AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2025 चा महाफ्लॉप सिनेमा, ‘डिझास्टर’चा टपका, बजेटच्या 10% ही कमाई नाही; सुपरस्टारही वाचवू शकला नाही लाज

2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला चित्रपट व्यापार विश्लेषकांनी आणि समीक्षकांनी 'महाफ्लॉप' आणि 'डिझास्टर' म्हणून घोषित केलं. या चित्रपटाने तब्बल 97% नुकसान सहन केलं आहे आणि अवघ्या आठवडाभरात हा चित्रपट थिएटरबाहेर केला.

| Updated on: Feb 06, 2026 | 3:48 PM
Share
2025 या वर्षांत अनेक हिट बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. काहींनी तर बॉक्स ऑफिसवर घसघशीत कमाई केली आणि नवे विक्रम रचले. तर काहींच्या नशिबी मात्र निराशाच आली. मोठ्या पडद्यावर येताच त्यांना मोठं नुकसान झेलावं लागलं.

1 / 7
अशाच एका चित्रपटाने प्रदर्शनापूर्वी बरीच चर्चा घडवून आणली होती. मात्र थिएटरमध्ये प्रदर्शित होताच तो फ्लॉप झाला. मोठा बजेट, दमदार व्हिज्युअल्स आणि एका मोठ्या सुपरस्टारची भूमिकासुद्धा या चित्रपटाला वाचवू शकली नाही. परिस्थिती अशी निर्माण झाली की हा चित्रपट त्याच्या बजेट्या 10 टक्केही  कमाई करू शकला नाही.

2 / 7
या चित्रपटाला बनवण्यासाठी निर्मात्यांनी 70 कोटी रुपये खर्च केले होते. परंतु त्याबदल्यात हा मेगाबजेट चित्रपट अवघे 3 कोटी रुपयेसुद्धा कमावू शकला नव्हता. आश्चर्याची बाब म्हणजे अवघ्या सहा दिवसांत हा चित्रपट थिएटरमधून काढून टाकण्यात आला होता. या चित्रपटाचं नाव आहे 'वृषभ'. यामध्ये सुपरस्टार मोहनलाल मुख्य भूमिकेत होते.

3 / 7
मल्याळम भाषेतील हा चित्रपट ख्रिसमसच्या मुहूर्तावर 25 डिसेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. 'L2: एम्पुरान' या चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर मोहनलाल यांचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यामुळे प्रेक्षकांनाही बरीच उत्सुकता होती. परंतु प्रत्यक्षात चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांची निराशा झाली.

4 / 7
पहिल्या दिवशी 'वृषभ'ने फक्त 60 लाख रुपयांची कमाई केली होती. परदेशातही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. दुसऱ्या दिवशी कमाईचा आकडा आणखी घसरला आणि वीकेंडलाही तो काही विशेष कामगिरी करू शकला नव्हता. सहा दिवसांत या चित्रपटाने फक्त 2.20 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

5 / 7
'वृषभ'ने जगभरात फक्त 2.20 कोटी रुपयांची कमाई केली होती, जो याच्या बजेटच्या 97% कमी होता. चित्रपटाचं नुकसान पाहून पहिल्या सोमवारनंतर लगेचच तो थिएटरमधून हटवण्यात आला. म्हणजेच हा चित्रपट थिएटरमध्ये एक आठवडासुद्धा टिकू शकला नव्हता.

6 / 7
या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन नंदा किशोर यांनी केलं होतं. तर मोहनलाल यामध्ये दुहेरी भूमिकेत होते. या चित्रपटात दोन वेगवेगळ्या काळातील कथा दाखवण्यात आल्या होत्या. मध्ययुगीन राजा आणि आधुनिक जगातील बिझनेसमन अशा दुहेरी भूमिका मोहनलाल यांनी साकारल्या होत्या.

7 / 7
Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी