घरी खरेदी करणाऱ्यांसाठी SBI चं मोठं गिफ्ट, गृहकर्जावर जबरदस्त ऑफर

| Updated on: Nov 16, 2020 | 11:20 AM

SBI मध्ये गृहकर्ज घेण्यासाठी सुरवाती वार्षिक व्याजदर 6.90 टक्के आहे. हा व्याज दर 30 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर लागू होतो.

घरी खरेदी करणाऱ्यांसाठी SBI चं मोठं गिफ्ट, गृहकर्जावर जबरदस्त ऑफर
Follow us on

मुंबई : जर तुम्ही घर विकत घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank Of India) ग्राहकांसाठी दिवाळी डील (Diwali offer) आणि ऑफर (offer) आणल्या आहेत. यामध्ये SBI ने ग्राहकांना गृहकर्ज दरामध्ये (Home Loan) 0.25 टक्के सूट देणार आहे. इतकंच नाही तर बँक प्रक्रिया शुल्कही आकारणार नाहीये. SBI मध्ये गृहकर्ज घेण्यासाठी सुरवाती वार्षिक व्याजदर 6.90 टक्के आहे. हा व्याज दर 30 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर लागू होतो. (sbi giving home loan most of exciting festive deals and offers)

काय आहे एसबीआयची खास ऑफर ?
– एसबीआयमध्ये सुरवाती गृहकर्जावर 6.90 टक्के व्याज दर मिळणार
– सणासुदीत बँक व्याज दरावर 0.25 टक्के सवलत मिळेल
– प्रक्रिया शुल्क 100 टक्के माफ केलं जाईल
– योनो (YONO) अॅपवरून अर्ज घेतल्यावर खास सवलती मिळणार आहेत.


30 लाखांच्या गृह कर्जावर एसबीआय खूपच कमी व्याज दर देत आहे. यामुळे ग्राहकांना याचा चांगला फायदा मिळणार आहे. इथं व्याज दर 6.90 टक्क्यांपासून सुरू होतं. इतकंच नाही तर 30 लाख रुपयांपेक्षा जास्त गृह कर्जावरील व्याज दर 7 टक्के असेल.

एसबीआयच्या गृह कर्जावर ग्राहकांना 75 लाख रुपयांपर्यंतच्या घर खरेदीसाठी 0.25% व्याज सवलत मिळणार आहे. ही सूट सीआयबीआयएलच्या स्कोअरवर आधारित असेल आणि योनो अॅपद्वारे अर्जावर उपलब्ध असणार अशी माहिती बँकेकडून देण्यात आली आहे. (sbi giving home loan most of exciting festive deals and offers)

इतर बातम्या – 

दिवाळीनंतरही सलग 4 दिवस बंद राहणार बँक, वाचा कोणत्या आहेत तारखा?

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता ‘या’ महिन्यापासून मिळण्याची शक्यता