या 6 पद्धतीने वाचवता येईल लाखांचा कर; ITR दाखल करण्यापूर्वी घ्या तपशील जाणून

| Updated on: Mar 29, 2024 | 4:42 PM

Income Tax : कर वाचविण्यासाठी प्रत्येक जण शक्कल लढवतो. प्रत्येकाला कर बचत करायची आहे. या पद्धतीने तुम्हाला कर बचत करता येईल. करदात्यांना जवळपास 7 लाख रुपयांपर्यंतची कर बचत करता येईल. सध्या देशात जुनी आणि नवीन अशा दोन कर प्रणाली आहेत.

या 6 पद्धतीने वाचवता येईल लाखांचा कर; ITR दाखल करण्यापूर्वी घ्या तपशील जाणून
असा वाचवा कर
Follow us on

भारतात आयकर कायदा 1961 च्या नियमातंर्गत नागरिकांना प्राप्तिकरात सवलत देण्यात येते. सर्व करदात्यांना वर्षभरात एकदा आयटीआर रिटर्न फाईल करणे आवश्यक आहे. जर तुमचे उत्पन्न आयकर कक्षेत येत असेल तर कर भरणे आवश्यक आहे. आयटीआर फाईल करणाऱ्या करदात्यांना सरकार करात वार्षिक 1.5 लाख रुपयांच्या बचतीची संधी देते.

अनेक करदात्यांना कराची बचत कशी करायची याची माहिती नसते. तुम्हाला या पद्धतीने जवळपास 7 लाख रुपयांपर्यंतची कर बचत करता येईल. एका दाव्यानुसार, तुम्हाला 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर शुन्य कर द्यावा लागेल. तर जुन्या कर प्रणालीनुसार सरकार 5 लाख रुपयांपर्यतचे उत्पन्न कर मुक्त आहे.

या आहेत पद्धती

हे सुद्धा वाचा
  1. जर तुमचे वेतन 12 लाख रुपये असेल तर, तुमचे HRA 3.60 लाख रुपये होईल. तुमचे LTA 10,000 रुपये असेल. फोनचे बिल 6,000 रुपये, तर आयकर नियमाच्या 16 अंतर्गत 50,000 रुपये मानक वजावट मिळते. तुम्ही 2500 रुपयांचा प्रोफेशन टॅक्सवर सवलतीसाठी दावा करु शकतात.
  2. प्राप्तिकर अधिनियमाच्या 10 (13ए) अंतर्गत 3.60 लाख रुपयांचा HRA तर कलम 10 (5) अंतर्गत 10,000 रुपयांचा LTA वर दावा करता येतो. या कपातीसह करपात्र वेतन 7,71,500 रुपये होईल.
  3. जर तुम्ही एलआयसी, पीपीएफ, ईपीएफमध्ये गुंतवणूक केली असेल, मुलांच्या शिकवणी शुल्क भरले असेल तर करदात्याला आयकर कलम 80 सी अंतर्गत 1.50 लाख रुपयांच्या अतिरिक्त कपातीचा दावा करता येतो.
  4. ज्या करदात्यांनी राष्ट्रीय निवृत्ती योजनेच्या टिअर -1 योजनेत गुंतवणूक केली असेल तर कलम 80सीसीडी अंतर्गत 50,000 रुपयांची अतिरिक्त कपातीसाठी पात्र ठरतो. या दोन्ही कपातीनंतर तुमची करपात्र उत्पन्न 5,71,500 रुपये होईल.
  5. कलम 80डी आरोग्य विमा योजनेच्या हप्त्यावर कर सवलतीचा दावा करता येतो. तर तुम्ही तुमच्यासाठी आणि पत्नी, मुलांच्या आरोग्य विम्याच्या हप्त्यापोटी 25,000 रुपयांचा दावा करु शकता.
  6. तुम्ही आई-वडीलांच्या नावे आरोग्य विम्यासाठी जो हप्ता भरता त्यावर 50,000 रुपयांची अतिरिक्त सवलतीचा दावा करु शकता. त्यामुळे तुम्हाला 75,000 रुपयांच्या कपातीचा लाभ मिळेल. त्यामुळे तुमचे उत्पन्न 4,96,500 रुपयांवर येईल.

या योजनातून कर बचत

आयकर खात्याच्या नियमानुसार, पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF), एंप्लाई प्रोव्हिडंट फंड (EPF), इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ELSS), नॅशनल पेंशन सिस्टम (NPS), सुकन्या समृद्धी योजना (SSY), सीनिअर सिटिजन सेव्हिंग स्कीम (SCSS) या अथवा इतर मुदत ठेव योजनेवर कर सवलतीचा लाभ मिळतो. कर तज्ज्ञांनुसार, या योजनेत गुंतवणूक केल्यास अटी आणि शर्तीनुसार करावर सवलतीचा दावा करता येतो. तर काळमर्यादा वाढवून तुम्ही या योजनेतून अधिकची कमाई मिळवू शकता. आयटीआर फाईल करण्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे.