आजपासून Bank, LPG, Google सह Income Tax नियमात बदल, सर्वसामान्यांवर थेट परिणाम

आज 1 जूनपासून अनेक सरकारी कामात बदल होत आहे. त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर पडणार आहे. (These Rules Will Change From June 1)

आजपासून Bank, LPG, Google सह Income Tax नियमात बदल, सर्वसामान्यांवर थेट परिणाम
1-June-Rules-Change-Banking-Tax
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 8:47 AM

These Rule Changes From 1st June मुंबई : आज 1 जून म्हणजेच महिन्याचा पहिला दिवस. 1 जून ही तारीख अनेक प्रकारे विशेष आहे. आजपासून बँक, आयकर, गुगल यासंबंधी अनेक नियम बदलत आहेत. विशेषत: बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda), कॅनरा बँक (Canara Bank) आणि सिंडिकेट बँके (Syndicate Bank) शी संबंधित ग्राहकांसाठी हा महिना महत्वाचा आहे. तसेच घरगुती एलपीजी सिलिंडरचे नवे दर लागू होण्याची शक्यता आहे. (These Rules Will Change From June 1 includes interest rates to LPG cylinder price)

तसेच 1 जूनपासून अनेक सरकारी कामात बदल होत आहे. त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर पडणार आहे. या बँकेचे काम, एलपीजी सिलिंडरचे दर, विमान भाडे, बचत योजनांवरील व्याज आणि आयटीआर फायलिंग याचा समावेश आहे.

करदात्यांसाठी नवीन वेब पोर्टल सुरू करणार

आयकर विभाग पुढील महिन्यात करदात्यांसाठी नवीन वेब पोर्टल सुरू करणार आहे. नवीन पोर्टल सुरू झाल्यानंतर करदात्यांना आयकर विवरणपत्र भरण्याची प्रक्रिया सोपी आणि सुलभ होईल. 1 ते 6 जूनदरम्यान विद्यमान वेब पोर्टल सहा दिवस बंद असेल. यानंतर 7 जून रोजी नवीन ई-फायलिंग पोर्टल सुरू होईल. कर विभागाच्या प्रणाली विभागांकडून जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे, ‘विद्यमान वेब पोर्टलवरून www.incometaxindiaefiling.gov.in नवीन वेब पोर्टल www.incometaxgov.in वर हस्तातरणाची प्रक्रिया1 जून रोजी पूर्ण होईल आणि या दिवशी नवीन वेब पोर्टल कार्यान्वित होईल.

बँक ऑफ बडोदाची नवी यंत्रणा

बँक ऑफ बडोदा आजपासून चेक पेमेंटचे नियम बदलणार आहे. बँकेच्या वतीने पॉझिटिव्ह पे कन्फर्मेशन नियम आजपासून लागू होणार आहे. फसवी चेक रक्कम लक्षात घेता पॉझिटिव्ह पे कन्फर्मेशन लागू केले जात आहे. ही यंत्रणा केवळ 50 हजार रुपयांच्या धनादेशाच्या वर लागू असेल. याचा फायदा घेण्यासाठी प्रथम बँकेकडून खातरजमा होणे आवश्यक आहे. ग्राहक बँकेला काही महत्त्वाची माहिती देईल, तरच ही सुविधा उपलब्ध होईल.

सिलिंडर किंमत

दरमहा एलपीजी सिलिंडरची किंमत बदलते. आजही यात बदल होण्याची शक्यता आहे. तेल कंपन्या एलपीजी सिलिंडरची किंमत बदलतात. त्यामुळे गॅस सिलिंडरच्या किमतीत फरक दिसू शकेल. आतापर्यंतच्या ट्रेंडप्रमाणेच सिलिंडर गॅस महाग होण्याची शक्यता आहे. सध्या दिल्ली आणि मुंबईत 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत ही 809 रुपये इतकी आहे.

