AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोपनीय माहिती, गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंडसोबतचं चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी वापरा WhatsApp चं भन्नाट फिचर

तुम्हाला जर WhatsApp वर आलेले खासगी मेसेज इतरांपासून लपवायचे असतील परंतु त्यासाठीची ट्रिक माहिती नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

गोपनीय माहिती, गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंडसोबतचं चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी वापरा WhatsApp चं भन्नाट फिचर
whatsapp
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: May 11, 2021 | 10:29 PM
Share

मुंबई : तुम्हाला जर WhatsApp वर आलेले खासगी मेसेज इतरांपासून लपवायचे असतील परंतु त्यासाठीची ट्रिक माहिती नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. किंवा जे युजर्स WhatsApp चॅटच्या सुरक्षिततेसाठी थर्ड पार्टी अ‍ॅप वापरतात त्यांच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp त्यांच्या युजर्सना अ‍ॅपमध्ये चॅट सुरक्षित ठेवण्यासाठीचं एक फीचर देतं. त्यामुळे तुमचं WhatsApp चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅपची आवश्यकता नाही.

आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट प्रायव्हसी कशी वाढवता येईल, याबाबतची माहिती देणार आहोत. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुम्ही तुमच्या अ‍ॅपवर फिंगरप्रिंट लॉक लावू शकता. खास बाब म्हणजे हे लॉक अगदी सहजपणे अ‍ॅक्टिव्हेट करता येईल आणि तितक्याच सहजपणे ते वापरता येईल. (here is how to lock your private messages on whatsapp with fingerprint on android phone)

अ‍ॅपमध्येच तुमचं चॅट सुरक्षित ठेवा

  • सर्वात आधी तुम्ही तुमचं व्हॉस्टअ‍ॅप ओपन करा. होम पेजवर उजव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यात तुम्हाला 3 डॉट्स दिसतील, त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्यासमोर काही पर्याय दिसतील, त्यापैकी Settings वर क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर Account चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • आता Privacy या पर्यायावर क्लिक करा.
  • Privacy वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काही पर्याय दिसतील, त्यापैकी सर्वात शेवटी Fingerprint Lock असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करुन Unlock with fingerprint वर क्लिक करा.
  • आता तुम्हाला फिंगरप्रिंट रजिस्टर करण्यास सांगितंल जाईल. फिंगरप्रिंट रजिस्टर या पर्यायावर क्लिक करुन तुम्ही तुमच्या आवडीनुसार फिंगंरप्रिंट लॉक टाईम सेट करु शकता.
  • यामध्ये तुम्हाला तीन पर्याय मिळतील, तुमच्या सोयीनुसार तुम्ही Immediately, After 1 minute, After 30 Minutes या तीनपैकी एकाची निवड करु शकता.
  • यामध्ये तुम्ही Immediately हा पर्याय निवडलात तर अ‍ॅप बंद होताच तुमचं लॉक अ‍ॅक्टिव्हेट होईल. तर After 1 minute, After 30 Minutes यापैकी कोणताही एक पर्याय निवडल्यानंतर अनुक्रमे 1 मिनिट किंवा 30 मिनिटांनंतर तुमचं लॉक अ‍ॅक्टिव्हेट होईल.

इतर बातम्या

Special Report | WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; Privacy Policy च्या मुदतीपासून व्हॉटसअ‍ॅपची माघार

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?