RBI : वातावरण तर टाईट, मग घ्यावी का घर, चारचाकी आणि बाईक, काय सांगतो रिपोर्ट..

| Updated on: Oct 13, 2022 | 8:01 PM

RBI : सध्याचे वातावरण बघता घर अथवा चारचाकी खरेदी करावी काय..रिपोर्ट काय सांगतो..

RBI : वातावरण तर टाईट, मग घ्यावी का घर, चारचाकी आणि बाईक, काय सांगतो रिपोर्ट..
कर्ज महागणार का?
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : या फेस्टिव्ह सीजनमध्ये (Festive Season) लोक घर आणि कारची खरेदी (Car, Home Loan) करत आहेत. बाजारातील संकेताआधारे काहीजण हिम्मत करत आहेत. तर वाढत्या महागाईने (Inflation) काहींचे प्लॅन फिस्कटले आहेत. मात्र काही लोक असेही आहेत ज्यांची तळ्यातमळ्यात अशी अवस्था आहे. त्यांच्यासाठी हा रिपोर्ट काय सांगतो ते पाहणे महत्वाचे आहे..

बाजारात महागाई कमी होण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात रिझर्व्ह बँकेला महागाई कमी करण्यासाठी पुन्हा उपाय योजना राबवाव्या लागणार आहेत.आरबीआय डिसेंबर महिन्यात पुन्हा कर्ज दरा वाढविण्याची शक्यता आहे.

आरबीआयने कर्ज दर वाढविला तर घर आणि कार खरेदी करणे हे अनेक जणांसाठी केवळ स्वप्नच राहणार आहे. तर काहींना आता घर आणि कार खरेदी करु ही पण पुन्हा ईएमआय वाढण्याची भीती सतावत आहे.

हे सुद्धा वाचा

HSBC बँकेच्या अंदाजानुसार, डिसेंबर महिन्यात रिझर्व्ह बँक रेपो दरात वाढ करु शकते. यामध्ये अर्धा टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूण दर 6.4 टक्के होईल. एचएसबीसी नुसार, महागाईचा दर वाढल्यामुळे रिझर्व्ह बँकेवरही दबाव वाढला आहे.

रिझर्व्ह बँकेने व्याजदरात वाढ केली तर बँकांही व्याजदरात वाढ करतील. त्यामुळे घर, चारचाकीवरील व्याजदरात वाढ होईल. ईएमआय वाढल्याने ग्राहकांना मोठा फटका बसू शकतो. डिसेंबर महिन्यात व्याजदर वाढले तर येणाऱ्या काळात कर्ज महाग होईल.

सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाई दरात वाढ झाली आहे. सर्वसामान्यांना खाद्यपदार्थांवर पूर्वीपेक्षा जास्त खर्च करावा लागतो. महागाई दर 7.41 टक्क्यांवर पोहचला आहे. ऑगस्ट महिन्यानंतर या दरात 0.41 टक्क्यांची वृद्धी झाली. ऑगस्ट महिन्यात किरकोळ महागाई दर 7 टक्के होता.

सप्टेंबर महिना हा सलग 9 महिना आहे, ज्यावेळी महागाईचा वृद्धीदर रिझर्व्ह बँकेच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. रिझर्व्ह बँकेने महागाई दर 6 टक्के निर्धारीत केला आहे. यापूर्वीच आरबीआयने हा दर आटोक्यात येत नसल्याने चिंता व्यक्त केली होती.