WhatsApp पुन्हा दोन पावलं मागे, Privacy Policy स्वीकारण्याची डेडलाईन पुढे ढकलली, ‘या’ युजर्सना संधी

व्हॉट्सअ‍ॅपने (WhatsApp) आपल्या गोपनीयता धोरणाची (Privacy Policy) मुदत काही देशांसाठी 19 जून 2021 पर्यंत वाढवली आहे.

WhatsApp पुन्हा दोन पावलं मागे, Privacy Policy स्वीकारण्याची डेडलाईन पुढे ढकलली, 'या' युजर्सना संधी
Whatsapp Privacy Policy
Follow us
| Updated on: May 24, 2021 | 11:24 PM

मुंबई : व्हॉट्सअ‍ॅपने (WhatsApp) आपल्या गोपनीयता धोरणाची (Privacy Policy) मुदत काही देशांसाठी 19 जून 2021 पर्यंत वाढवली आहे. व्हॉट्सअ‍ॅपने यापूर्वी जगभरातील युजर्ससाठी नवीन सेवा आणि अटी स्वीकारण्याची अंतिम मुदत 8 फेब्रुवारीची ठेवली होती, त्यावर लोकांकडून तीव्र प्रतिक्रिया आणि टीका झाल्यानंतर तीच मुदत 15 मेपर्यंत वाढविण्यात आली होती. आता हीच डेडलाईन काही देशांसाठी 19 जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. (deadline for WhatsApp Privacy Policy acceptance extends to 19 june 2021 for some countries)

व्हॉट्सअ‍ॅप फीचर ट्रॅकर WaBetainfo ने नमूद केले आहे की, व्हॉट्सअ‍ॅप काही वापरकर्त्यांसाठी (युजर्स) 19 जून ही नवीन तारीख घोषित करत आहे, कारण काही क्षेत्रांमधील वापरकर्ते सेवांबाबतच्या नवीन अटींसह अलर्ट डिसमिस करण्यास सक्षम आहेत. अँड्रॉइड आणि आयओएस वापरकर्त्यांना कोणत्याही मर्यादेशिवाय अ‍ॅप वापरण्यासाठी नवीन अंतिम मुदतीच्या आधी अटी स्वीकारणे आवश्यक आहे.

नव्या अटी बेकायदेशीर?

या महिन्याच्या सुरुवातीस, जर्मनीच्या आघाडीच्या डेटा सुरक्षा नियामकांनी व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन अटींना बेकायदेशीर म्हटले आहे. जर्मनीमधील डेटा संरक्षण आणि माहिती स्वातंत्र्यसाठी हॅम्बर्ग आयुक्तांनी यापूर्वी सांगितले आहे की, व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सच्या डेटावर प्रक्रिया करण्यासाठी फेसबुकला कोणताही कायदेशीर आधार नाही.

आमच्या नव्या धोरणाचा चुकीचा अर्थ लावला जात आहे : WhatsApp

डेटा सिक्युरिटी रेग्युलेटरने असा आरोप केला आहे की, व्हॉट्सअॅप लोकांना नवीन गोपनीयता धोरण स्वीकारण्यास भाग पाडत आहे, दरम्यान, कंपनीने असे म्हटले आहे की, ते युजर्सचे अकाउंट हटवणार नाहीत. व्हॉट्सअॅपने आपल्या बचावामध्ये म्हटले आहे की, व्हॉट्सअ‍ॅपच्या अद्ययावत होण्याच्या उद्देशाबाबत आणि परिणामाबाबत डेटा नियामकाने चुकीचा अर्थ लावला आहे.

युजर्सना अ‍ॅप वापरताना अडचणी येत आहेत

दरम्यान, भारतात, काही सर्व्हिससंबंधित अटी न स्वीकारलेल्या काही व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना कॉलिंग फीचरमध्ये प्रवेश करण्यात अडचणी येत आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने गेल्या आठवड्यात व्हॉट्सअॅपला आपल्या नवीन अटी मागे घेण्यास एक आठवड्याची मुदत दिली होती. तसे न केल्यास कायद्यास अनुरुप असणारी आवश्यक ती पावलं उचलली जातील, असं सांगण्यात आलं आहे.

अकाऊंट हटवलं जाणार नाही

व्हॉट्सअ‍ॅपने त्यांच्या एका एफएक्यूमध्ये असं सांगितलं आहे की, जे युजर्स त्यांचं नवं गोपनीयता धोरण स्वीकारणार नाहीत, त्यांचं अकाऊंट हटवलं जाणार नाही. परंतु अशा युजर्सना चॅट लिस्ट ओपन करणे, कॉल रिसीव्ह करणे किंवा कॉल करण्यात अडचणी येतील. या युजर्सकडील अॅपची कार्यक्षमता मर्यादित होईल.

संबंधित बातम्या

गोपनीय माहिती, गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंडसोबतचं चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी वापरा WhatsApp चं भन्नाट फिचर

आता WhatsApp वर UPI पेमेंट ऑप्शनही मिळणार!

WhatsApp युजर्सचा डेटा सुरक्षित नाही, सायबर एक्सपर्ट्सचा इशारा

(deadline for WhatsApp Privacy Policy acceptance extends to 19 june 2021 for some countries)

Non Stop LIVE Update
तूच नादाला लागू नको... प्रसाद लाड यांच्यानंतर जरांगेंचा कोणाला इशारा?
तूच नादाला लागू नको... प्रसाद लाड यांच्यानंतर जरांगेंचा कोणाला इशारा?.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पवारांना दिलासा, आयोगाकडून मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पवारांना दिलासा, आयोगाकडून मोठा निर्णय.
एकदम जवळून बघा वाघनखं...'tv9 मराठी' वर पहिली झलक, जाणून घ्या वैशिष्ट्य
एकदम जवळून बघा वाघनखं...'tv9 मराठी' वर पहिली झलक, जाणून घ्या वैशिष्ट्य.
'मराठी बोलणार नाही, काय करायचे ते...', व्यावसायिकाला मनसे स्टाईल दणका
'मराठी बोलणार नाही, काय करायचे ते...', व्यावसायिकाला मनसे स्टाईल दणका.
‘लाडकी बहीण, लाडका भाऊ झाले असेल तर लाडक्या नातवांचे पण तेवढे बघा’
‘लाडकी बहीण, लाडका भाऊ झाले असेल तर लाडक्या नातवांचे पण तेवढे बघा’.
कोकणातील 'या' दोन मेडिकल कॉलेजला लाखोंचा दंड, कारण नेमकं काय?
कोकणातील 'या' दोन मेडिकल कॉलेजला लाखोंचा दंड, कारण नेमकं काय?.
शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी, शिवकालीन वाघनखं साताऱ्यात; बघा पहिली झलक
शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी, शिवकालीन वाघनखं साताऱ्यात; बघा पहिली झलक.
जगभरात मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर ठप्प, 'या' क्षेत्राला बसला मोठा फटका
जगभरात मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर ठप्प, 'या' क्षेत्राला बसला मोठा फटका.
संभाजीनगरात लाडक्या बहिणी त्रस्त, अर्ज भरण्यास आलेल्या महिलांचा खोळंबा
संभाजीनगरात लाडक्या बहिणी त्रस्त, अर्ज भरण्यास आलेल्या महिलांचा खोळंबा.
महायुतीचे काळे कारनामे..., पवार गटाचं निदर्शन, काळे फुगे लावून डिवचलं
महायुतीचे काळे कारनामे..., पवार गटाचं निदर्शन, काळे फुगे लावून डिवचलं.