AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold And Silver Price: सोन्या-चांदीची सद्दी संपणार? प्रयोगशाळेत दोन्ही धातू तयार होणार? किंमती धाडकन आपटणार? मोठी अपडेट काय

Gold And Silver Price: मौल्यवान हिरा आता जमिनीच्या पोटातूनच येतो असं नाही तर प्रयोगशाळेतूनही बाहेर येत आहे. हिरा जर लॅबमध्ये तयार होत असेल तर सोने आणि चांदी पण प्रयोगशाळेत तयार होऊ शकतात का? बाजारात सोने-चांदीचा भाव दणकावून आपटू शकतो काय?

Gold And Silver Price: सोन्या-चांदीची सद्दी संपणार? प्रयोगशाळेत दोन्ही धातू तयार होणार? किंमती धाडकन आपटणार? मोठी अपडेट काय
प्रयोगशाळेत तयार होणार सोने?Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Feb 06, 2026 | 3:45 PM
Share

Gold Production in Lab: सोने आणि चांदीच्या किंमतींनी ग्राहकांना घाम फोडला आहे. गेल्या दोन वर्षात सोन्याने मोठी उडी घेतली आहे. सोने आता दोन लाख तर चांदी चार लाखांहून पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेकांची चिंता वाढली आहे. बाजारातील फुगवटा केव्हा फुटेल आणि दलाल केव्हा बाजूला होतील हा मोठा प्रश्न आहे. पण एक पर्यायावर सातत्याने चर्चा होत आहे. मौल्यवान हिरे आता केवळ विशिष्ट खाणीतूनच बाहेर काढल्या जातात असे नाही तर प्रयोगशाळेत सुद्धा हिरे तयार केले जातात. सोने आणि चांदी पण असेच प्रयोगशाळेत तयार केल्या जाऊ शकतात का? हा प्रश्न तसा नवीन नाही. अलकेमिस्ट शिसे आणि पारा मिसवळून सोने तयार करण्याचे स्वप्न पाहतात. तर आपल्याकडे परीस हा लोखंडाला अथवा इतर कोणत्याही धातुला सोन्यात रुपांतरीत करतो असा दावा करण्यात येतो. अनेकांनी या परीसाचा शोध घेतला पण सर्वच व्यर्थ गेले आहे. पण प्रयोगशाळेत सोनं आणि चांदी तयार करता येऊ शकते का?

सोनं म्हणजे तरी काय?

सोने हा काही मिश्र धातू नाही. तर एक शुद्ध रासायनिक घटक आहे. सोन्याचे रासायनिक नाव Gold (Au) आणि त्याचा अणुक्रमांक 79 आहे. याचा अर्थ असा की, प्रत्येक सोन्याच्या अणू केंद्रकात नेहमी 79 प्रोटॉन असतात. जगातील प्रत्येक सोन्याचा अणू मग तो भारतात असो वा अमेरिकेत रासायनिकदृष्ट्या एकसारखाच असतो. म्हणूनच सोने तयार करणे हे काही सोप कारण नाही. सोने तयार करण्यासाठी कुणालाही 79 प्रोटॉन असलेला एक अणू तयार करावा लागेल. जर कोणत्याही घटकाच्या अणूमध्ये प्रोटानची संख्या 79 वर पोहचली तर ते सोने होते. त्याचे रूपांतर सोन्यात होते. परीस नेमकं हेच काम करत असेल का? आपल्याकडं काही हजार एक वर्षांपूर्वीच्या साहित्यातही परिसाचा उल्लेख आहे. त्यामुळे परीस नेमकं काय काम करत होता आणि परीस नेमकं काय हे लुप्त झालेलं विज्ञान समोर आलं तर कदाचित सोनं तयार करता येऊ शकतं.

प्रयोगशाळेत सोनं तयार करता येऊ शकते?

सोने हे कोणत्याही रासायनिक प्रक्रियेतून तयार होत नाही. त्यासाठी एक खास प्रक्रिया वापरली जाते, त्याला न्युक्लियर ट्रान्सम्युटेशन (Nuclear Transmutation) असं म्हणतात. या प्रक्रियेत एक जडत्व असलेले शिसे अथवा पारा यावर न्युट्रॉन सोडले जातात. त्यामुळे अणू अस्थिर होतात. त्यानंतर हे अणू किरणोत्सर्गी प्रक्रियेतून (Radioactive Decay) जातो आणि हळूहळू त्यात बदल होतो. काही अणू सोन्यात रुपांतरीत होतात. अशीच काहीशी प्रक्रिया सुपरनोवा स्फोटात घडते. न्यूट्रॉन तारे एकमेकांना जोराची धडक देतात आणि सोनं तयार होतं.

पण व्यावहारिकदृष्ट्या प्रयोगशाळेत सोनं तयार करणं हे शक्य नाही. कारण त्यासाठी न्युक्लियर ट्रान्सम्युटेशन प्रक्रिया करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वीज, अनेक संयंत्र, कित्येक न्यूट्रॉन, अणू कण यांची मोजदाद होणार नाही इतक्या प्रमाणात संख्या लागेल. हे अत्यंत खर्चिक काम आहे. त्यातून उत्पन्न होणारे सोने हे अगदी 1 ते 2 ग्रॅम असेल आणि उत्पादित सोने किरणोत्सर्गी असू शकते. ते धोकादायक ठरू शकते.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...