AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भोंदू खरात आणि रुपाली चाकणकरांचा गुवाहाटी दौरा; एकाच हॉटेलमध्ये मुक्काम, प्रतिभा चाकणकरही सोबत

Ashok Kharat and Rupali Chakankar : रुपाली चाकणकर आणि भोंदू खरात यांनी एकत्र गुवाहाटीचा प्रवास केल्याचे समोर आले आहे. यावेळी प्रतिभा चाकणकर या देखील त्यांच्यासोबत होत्या अशी माहिती समोर आली आहे.

मोठी बातमी! भोंदू खरात आणि रुपाली चाकणकरांचा गुवाहाटी दौरा; एकाच हॉटेलमध्ये मुक्काम, प्रतिभा चाकणकरही सोबत
Chakankar AND kharat (2)Image Credit source: Google
| Updated on: May 13, 2026 | 11:28 PM
Share

भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडालेली आहे. भोंदू खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे, जादुटोणा केल्याचे, अवैध पद्धतीने संपत्ती कमवल्याचे तपासात समोर आले आहे. तपास यंत्रणांकडून खरातची कसून चौकशी केली जात आहे. अशातच भोंदू खरातचे अनेक नेत्यांसोबतही संबंध असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. अशातच आता रुपाली चाकणकर आणि भोंदू खरात यांनी एकत्र गुवाहाटीचा प्रवास केल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

रुपाली चाकणकर आणि भोंदू खरातचा एकत्र गुवाहाटी दौरा

भोंदू खरात आणि रुपाली चाकणकर हे एकत्र गुवाहाटीला गेल्याचे समोर आले आहे. रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर या देखील त्यांच्यासोबत होत्या. या सर्वांनी गुवाहाटीच्या हॉटेल ब्लू रॅडिसन येथे तिघांनीही तीन दिवस मुक्काम केला असल्याचीही माहिती समोर आली आहे. 28 ॲागस्ट 2021 ते 30 ॲागस्ट 2021 हे तीन दिवस तिघेही रेडीसन ब्लू या हॅाटेलमध्ये वास्तव्यास होते. या काळात त्यांनी कामाख्या देवीचे दर्शन घेऊन पूजा अर्जा केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण गुवाहाटीतील मंदिर नऊ ग्रहांच्या पूजेसाठी प्रसिद्ध आहे. ब्रह्मपुत्रा नदीच्या मध्यभागी असलेल्या बेटावर शिवाचे मंदिर आहे. येथे विशेष पूजा अर्चा केल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे.

रुपाली चाकणकर यांची उद्या चौकशी

अशोक खरात प्रकरणात उद्या चाकणकरांची चौकशी करण्यात येणार आहे. या आधी 10 तारखेला एसआयटीकडून रुपाली चाकणकर यांची चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीनंतर बोलताना चाकणकर यांनी म्हटले होते की, त्यांचे जे काही प्रश्न होते, त्या सर्व प्रश्नांची समर्पक अशी उत्तरं मी दिलेली आहेत. मला असा विश्वास वाटतो की, या उत्तरांमुळे सर्वांचं समाधान झालं असेल. पुढे बोलताना त्यांनी पोलिसांना या प्रकरणातील तपासामध्ये माझं जसं सहकार्य हवं असेल तसं मी सहकार्य करेल अशी माहिती दिली होती.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?