Share Market: या छोटुरामची रॉकेट भरारी! 798 कोटींची ऑर्डर मिळाल्याने गुंतवणूकदारांच्या उड्या

Multibagger Stock: या स्मॉलकॅप कंपनीत तुफान आले आहे. गुरुवारी या शेअरने रॉकेट भरारी घेतल्याने गुंतवणूकदारांनी बल्ले बल्ले केले. BSE वर हा शेअर 14 टक्क्यांनी उसळला. तेव्हापासून अनेक गुंतवणूकदारांनी या कंपनीकडे मोर्चा वळवला.

Share Market: या छोटुरामची रॉकेट भरारी! 798 कोटींची ऑर्डर मिळाल्याने गुंतवणूकदारांच्या उड्या
शेअर बाजारात तुफान
| Updated on: Nov 27, 2025 | 1:06 PM

Penny Stock: पटेल इंजिनिअरिंग (Patel Engineering) या स्मॉलकॅप कंपनीत मोठे तुफान आले आहे. गुरुवारी BSE वर हा शेअर 14 टक्क्यांनी उसळला. हा शेअर 37.90 रुपयांवर पोहचला आहे. बांधकाम व्यवसायातील या कंपनीला मोठी ऑर्डर मिळाल्याने शेअरने मोठी भरारी घेतली. पटेल इंजिनिअरिंग कंपनीला 798.19 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. कंपनीचे शेअर हे गेल्या काही दिवसांपासून दबावात होते. पण गुरुवारी या कंपनीचे घसरणीचा उपवास सोडला. या वर्षात हा शेअर जवळपास 27 टक्क्यांपेक्षा अधिकने घसरला आहे.

कंपनीला 798.19 कोटींची ऑर्डर

पटेल इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीला 798.19 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. कंपनीला लेटर्स ऑफ इंटेंट(Lol) मिळाले आहे. स्मॉलकॅप कंपनीला छत्तीसगडमध्ये कोळसा खाणीत खोदकाम आणि वाहतुकीसंदर्भात हा कार्यादेश मिळाला आहे. या कार्यादेशानुसार, बिलासपूर येथे हसदेव भागात झिरिया वेस्ट ओपन कास्ट प्रकल्पात काम करण्यात येणार आहे. हा कार्यादेश कंपनीला पुढील 9 वर्षांसाठी देण्यात आला आहे. या नवीन घडामोडींचा परिणाम लागलीच शेअर बाजारात दिसून आला. कंपनीच्या शेअरने मोठी उसळी घेतली.

शेअरची 253 टक्के उसळी

पटेल इंजिनिअरिंगचा शेअर गेल्या पाच वर्षांत 253 टक्क्यांनी उसळला आहे. स्मॉलकॅप कंपनीचा शेअर 27 नोव्हेंबर 2020 रोजी 10.69 रुपयांवर होता. पटेल इंजिनिअरिंगचा शेअर 27 नोव्हेंबर 2025 रोजी 37.90 रुपयांवर पोहचला. गेल्या चार वर्षांत या कंपनीच्या शेअरमध्ये 88 टक्क्यांची उसळी दिसून आली. गेल्या वर्षात मात्र कंपनीला चमकदार कामगिरी बजावता आली नाही. कंपनीचा शेअर 28 टक्क्यांनी घसरला. पटेल इंजिनिअरिंगचा शेअर गेल्या 52 आठवड्यातील 59.50 रुपये उच्चांकावर पोहचला. तर 52 आठवड्यातील कंपनीचा नीच्चांक 31.60 रुपये इतका होता. पटेल इंजिनिअरिंगचे मार्केट कॅप गुरुवारी 3200 कोटी रुपयांवर पोहचले. या कंपनीत प्रमोटर्सचा वाटा 36.11 टक्के तर सार्वजनिक हिस्सा 59.50 टक्के आहे. हा शेअर येत्या काही दिवसात अजून भरारी घेण्याची शक्यता बाजारातील तज्ज्ञांना वाटत आहे.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.