अल्प बचत योजनांमध्ये गुंतवणूक करुन व्हा कोट्यधीश, जोखीमही कमी

| Updated on: Jul 15, 2021 | 10:06 AM

सर्वसाधारणपणे लहान बचत योजना फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा जास्त व्याज दर देतात. मात्र कोणत्याही लहान बचत योजना या तुम्हाला काही ठराविक कालावधीत करोडपती बनवू शकतात.

अल्प बचत योजनांमध्ये गुंतवणूक करुन व्हा कोट्यधीश, जोखीमही कमी
pib fact check
Follow us on

मुंबई : सर्वसाधारणपणे लहान बचत योजना फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा जास्त व्याज दर देतात. मात्र कोणत्याही लहान बचत योजना या तुम्हाला काही ठराविक कालावधीत करोडपती बनवू शकतात. मात्र यातील काही योजनांची या उच्च मर्यादेत गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देतात. पीपीएफमध्ये आपण एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. (Saving And Investment How to Become Crorepati by investing in small savings scheme PPF)

सध्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीला 7.1 टक्के दराने व्याज मिळत आहे. हा व्याज दर एफडी दरांपेक्षा चांगला आहे. तसेच पीपीएफवर ईईई प्रकारात कर सवलत उपलब्ध आहे. या योजनेत दीड लाख रुपयांची गुंतवणूक इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 80 अंतर्गत कर सवलतीस पात्र आहे. त्याशिवाय मिळणाऱ्या व्याज आणि मॅच्युरिटीनंतर काढलेली रक्कम यावर कोणताही कर भरावा लागत नाही.

तज्ज्ञांचे मते, जर एखाद्या व्यक्तीने आपल्या करियरच्या सुरुवातीच्या काळापासून पीपीएफ योजनेत उच्च मर्यादेपर्यंत गुंतवणूक केली तर तो व्यक्ती निवृत्तीपर्यंत करोडपती होऊ शकतो. विशेष म्हणजे यात त्यांना कोणत्याही प्रकारची जोखीम घ्यावी लागत नाही.

30 वर्षांत व्हाल करोडपती

पीपीएफमध्ये 15 वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येते. तसेच 15 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याचा कार्यकाळ पुढे 5 वर्षांच्या टप्प्यात वाढवता येतो. जर तुम्ही पीपीएफमध्ये 30 वर्षांसाठी दरमहा 10,000 रुपये गुंतवले तर तुम्हाला 1 कोटीपेक्षा जास्त पैसे मिळू शकतात. तुम्हाला पीपीएफवर 7.1 टक्के दराने व्याज मिळतो.

30 वर्षांपेक्षा कमी कालावधीत करोडपती होण्यासाठी टीप्स

जर तुम्ही या कालावधीपेक्षा कमी कालावधीसाठी पीपीएफमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला दरमहा निश्चित गुंतवणूकीची रक्कम वाढवावी लागेल. तुम्हाला पीपीएफमध्ये 30 वर्षांऐवजी 25 वर्षे गुंतवणूक करुन करोडपती व्हायचे असेल तर तुम्हाला दरमहा 12 हजार 500 रुपये 7.1 टक्के व्याजदराने गुंतवावे लागतील.

तुम्हाला पीपीएफमध्ये वार्षिक 1.5 लाख रुपये गुंतवता येतात. त्यानुसार, जर कोणीही दरमहा 12,500 रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करु शकत नाही. त्यानुसार 15 वर्ष पूर्ण झाल्यावर तुम्हाला 43 लाख रुपये मिळतील.

25 वर्षांच्या गुंतवणुकीनंतर तुम्हाला मिळतील 1.16 कोटी

त्याशिवाय आपण ही गुंतवणूक मॅच्युरिटीच्या एका वर्षाच्या आत 5 वर्षांच्या कालावधीसाठी वाढवू शकता. तसेच 7.1 व्याजदराने 20 वर्षांसाठी दरवर्षी 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुमच्या पीपीएफ अकाऊंटचा बॅलेन्स 73 लाख रुपये होईल.

तसेच एक कोटी रुपये जमा करण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा ही गुंतवणूक 5 वर्षांसाठी वाढवावी लागेल. यानुसार एकूण 25 वर्षांसाठी तुम्ही 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला मॅच्युरिटीनंतर 1,16,60,769 रुपये मिळतील.

(Saving And Investment How to Become Crorepati by investing in small savings scheme PPF)

संबंधित बातम्या : 

Petrol Diesel Price : तीन दिवसांनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव?

तुमच्या आधार कार्डवरुन दुसर्‍या कोणी सिमकार्ड खरेदी केलंय का? असे करा चेक