Smart Gold Buying Strategy : सोनं खरेदीची घाई करायची की वाट पाहायची? एक्सपर्टने दिला मोठा सल्ला

सोन्या-चांदीच्या भावात अलीकडे मोठी घसरण झाली, ज्यामुळे खरेदीची संधी निर्माण झाली आहे. मात्र, बाजारातील चढउतार पाहता तज्ज्ञांनी एकाच वेळी खरेदी न करण्याचा सल्ला दिला आहे. लग्नसराईसाठी सोनं खरेदी करणाऱ्यांनी टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करावी. यामुळे संभाव्य धोके कमी होऊन सरासरी भाव संतुलित राहण्यास मदत होईल.

Smart Gold Buying Strategy : सोनं खरेदीची घाई करायची की वाट पाहायची? एक्सपर्टने दिला मोठा सल्ला
Gold jewellery
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 25, 2026 | 11:41 PM

गेले 11 महिने जबरदस्त घसरण झाल्यानंतर गेल्या दोन तीन दिवसांपासून सोनं-चांदीच्या भावात चढउतार होताना पाहायाला मिळत आहे. त्यातच लग्नसराईचे दिवस असल्याने अनेकांनी सोनं खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे. गेल्या 20 दिवसात तर प्रति 10 ग्रॅम सोन्याचे भाव 17 हजार रुपयांनी कमी झाले आहेत. तर चांदी प्रति किलो 36 हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. त्यातच गेल्या दोन तीन दिवसांपासून पुन्हा एकदा सोन्या चांदीत चढउतार पाहायला मिळत असल्याने ग्राहक संभ्रमित झाले आहेत. सोनं चांदी खरेदी करावी की वाट पाहावी? असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यावर तज्ज्ञांनी मोलाचा सल्ला दिला आहे.

पाटलीपुत्र सराफा संघाचे अध्यक्ष विनोद कुमार यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत याबाबतचा सल्ला दिला आहे. सध्याच्या घसरणीमुळे खरेदीची संधी आहे. पण बाजारातील चढउतार पाहता एक साथ संपूर्ण खरेदी करण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने सोनं चांदी खरेदी करणं उत्तम राहील. सोन्या चांदीच्या भावात घसरण झाल्याने त्याचा थेट परिणाम लग्न सोहळ्यावर होणार आहे. समजा एखाद्या कुटुंबाने लग्नासाठी 100 ग्रॅम सोन्याचे दागिने खरेदी करण्याचं लक्ष्य ठेवलं असेल तर सध्याच्या घसरणीमुळे त्यांचे 1.70 लाख रुपये वाचणार आहेत. चांदीच्या किंमती प्रति किलो 36 हजाराने स्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे, असं विनोद कुमार यांनी सांगितलं.

Loading...

खरेदी करायची की वाट पाहावी?

सोन्याच्या किमतीत अजून घसरण होईल की पुन्हा भाव वाढेल याचा तंतोतंत अंदाज बांधणं कठिण आहे. युद्ध, आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि नव्या टॅरिफ सारख्या घटनाक्रमामुळे त्याचा परिणाम सोन्याच्या किमतीवर होणार आहे. जर एखाद्या कुटुंबाला लग्नासाठी 100 ग्रॅम सोनं खरेदी करायचं असेल तर त्यांनी एकाचवेळी संपूर्ण सोनं खरेदी करू नये. त्यांनी टप्प्याटप्प्याने सोनं खरेदी करावं. दोन टप्प्यात तरी सोनं खरेदी केलं पाहिजे. म्हणजे आता 40 ग्रॅम सोनं खरेदी करा आणि नंतर 50 ग्रॅम सोनं खरेदी करा. जर किमती घसरल्या तर 40 ते 50 ग्रॅम सोनं खरेदी केलं जाऊ शकतं. या धोरणामुळे खरेदीचा सरासरी भाव संतुलित राहील. जर सोन्याचे भाव वाढलेच तर आधी खरेदी केलेल्या सोन्याला भावच येणार आहे, असं विनोद कुमार म्हणाले.

बुकिंग करताना सावध

सोन्याच्या भावात सातत्याने चढउतार होत असल्याने सोन्याची बुकिंकबाबत ग्राहकांनी सावध राहिलं पाहिजे. पूर्वी ग्राहक काही रक्कम देऊन सोनं बुक करायचे. पण सध्याच्या बाजाराकडे पाहता सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही भाव बदलू शकतात. त्यामुळे बुकिंग झाल्यावर ग्राहक आणि सराफा व्यापाऱ्यात वाद होऊ शकतात. अशावेळी ग्राहकांनी जेवढी रक्कम जमा केली, तेवढ्याच मूल्याचं सोनं खरेदी करावं. तोच चांगला पर्याय आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us