आरबीआयच्या ‘या’ निर्णयाने फिक्स डिपॉझिटच्या ग्राहकांना फायदा होणार

| Updated on: Oct 09, 2020 | 4:11 PM

भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या बैठकीत व्याज दरात कोणत्याही प्रकारची घट केली नाही (RBI Interest rate).

आरबीआयच्या या निर्णयाने फिक्स डिपॉझिटच्या ग्राहकांना फायदा होणार
Follow us on

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या बैठकीत व्याज दरात कोणत्याही प्रकारची घट केली नाही (RBI Interest rate). पण बँकेच्या या निर्णयाने असे लोकं नाराज झाले आहेत, ज्यांना आपला ईएमआय कमी होण्याची अपेक्षा होती. पण व्याज दारत घट होत नसली तरीही फिक्स डिपॉझिट करणाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे (RBI Interest rate).

व्याज दर स्थिर ठेवण्याचा निर्णय फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगला आहे. कारण बँक एफडीचे व्याज दरात घट होण्यापासून ते आता वाचू शकतात. बँकेतून कर्ज घेणाऱ्यांसाठी आरबीआयच्या या निर्णायाचा काहीही फायदा होणार नाही. बँकेच्या कर्जावर व्याज दरात होणारी घट सध्या थांबवली जाणार. रेपो रेटमध्ये बदल होणार नसल्याने बँक एफडीच्या दरात घट होण्यापासून वाचणार आहेत.

गेल्या काही महिन्यापासून बँक एफडीवर मिळणाऱ्या व्याजदरात घट केली जात आहे. त्यामुळे एफडीमध्ये पैसे जमा करणाऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

सिनिअर सिटीजनला मिळणार अधिक लाभ

बँकेकडून जेवढे फिक्स डिपॉझिट स्कीम सुर आहेत. त्यामध्ये सिनिअर सिटिजनला सर्वाधिक लाभ मिळणार आहे. आता आरबीआयच्या रेपो रेटमध्ये बदल न केल्याने सिनिअर सिटीजन्सला व्याज दर आधी होती तेवढीच राहणार आहे. सर्वाधिक बँक अशा प्रकारच्या बचत योजनेत सिनिअर सिटीजनला 7 टक्के व्याज देतात.

लोन घेण्याची योग्य वेळ

आरबीआयने व्याज दरात बदल केले नाहीत. पण ज्याप्रकारे बँकेच्या कर्जाच्या दरात घट झाली आहे. याचा अर्थ ही कर्ज घेण्याची योग्य वेळ आहे. बाजारातील तज्ञांच्या मते, ही कर्ज घेण्याची योग्य वेळ आहे.

संबंधित बातम्या :

स्वस्तात मिळणार गृह कर्ज, RBI ने घेतलेल्या निर्णयामुळे घर घेणाऱ्यांसाठी Good News

ना सुट्टी, ना वेळेची मर्यादा, डिसेंबरपासून 365 दिवस 24 तास RTGS सेवा; शुल्क आणि नियम काय?