Small Savings : अल्पबचत गुंतवणूकदारांना केंद्र सरकारचे दिवाळी गिफ्ट, काय केला बदल

Small Savings : अल्पबचत योजनांच्या गुंतवणूकदारांना केंद्र सरकारने दिवाळीपूर्वीच गिफ्ट दिले आहे, पण हे गिफ्ट काय आहे ते पाहुयात..

Small Savings : अल्पबचत गुंतवणूकदारांना केंद्र सरकारचे दिवाळी गिफ्ट, काय केला बदल
अल्पबचत गुंतवणूकदारांना खूशखबर
Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Sep 29, 2022 | 7:20 PM

नवी दिल्ली : केंद्र सरकारने अल्पबचत योजनांच्या (Small Savings Scheme) गुंतवणूकदारांना (Investors) मोठी खूशखबर दिली आहे. त्यांनी स्मॉल सेव्हिंग स्कीमवरील व्याज दरात (Interest Rate) बदल केला आहे. त्याचा फायदा आता गुंतवणूकदारांना होणार आहे. अनेक दिवसांपासून व्याजदरात वाढ करण्याची मागणी होती. पण सरकारने प्रत्येक वेळी मुहूर्त हुकवला..

चालू वित्त वर्षात केंद्र सरकारने तिसऱ्या तिमाहीत अल्पबचत योजनांचे व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या अहवालानुसार, दोन वर्षांच्या मुदत ठेवीवर व्याज दर वाढवण्यात आले आहे. सध्याच्या 5.5 टक्क्यांवरुन हा व्याज दर 5.7 टक्के वाढवण्यात आला आहे.

तर तीन वर्षांच्या मुदत ठेवीवरील व्याज दरातही वाढ करण्यात आली आहे. सध्याच्या 5.5 टक्क्यांवरुन व्याजाचा दर 5.8 टक्के करण्यात आला आहे. केंद्र सरकार दर तीन महिन्यांनी व्याजदरात बदल करते. यावेळी दिवाळीपूर्वीच सरकारने लोकांना दिवाळी भेट दिली.

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण विषयक समितीच्या (MPC) बैठकीनंतर ही घोषणा करण्याची रीत होती. यावेळी केंद्र सरकारने ही बैठक सुरु असताना अल्पबचत योजनांच्या व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या बचत योजनांवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. हा दर आता 7.6 टक्के करण्यात आला आहे. पूर्वी ज्येष्ठ नागरिकांना 7.4 टक्के व्याजदराने परतावा मिळत होता. मासिक योजनांवर आता 6.7 टक्के व्याज मिळेल. पूर्वी हा व्याजदर 6.6 टक्के होता.

रेपो दर चार टक्क्यांहून वाढून आता 5.40 टक्क्यांवर पोहचला आहे. पतधोरण समितीची (MPC) बैठक कालपासून सुरु झाली आहे. ही बैठक 30 सप्टेंबर रोजीपर्यंत सुरु राहिल. शुक्रवारी समिती रेपो दरात 0.50 टक्क्यांची वृद्धी करु शकते. त्यामुळे रेपो दर 5.90 टक्के होईल. त्यामुळे कर्ज पुन्हा महाग होईल आणि कर्जावरील ईएमआयमध्ये सुद्धा वाढ होईल.

यापूर्वी समितीने मे महिन्यात रेपो दरात 0.40 टक्क्यांची वाढ केली होती. तर जून आणि ऑगस्ट महिन्यात रेपो दरात 0.50-0.50 टक्क्यांची वाढ झाली. ग्राहक मूल्य सूचकांकवर आधारीत किरकोळ महागाई दर ऑगस्ट महिन्यात 7 टक्क्यांवर पोहचला आहे.