सरकारी आदेशांचे पालन करण्यात अपयशी, Twitter ला 380000 डॉलर्सचा दंड, फेसबुक-गुगलवरही आरोप

आयटी मंत्रालयाने म्हटले आहे की, ट्विटर नवीन लवादाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिलेल्या नियमांचे पालन करण्यास नकार देत आहे.

सरकारी आदेशांचे पालन करण्यात अपयशी, Twitter ला 380000 डॉलर्सचा दंड, फेसबुक-गुगलवरही आरोप
Facebook Twitter
Follow us
| Updated on: May 28, 2021 | 7:15 PM

मुंबई : ट्विटर (Twitter) हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म भारतातील आयटी नियमांच्या वादात अडकला आहे. दरम्यान, ट्विटरवर बंदी घातलेली सामग्री काढून टाकण्यात प्लॅटफॉर्म अपयशी ठरल्यामुळे रशियाच्या स्थानिक कोर्टाने ट्विटरला 1.9 दशलक्ष रूबल (सुमारे 259,000 डॉलर्स) इतका दंड ठोठावला आहे. तसेच, अनधिकृत निषेधासाठी कंपनीचा दंड वाढवून 2.79 कोटी रुबल (380,000 डॉलर्स) करण्यात आला आहे. एप्रिलच्या सुरुवातीच्या काळात रशियामध्ये अशाच गुन्ह्यांसाठी ट्विटरला 121,000 डॉलर्स इतका दंड ठोठावण्यात आला होता. (Russian Court Fines Twitter For Failing To Delete Content)

वृत्तसंस्था सिन्हुआच्या म्हणण्यानुसार, या आठवड्याच्या सुरुवातीच्या काळात मॉस्कोच्या एका कोर्टाने फेसबुक आणि गुगलला अशाच एका आरोपाखाली दंड ठोठावला होता. दरम्यान, भारत सरकारने ट्विटरच्या ताज्या निवेदनावर पलटवार केला आहे, ज्यात भारताने अभिव्यक्ती स्वातंत्र्यास ‘संभाव्य धोका’ असल्याबद्दल ट्विटरबाबत चिंता व्यक्त केली आहे. भारत सरकारने सांगितले की मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म भारतात आपली परिस्थिती निश्चित करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि देशाची कायदेशीर व्यवस्था कमकुवत करू इच्छित आहे.

आयटी मंत्रालयाने म्हटले आहे की, ट्विटर नवीन लवादाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्याच नियमांचे पालन करण्यास नकार देत आहे, ज्या आधारे ते भारतातील कोणत्याही गुन्हेगारी दायित्वापासून सुरक्षित संरक्षणाचा दावा करीत आहेत. ट्विटरने जनतेच्या हिताचे रक्षण करण्यासाठी निवडलेले अधिकारी, उद्योग आणि नागरी समाजाच्या सामूहिक जबाबदारीची गरज यावर जोर दिला जात आहे. आयटी मंत्रालयाने म्हटले आहे की, ट्विटरने स्वतःहून आता भारतीय कायद्यांचे पालन करायला हवे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी आयटीच्या नव्या नियमांबाबत व्हॉट्सअॅपने भारत सरकारविरोधात खटला दाखल केला आहे, तर ट्विटरने आयटी मंत्रालयाला कंपनीसाठी नवीन लवाद मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्यासाठी किमान तीन महिन्यांच्या मुदतवाढीबाबत विचार करण्याची विनंती केली आहे.

इतर बातम्या

नव्या डिजिटल नियमांचे पालन करु; केंद्र सरकारसमोर Facebook ची माघार

ढासू फीचर्ससह Tecno Spark 7 Pro बाजारात, फोनवर 10% डिस्काऊंट

WhatsApp पुन्हा दोन पावलं मागे, Privacy Policy स्वीकारण्याची डेडलाईन पुढे ढकलली, ‘या’ युजर्सना संधी

(Russian Court Fines Twitter For Failing To Delete Content)

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.