सिंडिकेट बँकेचे आयएफएससी कोड बदलणार

कॅनरा बँकेत सिंडिकेट बँकेचे विलीनीकरण झाल्यानंतर सिंडिकेट बँकेच्या सर्व शाखांचे आयएफएससी कोडही बदलले आहेत. कॅनरा बँकेने दिलेल्या माहितीनुसार, जुन्या बँकेच्या म्हणजेच सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांचे जुने आयएफएससी कोड 1 जुलैपर्यंत वैध राहतील. त्यामुळे ग्राहकांनी 30 जूनपर्यंत IFSC कोड अपडेट करावे, अशी सूचना केली आहे.  यानंतर नव्या आयएफएससी कोडद्वारे पैशांचा व्यवहार केला जाईल. जर आपल्याला कोणी पैसे पाठवणार असेल तर त्यांना आयएफएससी कोड बदलल्याचे आधीच कळवा, जो बँक तपशिलात बदलला जावा. अन्यथा पैसे हस्तांतरीत करणे कठीण होऊ शकते.

गुगलमध्ये मोठा बदल

आजपासून गुगलमध्ये एक मोठा बदल होणार आहे. आजपासून Google आपल्या फोटो अ‍ॅपसाठी अनलिमिटेड फोटोज अपलोड करण्याचा अ‍ॅक्सेस देणार नाही. गुगलने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक युजरला केवळ 15 जीबी स्टोरेज स्पेस देण्यात येईल, ज्यात जीमेलवरील ईमेलसह फोटो समाविष्ट आहेत. यात आपले फोटो, व्हिडिओ आणि गुगल ड्राइव्हवरील इतर फाईल्स देखील समाविष्ट असतील. हा 15GB स्पेस वापरल्यानंतर, आपल्याला अधिक स्पेस वापरण्यासाठी Google One चं सब्सक्रिप्शन खरेदी करावं लागेल. गूगल वनच्या मिनिमम सबस्क्रिप्शनच्या 100 जीबी स्टोरेज स्पेससाठी, युजरला दर महिन्याला 130 रुपये किंवा प्रतिवर्ष 1300 रुपये द्यावे लागतील.

पीएफ नियम

पहिल्यांदा पीएफबद्दल जाणून घेऊयात. कर्मचार्‍यांसाठी ही महत्त्वाची बातमी असू शकते. 1 जूनपासून पीएफच्या नियमांमध्ये काही बदल केले जात आहेत, ज्याचा थेट परिणाम कर्मचार्‍यांच्या जमा झालेल्या भांडवलावर होऊ शकतो. नव्या नियमानुसार, आता कंपनीला आपल्या कर्मचार्‍यांच्या खात्याला आधार कार्डशी लिंक करावे लागेल. हा नियम 1 जूनपासून लागू असेल. जर पीएफ खाते आधारशी जोडलेले नसेल तर कंपनीकडून पीएफमध्ये सामील होणारी रक्कम थांबू शकेल. याचा थेट परिणाम आपल्या जमा झालेल्या भांडवलावर होऊ शकतो. हे कार्य खूप सोपे आहे आणि पीएफच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन हे केले जाऊ शकते

विमानांच्या भाड्यावर परिणाम

सरकारच्या आदेशानुसार 1 जूनपासून हवाई प्रवास महागणार आहे. सरकारने कमीत कमी हवाई भाड्याची मर्यादा 16 टक्क्यांपर्यंत वाढवण्यास मान्यता दिलीय. ही वाढ 13 ते 16 टक्के असेल. याचा थेट परिणाम हवाई भाड्यावर दिसून येईल. महागड्या तिकिटांवर होणारा परिणाम कमी होईल, पण स्वस्त तिकिटे महाग होतील. हवाई भाड्यांची कमी मर्यादा वाढविण्याचा थेट परिणाम स्वस्त तिकिटावर दिसून येईल. आताच याचा परिणाम थोड्या लोकांवर दिसून येईल, कारण हवाई प्रवास थांबलेला आहे आणि त्यामध्ये प्रवाशांची संख्या नाममात्र आहे, जी सुरू आहे. (These Rules Will Change From June 1 includes interest rates to LPG cylinder price)

संबंधित बातम्या : 

1 जूनपासून Google Photos चा अनलिमिटेड स्टोरेज ऑप्शन बंद, युजर्सकडे आता कोणते पर्याय, फोटो कुठे साठवणार?

PHOTO | शेअर बाजाराकडून 100 कोटी कमावणाऱ्या व्यक्तीचा गुंतवणूकदारांना सल्ला, या स्टॉक्सपासून दूर राहिल्यास होणार नाही नुकसान

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.