Google Photos युजर्स आणि YouTube क्रिएटर्ससाठी वाईट बातमी, ‘या’ सर्व्हिसेस बंद होणार

Google Photos युजर्स आणि YouTube क्रिएटर्ससाठी वाईट बातमी, 'या' सर्व्हिसेस बंद होणार
Google Photos - Youtube

तुम्ही Google Photos चा वापर करत असाल किंवा YouTube वर क्रिएटर (Creator) असाल तर तुमच्यासाठी वाईट बातमी आहे.

अक्षय चोरगे

|

May 29, 2021 | 7:17 PM

मुंबई : तुम्ही Google Photos चा वापर करत असाल किंवा YouTube वर क्रिएटर असाल तर तुमच्यासाठी वाईट बातमी आहे. कारण गुगल फोटोज वापरण्यासाठी आता पैसे द्यावे लागणार आहेत. तसेच YouTube क्रिएटर्सना त्यांच्या कमाईवर कर भरावा लागणार आहे. या सर्व गोष्टी/नियम 1 जूनपासून लागू केले जाणार आहेत. (Youtube creators have to pay tax and Google Photos will no longer free from 1st june 2021)

1 जूनपासून Google आपल्या फोटो अॅपसाठी अनलिमिटेड फोटोज अपलोड करण्याचा अॅक्सेस देणार नाही. गुगलने दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक युजरला केवळ 15 जीबी स्टोरेज स्पेस देण्यात येईल, ज्यात जीमेलवरील ईमेलसह फोटो समाविष्ट आहेत. यात आपले फोटो, व्हिडिओ आणि गुगल ड्राइव्हवरील इतर फाईल्स देखील समाविष्ट असतील. यानंतर, 15GB स्पेस वापरल्यानंतर, आपल्याला अधिक स्पेस वापरण्यासाठी Google One चं सब्सक्रिप्शन खरेदी करावं लागेल. गूगल वनच्या मिनिमम सबस्क्रिप्शनच्या 100 जीबी स्टोरेज स्पेससाठी, युजरला दर महिन्याला 130 रुपये किंवा प्रतिवर्ष 1300 रुपये द्यावे लागतील.

यूट्यूब क्रिएटर्सनाही पैसे द्यावी लागतील

गुगल त्यांचा दुसर्‍या प्लॅटफॉर्म यूट्यूबवरही मोठा बदल घडवून आणणार आहे. या अंतर्गत, YouTube क्रिएटर्सना त्यांच्या कमाईवर कर भरावा लागेल. खरं तर, युट्यूबने आता अमेरिकेच्या बाहेरील YouTube क्रिएटर्सकडून कर वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत या क्रिएटर्सना अमेरिकेतून मिळालेल्या व्ह्यूजवर कर भरावा लागेल. कंपनी पुढच्या महिन्यापासूनच हे धोरण सुरू करणार आहे.

Gmail वरील फोटो गुगल फोटोजमध्ये सेव्ह होतील

या गोष्टींव्यतिरिक्त, कंपनी पुढच्या महिन्यात आणखी एक फीचर लाँच करणार आहे, त्यानंतर मेलवर प्राप्त झालेला फोटो थेट Google फोटोजमध्ये सेव्ह होईल. या फीचरचे नाव सेव्ह टू फोटो बटण असे असेल. तथापि, हे फीचर आत्ता JPEG फॉरमॅटसाठी उपलब्ध असेल. हे नवीन वैशिष्ट्य ड्राइव्ह बटणाच्या बाजूला असेल. जेथे ईमेल फोटो प्री-व्ह्यूसाठी ठेवले गेले आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, नवीन फीचरच्या माध्यमातून युजर्स जीमेलवरून फोटो डाउनलोड करून मॅन्युअली गुगल फोटोंचा बॅकअप घेण्यास सक्षम असतील. हे फिचर डीफॉल्ट असेल.

इतर बातम्या

दोन दिवसांनंतर Google Photos मोफत वापरता येणार नाही, अनलिमिटेड स्टोरेज ऑफर बंद

सरकारी आदेशांचे पालन करण्यात अपयशी, Twitter ला 380000 डॉलर्सचा दंड, फेसबुक-गुगलवरही आरोप

(Youtube creators have to pay tax and Google Photos will no longer free from 1st june 2021)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें