7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता ‘या’ महिन्यापासून मिळण्याची शक्यता

नवीन दराने लाभ होण्याची अपेक्षा होती. पण कोरोनाच्या संकटामुळे सरकारने आहे त्यात दरात महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे.

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता 'या' महिन्यापासून मिळण्याची शक्यता
म्हणजेच तुम्हाला गॅरंटीसह 5 लाख रुपयांपर्यंतची ठेव मिळेल आणि तीच रक्कम विमा आणि क्रेडिट गॅरंटी (डीआयसीजीसी) मध्ये तुम्हाला दिली जाईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा बँका प्रीमियम भरतात तेव्हाच हा विमा उपलब्ध असतो.

नवी दिल्ली : कोरोना संकटात महागाई भत्त्यावरून यंदा केंद्रीय कर्मचारी  (Central employees) आणि निवृत्तीवेतनधारकांच्या (pensioners) पदरी निराशा पडली आहे. कारण सरकार महागाई भत्ता हा जुन्या जुन्या दरानेच देणार आहे. नवीन दराने लाभ होण्याची अपेक्षा होती. पण कोरोनाच्या संकटामुळे सरकारने आहे त्यात दरात महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. (7th pay commission central government employees and pensioners will get hike in Dearness Allowance from june)

यावर्षी एप्रिलमध्ये कोरोना संकटामुळे सरकारने मोठा निर्णय घेतला. नवीन दराने महागाई भत्ता देण्यास नकार दिला आहे. या निर्णयाचा परिणाम जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंत होणार आहे. म्हणजेच या कालावधीत कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचा महागाई भत्ता वाढणार नाही आहे.

खरंतर, महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढवला जातो. परंतु, कोरोना संकटामुळे सरकारी तिजोरीवर मोठा परिणाम झाला आहे. महागाई भत्त्यावर आता जून 2021 नंतरच कर्मचारी आणि निवृत्तीवेतुधारकांना सरकार सवलत देऊ शकले अशी माहिती देण्यात आली आहे.

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक अनेक दिवसांपासून महागाई भत्ता वाढण्याची प्रतीक्षा करत होते. कारण, सरकारने महागाई भत्त्यावर सवलत जाहीर केल्यास कर्मचाऱ्यांना अधिक पगार मिळणार तर पेन्शनधारकांना वाढीव पेन्शन मिळणार आहे.

सध्या सरकार 17 टक्के दराने महागाई भत्ता देत आहे. अशात सध्याचा दर 21 टक्के आहे. पण आता या वाढीत भत्त्यासाठी जून 2021 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, सरकारने 30 लाखाहून अधिक नॉन-गॅजेस्टेड कर्मचार्‍यांना दिवाळी बोनस देऊन दिलासा दिला आहे.

इतर बातम्या – 

दिवाळीनंतरही सलग 4 दिवस बंद राहणार बँक, वाचा कोणत्या आहेत तारखा?

चत खात्यात महिन्याला केवळ 1 रुपया जमा करा, अन्यथा 2 लाखाच्या फायद्याला मुकाल!

(7th pay commission central government employees and pensioners will get hike in Dearness Allowance from june)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI