ग्राहकांची झाली चांदी; तुम्हाला मिळाला का कमाईचा गोल्डन चान्स

| Updated on: Apr 03, 2024 | 5:13 PM

येत्या दिवाळीपर्यंत चांदी 81,0000 ते 82,000 रुपयांपर्यंत भरारी घेऊ शकते. तर दुसरीकडे सोन्याची किंमत भूराजकीय चिंतेमुळे गगनाला भिडू शकतात. याविषयीच्या एका अंदाजानुसार, सोन्याचा भाव 71 ते 72 हजार रुपयांच्या घरात पोहचेल. मार्च महिन्यानंतर एप्रिलमध्ये पण किंमतींनी जलवा दाखवला आहे.

ग्राहकांची झाली चांदी; तुम्हाला मिळाला का कमाईचा गोल्डन चान्स
चांदीची कमाल, सोन्यापेक्षा अधिक परतावा
Image Credit source: Pxfuel
Follow us on

मार्च महिन्यात सोन्याने गुंतवणूकदारांना 8 टक्क्यांपेक्षा अधिकची कमाई करुन दिली. गेल्या तीन वर्षांत कोणत्याही एका महिन्यात सोन्याने इतकी जबरदस्त कमाई करुन दिली नव्हती. तर चांदीने मार्च महिन्यात जवळपास 5 टक्क्यांचा परतावा मिळून दिला. एप्रिल महिन्यात सोन्यावर चांदीने मात केल्याचे दिसून येते. एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या दिवशी सोने नरमले तर चांदीने सोन्यापेक्षा अधिकची कमाई करुन दिली. या दोन महिन्यात चांदीने तडाखेबंद खेळी खेळली आहे.

तीन दिवसांत कसा परतावा

सोन्याने गुंतवणूकदारांना एप्रिल महिन्यात आतापर्यंत 2.62 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. तर चांदीने गुंतवणूकदारांना 4 टक्क्यांहून अधिकचा रिटर्न दिला आहे. चांदीला अजून 2020 मधील रेकॉर्ड तोडता आलेला नाही. पण चांदी वेगे वेगे धावत राहिली तर ती सोन्याला कमाईत मागे सोडण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. एका अंदाजानुसार, चांदी 80 हजारांच्या घरात जाऊ शकते.

हे सुद्धा वाचा

चांदीच्या किंमतीत उसळी

वायदे बाजारात (MCX) सोन्याचा भाव दुपारी 2 वाजून 11 मिनिटांनी 774 रुपयांच्या दरवाढीसह 77,810 रुपये प्रति 10 ग्रॅम असा होता. व्यापारी सत्रात चांदीच्या किंमतीत जवळपास 1200 रुपयांची वाढ दिसून आली. किंमती 77,810 रुपयांवर पोहचल्या. एकाच दिवसात चांदीची किंमत 77,036 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली. तर आज सकाळी चांदी 77,189 रुपये प्रति किलोग्रॅमवर उघडली.

एप्रिल महिन्यात चांदीचा अंदाज काय

गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या भावात जोरदार उसळी दिसून येत आहे. एप्रिल महिन्याती व्यापारी सत्राचा विचार करता, चांदीच्या किंमतीत जवळपास 3200 रुपयांची वाढ दिसून आली. गेल्या महिन्याच्य शेवटच्या व्यापारी सत्रात चांदी एमसीएक्सवर 75,048 रुपये प्रति किलोग्रॅम होती. तर आज 3 एप्रिल रोजी चांदीचा भाव 78,230 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचली. चांदीच्या किंमतीत आतापर्यंत 3,182 रुपयांची वाढ दिसून आली आहे. म्हणजे चांदीने गुंतवणूकदारांना 4.24 टक्क्यांचा रिटर्न दिला. तर मार्च महिन्यात चांदीने गुंतवणूकदारांना 5.28 टक्क्यांचा रिटर्न दिला.

चांदी गाठणार लांबचा पल्ला

एचडीएफसी सिक्युरिटीजमध्ये कमोडिटी करन्सी हेड अनुज गुप्ता यांनी यावर प्रकाश टाकला. त्यांच्यानुसार, चीनमध्ये उत्पादन आणि औद्योगिक गतिशीलता वाढली आहे. तिथे चांदीची मागणी वाढली आहे. त्यामुळेच चांदीचे दर वाढल्याचे दिसून येते. त्यांच्या दाव्यानुसार येत्या दिवाळीपर्यंत चांदीचा भाव 81,0000 ते 82,000 रुपयांपर्यंत तर सोने 71 ते 72 हजार रुपयांच्या घरात पोहचू शकते.