुट्टी प्रत्येक राज्यामध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या विशिष्ट सणांनुसार ठरवलेली असते.

Loading...

कोणत्या राज्यात राहणार बँका बंद?

तर सोमवारी, ९ नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेश (लखनौ, कानपूर), राजस्थान (जयपूर), मध्य प्रदेश (भोपाळ), चंदीगड, त्रिपुरा (अगरतळा), सिक्कीम (गंगटोक), मणिपूर (इम्फाळ) या ठिकाणच्या बँका बंद असतील.

कुठे असणार बँका सुरु?

दिल्ली, महाराष्ट्र (मुंबई), पश्चिम बंगाल (कोलकाता) आणि दक्षिण भारतीय राज्यांमध्ये ९ नोव्हेंबर रोजी बँकिंग सेवा सुरू राहणार आहे. पण या ठिकाणी १० आणि ११ नोव्हेंबर रोजी (बळी प्रतिपदा/भाऊबीज) सुट्ट्या आहेत. त्यामुळे तुमच्या कामांचं नियोजन आधीच करून घ्या.

सुट्टीच्या दिवशी ‘या’ सेवा राहणार सुरू!

बँकेच्या शाखा बंद असल्या तरी, ग्राहकांना डिजिटल बँकिंग सेवा वापरताना कोणतीही अडचण येणार नाही. UPI सेवा म्हणजेच PhonePe, Google Pay, Paytm आणि बँकांच्या स्वतःच्या UPI ॲप्स हे सुरु राहणार आहे. याशिवाय इंटरनेट आणि मोबाइल बँकिंग सेवाही सुरु असणार आहेत. तुम्हाला पैसे काढायचे असतील तर ATM सेवा सुरु असल्याने तुम्ही सहज रोख रक्कम काढू शकता. सोबतच कॅश डिपॉझिट मशिन (CDM) द्वारे पैसे जमा करण्याची सुविधा नेहमीप्रमाणे सुरू राहील.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us