दिवाळीनंतरही सलग 4 दिवस बंद राहणार बँक, वाचा कोणत्या आहेत तारखा?

सणासुदीच्या काळात बँकेत जाण्यापूर्वी बँक सुरू आहे की नाही याची खात्री नक्की करून घ्या.

दिवाळीनंतरही सलग 4 दिवस बंद राहणार बँक, वाचा कोणत्या आहेत तारखा?
Follow us
| Updated on: Nov 15, 2020 | 9:50 AM

नवी दिल्ली : कोरोनाच्या जीवघेण्या संकटाचा सामना करत दिवाळी देशभर मोठ्या उत्साहाने सुरू आहे. पण सणासुदीच्या काळात बँकेत जाण्यापूर्वी बँक सुरू आहे की नाही याची खात्री नक्की करून घ्या. कारण, संपूर्ण महिन्यात मोठे सण असल्यामुळे बँकांना सुट्टी (Bank Holiday November 2020)आहे. दिवाळीच्या दुसर्‍या दिवशीपासून सलग अनेक दिवस बँक बंद (Bank holidays) असणार आहेत. तर 15 नोव्हेंबरला रविवारीदेखील देशभरात बँकिंगचं काम बंद असणार आहे. इतकंच नाही तर 16 नोव्हेंबरला देशातील अनेक राज्यांमध्ये बँका बंद असणार आहेत. (november 2020 bank holiday after diwali bank will remain close)

यंदा 16 नोव्हेंबरला भाऊबीज असल्यामुळे बँका बंद असणार आहेत. दिवाळीनंतरही बँका सलग दोन दिवस बंद असणार आहे. 20 आणि 21 नोव्हेंबर रोजी बिहार आणि झारखंडमध्ये छठ पूजा असल्यामुळे बँका बंद राहतील. त्याचबरोबर रविवारी 22 नोव्हेंबरपासून सर्व राज्यांमध्ये बँका बंद असणार आहेत.

28, 29 आणि 30 नोव्हेंबर रोजी बँका बंद नोव्हेंबरमध्ये 28 नोव्हेंबर हा चौथा शनिवार आहे, त्यामुळे देशभरातील बँकांमध्ये कोणतीही कामं होणार नाहीत. चौथा शनिवार हा बँकांच्या साप्ताहिक सुट्टीचा दिवस आहे. त्याचबरोबर, रविवारी 29 नोव्हेंबरलाही सगळीकडे बँक बंद असतील. यानंतर 30 नोव्हेंबर रोजी गुरु नानक जयंती आणि कार्तिक पोर्णिमा आहे. त्यामुळे या दिवशीही बँकेला सुट्टी असेल.

या महिन्यात अनेक दिवशी बँक बंद असल्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) ग्राहकांना नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगद्वारे बँकिंगचं काम करण्याचा सल्ला दिला आहे. (november 2020 bank holiday after diwali bank will remain close)

नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँक बंद होईल

– 15 नोव्हेंबर – रविवारी – देशभरातील बँकांना सुट्टी

– 16 नोव्हेंबर – दिवाळी (बलिप्रतिपदा) / लक्ष्मी पूजा / भाऊबीज/ चित्रगुप्त जयंती, (अहमदाबाद, बेलापूर, बेंगलुरू, गंगटोक, कानपूर,

लखनऊ, मुंबई, नागपूर)

– 17 नोव्हेंबर – लक्ष्मीपूजा / दिवाळी /

– 18 नोव्हेंबर – छठ पूजा (गंगटोक)

– 20 नोव्हेंबर – छठ पूजा (पाटणा, रांची)

– 21 नोव्हेंबर – छठ पूजा (पटणा)

– 22 नोव्हेंबर – रविवारी (देशभरातील बँका बंद)

– 23 नोव्हेंबर – सेन्ग कुट्सनेम (शिलाँग)

– 28 नोव्हेंबर – चौथा शनिवार (सर्वत्र)

– 29 नोव्हेंबर – रविवारी (सर्वत्र)

– 30 नोव्हेंबर – गुरु नानक जयंती / कार्तिक पोर्णिमा (ऐजवाल, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंडीगड, देहरादून, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पटना, रायपूर, रांची, शिमला , श्रीनगर)

इतर बातम्या – 

धनत्रयोदशीला देशात तब्बल 40 टन सोन्याची विक्री, 20 हजार कोटी रुपयांची उलाढाल

बचत खात्यात महिन्याला केवळ 1 रुपया जमा करा, अन्यथा 2 लाखाच्या फायद्याला मुकाल!

(november 2020 bank holiday after diwali bank will remain close)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.