1 जूनपासून Google Photos चा अनलिमिटेड स्टोरेज ऑप्शन बंद, युजर्सकडे आता कोणते पर्याय, फोटो कुठे साठवणार?

गुगलने (Google) दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक युजरला गुगल फोटोजमध्ये (Google Photos) केवळ 15 जीबी स्टोरेज स्पेस देण्यात येईल,

1 जूनपासून Google Photos चा अनलिमिटेड स्टोरेज ऑप्शन बंद, युजर्सकडे आता कोणते पर्याय, फोटो कुठे साठवणार?
Google Photos

मुंबई : गूगल फोटोज (Google Photos) हा सध्या इंटरनेटवरील सर्वोत्कृष्ट फोटो स्टोरेज प्लॅटफॉर्म आहे. याचे एक कारण ते आहे की, हा प्लॅटफॉर्म आपल्याला हाय क्वालिटीमध्ये अनलिमिटेड आणि मोफत स्टोरेजचा पर्याय देतो. याचा अर्थ असा की आपल्या Android फोनवरून आपण उच्च प्रतीचे फोटो (हाय क्वालिटी) आणि व्हिडिओ थेट अपलोड करू शकता आणि तेही अनलिमिटेड. परंतु ही ऑफर केवळ आज (31 मे) रात्री 12 वाजेपर्यंत आहे. कारण आता कोणताही युजर या प्लॅटफॉर्मचा मोफत वापर करु शकणार नाही. गुगल अकाऊंटमध्ये युजर्सना केवळ 15 जीबी मोफत स्टोरेजचा पर्याय देण्यात आला आहे. परंतु आता युजर्सना यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.

गुगल फोटोज वापरण्यासाठी पैसे द्यावे लागणार आहेत. कंपनीने त्यांच्या सर्व युजर्सना सहा महिन्यांपूर्वी याबाबत एक मेलदेखील पाठवला होता, कंपनीने पाठवलेल्या मेलमध्ये म्हटलं होतं की, तुम्ही गुगल फोटोज अ‍ॅपमध्ये अपलोड केलेले कोणतेही फोटो तुमच्या अकाऊंटसोबत दिलेल्या 15 जीबी स्टोरेज स्पेसमध्ये काऊंट होतील. (Google Photos unlimited storage offer ends today, here some better options were you can store Photos)

1 जूनपासून Google आपल्या फोटो अ‍ॅपसाठी अनलिमिटेड फोटोज अपलोड करण्याचा अ‍ॅक्सेस देणार नाही. गुगलने दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक युजरला केवळ 15 जीबी स्टोरेज स्पेस देण्यात येईल, ज्यात जीमेलवरील ईमेलसह फोटो समाविष्ट आहेत. यात आपले फोटो, व्हिडिओ आणि गुगल ड्राइव्हवरील इतर फाईल्स देखील समाविष्ट असतील. यानंतर, 15GB स्पेस वापरल्यानंतर, आपल्याला अधिक स्पेस वापरण्यासाठी Google One चं सब्सक्रिप्शन खरेदी करावं लागेल. गूगल वनच्या मिनिमम सबस्क्रिप्शनच्या 100 जीबी स्टोरेज स्पेससाठी, युजरला दर महिन्याला 130 रुपये किंवा प्रतिवर्ष 1300 रुपये द्यावे लागतील.

दरम्यान, आता अनेक युजर्सना प्रश्न पडला आहे की, फोटोज, व्हिडीओज किंवा इतर फाईल्स साठवून ठेवण्यासाठी गुगल फोटोजव्यतिरिक्त अजून कोणते पर्याय आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशाच काही पर्यायांबद्दलची माहिती देणार आहोत.

गुगल फोटोजना पर्याय कोणता?

iCloud (आयक्लाऊड)

तुम्ही आयफोन युजर्स असाल तर तुम्ही iCloud स्टोरेजचा वापर करु शकता. यामध्ये युजर्सना 5 जीबी स्टोरेज स्पेस मिळते. परंतु यानंतर तुम्हाला 50 जीबी स्टोरेजसाठी 0.99 डॉलर आणि 200 जीबी स्टोरेजसाठी 2.99 डॉलर इतकी रक्कम मोजावी लागेल.

Flickr (फ्लिकर)

यामध्ये तुम्हाला 1000 अनकंप्रेस्ड फोटो अपलोड करता येतील. परंतु त्यानंतर तुम्हाला अनलिमिटेड स्टोरेजसाठी दर महिन्याला 6 डॉलर्स द्यावे लागतील.

Dropbox (ड्रॉपबॉक्स)

यामध्ये तुम्हाला 2 जीबी मोफत स्टोरेज स्पेस मिळते. तर त्यानंतरच्या 2000 जीबी स्टोरेजसाठी दर महिन्याला 9.99 डॉलर द्यावे लागतील.

इतर बातम्या

केवळ अधिकाऱ्यांच्या नेमणुकीने प्रश्न सुटणार नाहीत, सरकारी नियमांचे पालन करावेच लागेल; हायकोर्टाने Twitter ला सुनावलं

Google Photos युजर्स आणि YouTube क्रिएटर्ससाठी वाईट बातमी, ‘या’ सर्व्हिसेस बंद होणार

(Google Photos unlimited storage offer ends today, here some better options were you can store Photos)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI