AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाला रोखण्यात रिलायन्स सर्वात पुढे; सॅनिटायझर, कोविड किटनंतर आता कंपनी औषध आणणार

विशेष म्हणजे कंपनी कोरोनाचे औषधही लवकरच आणण्याची शक्यता आहे. कंपनीने कोविड 19 च्या विरुद्ध संभाव्य औषध म्हणून Niclosamide साठी अर्जाचा प्रस्ताव सादर केलाय. Reliance medicine sanitizer covid kit

कोरोनाला रोखण्यात रिलायन्स सर्वात पुढे; सॅनिटायझर, कोविड किटनंतर आता कंपनी औषध आणणार
| Edited By: | Updated on: Jun 03, 2021 | 12:02 AM
Share

नवी दिल्लीः देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज कोरोनाच्या सध्याच्या लाटेत सरकार, त्याचे कर्मचारी आणि सामान्य लोकांना प्रचंड मदत करत आहे. त्याचबरोबर आता रिलायन्सने सॅनिटायझर्स आणि टेस्टिंग किटही बनवण्यास सुरुवात केलीय. कोरोनाची दुसरी लाट लक्षात घेता कंपनी लोकांना मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. रिलायन्स R&D टीमने बाजाराच्या किमतीच्या 20% दराने डब्ल्यूएचओ निर्देशानुसार सॅनिटायझर्स बनविण्याची प्रक्रिया सुरू केलीय. विशेष म्हणजे कंपनी कोरोनाचे औषधही लवकरच आणण्याची शक्यता आहे. कंपनीने कोविड 19 च्या विरुद्ध संभाव्य औषध म्हणून Niclosamide साठी अर्जाचा प्रस्ताव सादर केलाय. (Reliance at the forefront of blocking Corona; The company will now bring medicine after sanitizer, covid kit)

आर-ग्रीन’ आणि ‘आर-ग्रीन प्रो’ नावाची परवडणारी आणि प्रभावी डायग्नोस्टिक किट विकसित

रिलायन्सची टीम नेक्सर पॉलिमरचे प्रमाणीकरण करण्यासाठी विविध CSIR लॅबसह कार्य करीत आहे, ज्याने विविध व्हायरस आणि बॅक्टेरियांचा लिपिड थर नष्ट करण्याची क्षमता दर्शविली. त्याचबरोबर कंपनीने कोविड 19 शोधण्यासाठी ‘आर-ग्रीन’ आणि ‘आर-ग्रीन प्रो’ नावाची परवडणारी आणि प्रभावी डायग्नोस्टिक किट विकसित केलीत. किटला ICMR ची मान्यता मिळालीय.

रिलायन्स ऑक्सिजनची कमतरता भागवते

इटलीमध्ये विकसित झालेल्या संकल्पनेची अंमलबजावणी करून इस्पितळातील रुग्णांमधील आपत्कालीन कक्षांना अपुरी व्हेंटिलेटर पुरवठा करण्यासाठी कंपनी काम करीत आहे, जी सीपीएपी मशीनला थ्रीडी-प्रिंटेड शार्लोट वाल्व्ह आणि स्पेशल स्नॉर्किंग मास्कसह सक्षम करते. कोरोना साथीच्या रोगाचा सर्वत्र उद्रेक होत असताना रिलायन्सने ऑनसाईट ऑक्सिजनच्या मागणीत लक्षणीय वाढ नोंदविली. 90-95% च्या अचूकतेसह प्रति मिनिट 5-7 लिटर ऑक्सिजन तयार करण्यास सक्षम ऑक्सिजन जनरेटरसाठी कमी-इंजिनीयर्ड मजबूत डिझाइनवर काम करण्यास सुरुवात केलीय.

रुग्णवाहिका आणि आपत्कालीन वाहनांसाठी विनामूल्य पेट्रोल

रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेडने कोविड 19 सेवेमध्ये गुंतलेल्या रुग्णवाहिकांना मोफत इंधन पुरवण्यासाठी मुंबईत मोबाईल इंधन बाऊसर तैनात केले. रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेड हा रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि ब्रिटिश पेट्रोलियम (BP) यांच्यात किरकोळ इंधन विक्रीसाठीचा संयुक्त प्रकल्प आहे. रिलायन्स फाऊंडेशनच्या सहकार्याने कंपनीने गेल्या वर्षी मार्चमध्ये देशभरातील कोविड आपत्कालीन सेवा वाहनांना मोफत इंधन पुरवण्यासाठी पुढाकार घेतला होता.

संबंधित बातम्या

घर मालक की भाडेकरू, मोदी सरकारने मंजूर केलेल्या नव्या कायद्याचा फायदा नेमका कोणाला?

SBI Alert: स्टेट बँकेचा कोट्यवधी ग्राहकांना इशारा, 30 जूनपूर्वी ‘हे’ काम करण्याचा सल्ला, अन्यथा पैशांचे व्यवहार बंद होणार

Reliance at the forefront of blocking Corona; The company will now bring medicine after sanitizer, covid kit

Follow Us
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?