AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार खेळाडू स्पर्धेतून आऊट!

टीम इंडियाला दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. स्पर्धेच्या काही दिवस आधीपासून खेळाडूंना होणाऱ्या दुखापतीमुळे टेन्शन वाढलं. आता कुठे स्थिरस्थावर होईल असं वाटत असातना टीम इंडियाला स्पर्धेच्या एक दिवस आधी मोठा धक्का बसला आहे.

T20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार खेळाडू स्पर्धेतून आऊट!
T20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार खेळाडू स्पर्धेतून आऊट!Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Feb 06, 2026 | 3:48 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. 7 फेब्रुवारीपासून टी20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना अमेरिकेशी होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाची पूर्ण तयारी झाली आहे. पण सामन्याच्या काही तासाआधी टीम इंडियाला धक्का बसला आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. वेगवान गोलंदाज आणि स्पर्धेत ट्रम्प कार्ड ठरेल असं भाकीत वर्तवलेल्या हर्षित राणाला दुखापत झाली आहे. भारतीय संघाच्या सराव सामन्यादरम्यान त्याला दुखापत झाली. त्यामुळे सामना अर्धवट सोडून गेला होता. रिपोर्टनुसार, सामन्याच्या एक दिवस आधी आता बाहेर गेल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या चाहत्यांची धाकधूक वाढली आहेत. स्पर्धेला मुकला की सामन्याला हे मात्र काही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. दुसरं त्याची दुखापत किती गंभीर याबाबतही कळू शकलेलं नाही.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी सराव सामन्यात निवडलेल्या प्लेइंग 11 मध्ये हर्षित राणाला जागा मिळाली होती. त्यामुळे त्याचं प्लेइंग 11 मधील स्थान पक्कं मानलं जात होतं. पण 4 फेब्रुवारीला दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात गुडघ्याला दुखापत झाली. त्यामुळे सामना अर्धवट सोडून तंबूत परतला. त्याने या सामन्यात फक्त एकच षटक टाकलं. त्यामुळे त्याला झालेली दुखापत गंभीर नाही ना? अशी चिंता क्रीडाप्रेमी व्यक्त करत होते. पण स्पर्धा सुरू होण्याआधीच त्याला गाशा गुंडाळावा लागणार असं बोललं जात आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, हर्षित राणा पूर्णपणे फिट नाही. त्याच्या गुडघ्याला झालेली दुखापत गंभीर असल्याचं समोर आलं आहे. या स्पर्धेत खेळेल अशी स्थिती नाही. सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादवने याबाबत काही सांगितलं नाही. सूर्यकुमार यादवने इतकंच सांगितंल की, स्पर्धेतून आऊट झालेला नाही. पण कर्णधाराच्या म्हणण्याचा अर्थ काढायचा झाला तर, हार्षित राणाची स्थिती काही चांगली नही. हर्षित राणा या स्पर्धेत खेळणार की नाही हे आता शुक्रवारी संध्याकाळीच स्पष्ट होईल.

हर्षित राणाची जागा कोण घेणार?

भारताचा पहिला सामना अमेरिकेशी होणार आहे. भारताचा संघ अमेरिकेच्या तुलनेत खूपच बलाढ्य आहे. त्यामुळे हर्षित राणाची गरज या सामन्यात भासणार नाही. पण पुढे या स्पर्धेची रंगत वाढत गेल्यानंतर हर्षित राणाची उणीव नक्कीच भासणार आहे. कारण हर्षित राणा गोलंदाजीसोबत मोठ फटके मारण्यात तरबेज आहे. त्यामुळे त्याच्या जागी खेळाडूची निवड करणं बीसीसीआयला कठीण जाईल. हर्षित राणा स्पर्धेतून आऊट झाल्यास भारताकडे वेगवान गेलंदाजीसाठी अर्शदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह हे दोन पर्याय शिल्लक राहतात. तर हार्दिक पांड्या तिसरा वेगवान गोलंदाज असेल.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना