
SBI ने 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक असलेल्या FD च्या व्याजदरात 25 बेसिस पॉईंट म्हणजेच 0.25 टक्के वाढ केली आहे. हे नवे दर 15 मार्च 2026 पासून लागू झाले आहेत. त्याच वेळी, बँकेने 3 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडी दरात कोणताही बदल केलेला नाही. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घ्या.
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI च्या FD मध्ये तुम्ही तुमचे पैसे गुंतवले तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. वास्तविक, आता SBI ने आपल्या FD च्या व्याजदरात वाढ केली आहे. अशा परिस्थितीत FD गुंतवणूकदारांना आता पूर्वीपेक्षा जास्त व्याजदराने परतावा मिळेल.
SBI ने 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक असलेल्या FD च्या व्याजदरात 25 बेसिस पॉईंट म्हणजेच 0.25 टक्के वाढ केली आहे. हे नवे दर 15 मार्च 2026 पासून लागू झाले आहेत. त्याच वेळी, बँकेने 3 कोटी रुपयांपेक्षा कमी FD दरात कोणताही बदल केलेला नाही.
SBI ने आपल्या काही निश्चित कालावधीच्या FD च्या व्याजदरात बदल केले आहेत, जे खालीलप्रमाणे आहेत.
46 दिवस ते 179 दिवसांच्या FD वरील व्याजदर 5.10 वरून 5.35 टक्के करण्यात आला आहे.
180 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वरील व्याजदर 5.60 वरून 5.85 टक्के करण्यात आला आहे.
1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वरील व्याजदर 6.25 टक्क्यांवरून 6.50 टक्के करण्यात आले आहेत.
46 दिवस ते 179 दिवसांमध्ये मॅच्युअर होणाऱ्या FD वरील व्याजदर 5.60 वरून 5.85 टक्के करण्यात आला आहे.
180 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीत मॅच्युअर होणाऱ्या FD चे व्याजदर 6.10 टक्क्यांवरून 6.35 टक्के करण्यात आले आहेत.
1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवरील व्याजदर 6.75 वरून 7 टक्के करण्यात आले आहेत.
1 वर्ष – 6.25 टक्के
2 वर्ष – 6.40 टक्के
3 वर्ष – 6.30 टक्के
5 वर्ष – 6.05 टक्के
10 वर्षे – 6.05 टक्के
1 वर्ष – 6.75 टक्के
2 वर्ष – 6.90 टक्के
3 वर्ष – 6.80 टक्के
5 वर्ष – 7.05 टक्के
10 वर्षे – 7.05 टक्के
(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)