रशिया – युक्रेन युद्धाबाबत अर्थमंत्र्यांची चिंता; अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होण्याची भीती

| Updated on: Feb 26, 2022 | 7:37 AM

रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia-Ukraine conflict) गेल्या काही दिवसांत तणाव वाढला होता. अखेर युद्धाचा सुरुवात झाली आहे. या युद्धाला अनेक नकारात्मक परिणाम सध्या जागतिक बाजारपेठेवर होताना दिसून येत आहेत. याबाबत अर्थमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

रशिया - युक्रेन युद्धाबाबत अर्थमंत्र्यांची चिंता; अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होण्याची भीती
निर्मला सितारमण
Follow us on

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia-Ukraine conflict) गेल्या काही दिवसांत तणाव वाढला होता. अखेर युद्धाला सुरुवात झाली आहे. या युद्धाचे अनेक नकारात्मक परिणाम सध्या जागतिक बाजारपेठेवर होताना दिसून येत आहेत. रशिया आणि युक्रेमध्ये सुरू असलेल्या युद्धाबाबत अर्थमंत्री (finance minister) निर्मला सितारमण यांनी चिंता व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले आहे की, जगावर गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकट होते. हळूहळू आपण या संकटातून बाहेर पडत होतो. मात्र आता पुन्हा एकदा नवे संकट निर्माण झाले आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा नकारात्मक परिणाम हा जागतिक बाजारपेठेवर पडताना दिसत असून, पुरवठा साखळी प्रभावित झाली आहे. वस्तूंचा पुरवठा होत नसल्याने अनेक वस्तूंचे दर वाढले आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीने शंभरी पार केली आहे. याचा फटका भारताच्या आर्थव्यवस्थेला (economy)देखील बसत असल्याचे सीतारमण यांनी म्हटले आहे. त्या आशिया आर्थिक संवादमध्ये बोलत होत्या.

काय म्हणाल्या अर्थमंत्री?

पुढे बोलताना सितारमण म्हणाल्या की, रशिया आणि युक्रेनमधील तणावाचा जागतिक आर्थिक व्यवस्थेवर मोठा परिणाम होताना दिसून येत आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर अशा प्रकारचा तणाव कधीही पाहिला नव्हता. कोरोनाच्या संकटातून अर्थव्यवस्था सावरत असताना आणखी एक नवीन संकट परवडणारे नाही. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीने शंभरी पार केलीये. तसेच पुरवठा साखळी देखील खंडित झाली आहे. वस्तुंचा पुरवठा योग्यप्रमाणात न झाल्यास महागाई वाढण्याची शक्यता आहे. या युद्धाचे अर्थव्यवस्थेवर अनेक नकारात्मक परिणाम होताना दिसून येत आहेत.

अर्थव्यवस्थेला फटका बसणार?

दरम्यान ‘नोमूरा’च्या वतीने युद्धाचे जागतिक आर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतात यावर आधारित एक रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की, रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा अशिया खंडातील देशांवर मोठ्याप्रमाणात परिणाम होईल. अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो. या युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेला देखील फटका बसणार असल्याचे या अहवालामध्ये म्हटले आहे. भारत सध्या महागाई रेट कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र युद्ध सुरूच राहिल्यास भारतात देखील महागाई वाढू शकते असा इशारा या अहवालातून देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कारायचीये?, मग मल्टिकॅप फंड्सबद्दल जाणून घ्याच

कच्च्या तेलाच्या किंमतीत घट, भारताला अद्याप झळ कायम; देशांतर्गत अर्थव्यवस्थेला फटका

कोरोनापाठोपाठ भारतावर घोंगावतंय नवं संकट, देशाच्या चिंतेत वाढ