How Wife Can Save Your Tax : आयकर वाचवण्यासाठीही पत्नीची भक्कम साथ, जाणून घ्या 3 सोप्या टिप्स

| Updated on: Jun 01, 2021 | 11:43 AM

जीवनात जरी बदल होत असेल किंवा आव्हान मिळत असेल तरीही ती सांभाळण्यासाठी तुम्हाला एक जोडीदार मिळतो. (How Wife Can Save Your Income Tax)

How Wife Can Save Your Tax : आयकर वाचवण्यासाठीही पत्नीची भक्कम साथ, जाणून घ्या 3 सोप्या टिप्स
marriage
Follow us on

मुंबई : लग्न झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचे जीवन बदलून जाते. लग्न झाल्यावर जबाबदारी वाढण्यापासून आव्हानही वाढतात. पण जरी तुमच्या जीवनात बदल होत असतील किंवा तुम्हाला आव्हान मिळत असेल तरीही ती सांभाळण्यासाठी तुम्हाला एक भक्कम जोडीदारही मिळतो. हा जोडीदार कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आणि आव्हाने घेण्यास, आर्थिक निर्णय घेण्यास तुम्हाला साथ देतो. विशेष म्हणजे तुमची पत्नी तुम्हाला आर्थिक काटकसर करण्यापासून आयकर वाचवण्यासाठीही (Income Tax Planning) मदत करु शकते. (How Wife Can Save Your Income Tax after marriage)

एकत्र गृह कर्ज घेतल्यास करात सूट

जर तुम्हाला दोघांना घर खरेदी करायचे असेल तर त्यासाठी तुम्ही जॉईंट गृहकर्ज काढू शकता. यामुळे तुमचा कर वाचू शकतो. विशेष म्हणजे याद्वारे तुम्हाला दोघांना गृह कर्जावरील करात सूट मिळू शकते. म्हणजेच कलम 80सी अंतर्गत पती-पत्नी दोघांनाही प्रत्येकी 1.5-1.5 लाख रुपयांची करात सवलत मिळेल. त्यासोबतच सेक्शन 24 (बी) अंतर्गत दोघांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची कर सवलत मिळू शकते, असा दुहेरी लाभ मिळणार आहे.

आरोग्य विमा खरेदीतून करात सवलत

वाढत्या महागाईच्या काळात स्वत:साठी आणि कुटुंबासाठी आरोग्य विमा खरेदी करणे हा शहाणपणाचा निर्णय ठरतो. तुम्ही घरातील प्रत्येकासाठी वेगवेगळी विमा योजना घेऊ शकता किंवा एकत्र कौटुंबिक फ्लोटर योजना घेऊ शकता. जेणेकरुन तुम्हाला कमी खर्चामध्ये अधिक फायदा मिळेल.

आपण एखाद्या व्यक्तीसाठी आरोग्य विमा घेतल्यास तुम्हाला कमी पैशांवर करात सूट मिळवू शकते. जर तुम्ही यात तुमच्या पत्नी आणि मुलांचा समावेश केल्यास त्यात तुम्हाला अधिक लाभ मिळू शकतो. कलम 80 डी अंतर्गत तुम्हाला 25 हजार रुपयांपर्यंत कराचा लाभ मिळू शकतो.

जीवन विमा पॉलिसीद्वारे आयकरात सूट

लग्नाच्या वेळी प्रत्येकजण आपल्या पत्नीचे रक्षण करण्याचे वचन देतो. पण तुम्ही हे वचन जीवन विमा पॉलिसी घेऊन पूर्ण करु शकता. म्हणजेच जर तुम्ही एखादी जाईंट विमा पॉलिसी घेतली आणि जर पत्नीला काही झाले तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही. जॉईंट विमा पॉलिसीमध्ये तुम्हाला कमी प्रीमियमवर अधिक फायदा होतो. त्याचबरोबर, कलम 80 सी अंतर्गत आयकरात सूटही मिळू शकतो. (How Wife Can Save Your Income Tax after marriage)

संबंधित बातम्या : 

लग्नानंतर आर्थिक गणित कसं मॅनेज करायचं? ‘या’ सोप्या टिप्स लक्षात ठेवा

Fixed Deposit Rates : विविध बँकांच्या FD च्या व्याजदरात बदल, काही महिन्यात दुप्पट होतील पैसे

आजपासून Bank, LPG, Google सह Income Tax नियमात बदल, सर्वसामान्यांवर थेट परिणाम