Multibagger Share : कमालीचा शेअर! गुंतवणूकदार कमी गुंतवणुकीत झाले मालामाल

| Updated on: Mar 04, 2023 | 9:02 PM

Multibagger Share : शेअर बाजार सध्या हिंदोळ्यावर आहे. गुंतवणूकदारांना गेल्या काही महिन्यात जबरदस्त नुकसान सहन करावे लागले आहे. पण या शेअरने गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे.

Multibagger Share : कमालीचा शेअर! गुंतवणूकदार कमी गुंतवणुकीत झाले मालामाल
मालामाल
Follow us on

नवी दिल्ली : आरती इंडस्ट्रीज (Aarti Industries) ही केमिकल कंपनी आहे. या कंपनीचा शेअर यावर्षी जवळपास 11 टक्के घसरला आहे. गेल्या वर्षभरात सातत्याने घसरणीवर असला तरी या कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. बाजारातील तज्ज्ञानुसार, या कंपनीचा शेअर भविष्यात अजून लांब उडी मारेल. हा लंबी रेस का घोडा ठरेल. या कंपनीच्या शेअरने दीर्घकालीन गुंतवणूकदारांना तगडा रिटर्न दिला. दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना लॉटरी लागली. 40,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर हे गुंतवणूकदार करोडपती झाले. एचडीएफसी सिक्योरिटीजनुसार, आरती इंडस्ट्रीजचा शेअर सध्याच्या स्थितीपेक्षा लंबी उडी मारेल. या शेअरमध्ये 56 टक्के वृद्धी होईल. या कंपनीचा शेअर शुक्रवारी 3 मार्च 2023 रोजी बीएसईवर जवळपास 0.82 टक्के वाढून 544 रुपयांवर बंद झाला.

या कंपनीचा वृद्धीदर चांगला राहील आणि बाजारात ही कंपनी अनेक कंपन्यांना टफ फाईट देईल असा अंदाज ब्रोकरेज फर्म व्यक्त करत आहे. सध्या ही कंपनी कॅपिटल एक्सपेंडिचरवर लक्ष्य देत आहे. या कंपनीचे ग्राहक वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भारतात टॉलुईन सेग्मेंटमध्ये विस्तार अधिक जोरदारपणे होईल. ब्रोकरेज फर्मने शेअरच्या खरेदीला दिलेले रेटिंग कायम ठेवले आहे. ब्रोकरेज फर्मने या कंपनीचा शेअर 851 रुपयांपर्यंत जाईल, असा अंदाज वर्तवला आहे.

या कंपनीचा शेअर 21 फेब्रवारी 2003 रोजी 2.18 रुपयांच्या स्तरावर होता. आज या कंपनीचा शेअर 544 रुपयांवर आहे. म्हणजे गेल्या 20 वर्षात या कंपनीने गुंतवणूकदारांना करोडपती केले आहे. दीर्घकालनी गुंतवणूक करणाऱ्यांना या कंपनीने तगडा रिटर्न दिला आहे. दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना लॉटरी लागली. 40,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर हे गुंतवणूकदार करोडपती झाले.

हे सुद्धा वाचा

या कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या 1 वर्षात जवळपास 22.5 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर गेल्या 6 महिन्यात या कंपनीच्या शेअरमध्ये जवळपास 26.32 टक्क्यांची घसरण झाली. या कंपनीचा शेअर गेल्या 52 आठवड्यात 864.64 रुपये या उच्चांकावर होता तर 52 आठवड्यात या कंपनीचा शेअर 505.10 रुपयांच्या नीच्चांकावर होता.

इलेक्ट्रिक बस तयार करणारी कंपनी ओलेक्ट्रा ग्रीनटेकच्या (Olectra Greentech) शेअरने शुक्रवारी जबरदस्त उसळी घेतली. ओलेक्ट्रा ग्रीनटेकचा शेअर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये 20 टक्क्यांनी वधारला. हा शेअर सध्या 482.45 टक्क्यांवर व्यापार करत आहे. ओलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीने रिलायन्ससोबत नवीन प्रकल्प आणला आहे. त्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडसोबत (RIL) तांत्रिक भागीदारी केली आहे.

ओलेक्ट्रा ग्रीनटेकच्या शेअरमध्ये गेल्यावर्षी जोरदार तेजी आली होती. गेल्या तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीत ग्रीनटेकचा शेअर 1021 टक्क्यांनी वधरला आहे. या कंपनीचा शेअर 27 मार्च 2020 रोजी 42.35 रुपयांवर व्यापार करत होता. ओलेक्ट्रा ग्रीनटेकचा शेअर 24 जानेवारी 2023 रोजी बीएसईवर या शेअरमध्ये 20 टक्क्यांची वाढ होऊन तो 482.45 रुपयांवर आला आहे. या कंपनीचा 52 आठवड्यांतील उच्चांकी किंमत 739.40 रुपये आहे. तर 52 आठवड्यांतील नीच्चांकी किंमत 374.35 रुपये आहे.